28 Jully | 28 जुलै दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

28 Jully

28 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शुक्रवार

दिनांक- 28/07/2023, 28 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 10

शके– 1945

सुविचार- दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो.

Sacrifice makes man bigger than charity.

म्हणी व अर्थ : आवळा देऊन कोहळा काढणे: अल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे.

वाक्प्रचार- डोळे उघडणे- अद्दल घडणे, अनुभवाने सावध होणे.

बातम्या

कुंभार्ली घाटातील रस्ता खचला!, मनसेने बॅरल, झेंडे उभारून वाहतूकदारांना दिला सावधानतेचा इशारा
कोविड घोटाळ्यात कंत्राटं कोणी ओरबडली?; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना रोखठोक सवाल
कराड तालुक्यातील वराडे येथे बिबट्यांचा धुमाकूळ, सीसीटीव्हीत ३ बिबटे कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
पावसाचा जोर वाढल्याने राजापुरात पुन्हा पूरस्थिती, अर्जुना नदीने इशारा पातळी ओलांडली
सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच, हरकुळ धरण झाले ओव्हरफ्लो; दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस
पनवेल- खारघर शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकांना खारघर पोलिसांनी केली अटक
मुंबई – अन्नदात्याला लुबाडणाऱ्या खत-बियाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार?, नाना पटोलेंचा सवाल
कोल्हापूर – राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होणार

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०९ वा किंवा लीप वर्षात २१० वा दिवस असतो.

पंधरावे शतक

  • १४९३ – मॉस्को शहराचा मोठा भाग आगीत भस्मसात.

सोळावे शतक

  • १५४० – दरबारी राजकारणात इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याने थॉमस क्रॉमवेलला मृत्युदंड दिला.

अठरावे शतक

  • १७९४ – फ्रेंच क्रांती – मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला गिलोटिनवर मृत्युदंड.

एकोणिसावे शतक

  • १८२१ – पेरूने स्वतःला स्पेनपासून स्वतंत्र जाहीर केले.

विसावे शतक

  • १९१४ – पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९३० – रिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
  • १९४२ – दुसरे महायुद्ध – सोवियेत संघाच्या अध्यक्ष जोसेफ स्टालिनने हुकुम काढला ज्यानुसार कोणत्याही परिस्थितीत लढाईतून माघार घेणाऱ्या सोवियेत सैनिकांना तत्काळ मृत्यूची शिक्षा लागू झाली.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध – रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.
  • १९४५ – होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९४५ – अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.
  • १९५० – मनुएल ओड्रिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९५६ – मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९६३ – फर्नान्डो बेलॉॅंडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९७६ – चीनच्या तांग्शान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ ते ८.२ च्या दरम्यान तीव्रता असलेला भूकंप. २,४२,७६९ ठार, १,६४,८५१ जखमी.
  • १९८० – फर्नान्डो बेलॉॅंडे टेरी परत पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९८५ – ऍलन गार्शिया पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९९० – आल्बेर्तो फुजिमोरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९९५ – आल्बेर्तो फुजिमोरी दुसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.

एकविसावे शतक

  • २००० – आल्बेर्तो फुजिमोरी तिसऱ्यांदा पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००१ – अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २०१७ – पनामा पेपर्सद्वारे उजेडात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने १० वर्षे निवडलेले पद घेण्यापासून बंदी घातल्यावर तेथील पंतप्रधान मियॉं नवाझ शरीफने राजीनामा दिला.

जन्म

  • १८९१ – रॉन ऑक्सनहॅम, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९०७ – अर्ल टपर, टपरवेरचा इंग्लिश शोधक.
  • १९२९ – जॅकलीन केनेडी-ओनासिस, जॉन एफ. केनेडीची पत्नी.
  • १९३१ – जॉनी मार्टिन, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३६ – सर गारफील्ड सोबर्स, वेस्ट इंडियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३८ – आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४५ – जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार.
  • १९५४ – ह्युगो चावेझ, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७० – पॉल स्ट्रॅंग, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ४५० – थियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट.
  • १०५७ – पोप व्हिक्टर दुसरा.
  • १७९४ – मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.
  • १८४९ – चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.
  • १९३४ – लुइस टॅंक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ – ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – पेरू

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

नोकर चोर आहे
एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत.
त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा.
ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो.
त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले.
त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे.
त्यानेच तुमचे दागिने चोरले. शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण !
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता
खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
कवी : ग. दि. माडगूळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : प्रकाश आमटे
२) ‘मृत्युंजय’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : शिवाजी सावंत
३) ‘बलुतं’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : दया पवार
४) ‘बनगरवाडी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : व्यंकटेश माडगूळकर
५) ‘अग्निपंख’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर :  डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम

ENGLISH QUESTION

1) How many days do we have in a week?
Answer: Seven
2) How many days are there in a normal year?
Answer: 365 (not a leap year)
3) How many days are there in the month of February in a leap year?
Answer: 29 days
4) How many hours are there in two days?
Answer: 48 hours
5) How many weeks are there in one year?
Answer: 52

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#28 jully, 28 jully 2023, 28 jully 2021 panchang, 28 jully 2022 special day, 28 jully 2023 weather, 28 jully 2022 panchang in hindi, 28 jully is celebrated as, what is celebrated on 28 jully, 28 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.