jai jai maharashtra maza lyrics
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्राचे नवे राज्यगीत PDF – डाऊनलोड करा

- JAY JAY MAHARASHTRA MAZA, GARJA MAHARASHTRA MAZA- GR DOWNLOAD
- ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ‘ (jai jai maharashtra maza lyrics) हे गीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त महाराष्ट्र राज्याला नवे राज्यगीत म्हणून
- कविवर्य राजा निळकंठ बडे यांच्या गीतातील दोन चरणे राज्यागीत
- 19 फेब्रुवारी 2023 – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून महाराष्ट्र राज्यगीत म्हणून स्वीकार
- शाळांमध्ये राष्ट्रगीत,प्रार्थना सोबत आता राज्यगीत सुद्धा गायले जाणार
- राज्यगीताचा अवधी 1.41 मिनिटे
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
राज्यगीत- mp3
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
41 thoughts