Ranvedi Kavita
१.रानवेडी कविता ,Ranvedi
Ranvedi poem- शब्दार्थ
भाळली-मोहित झाली,नाद–छंद ,पांगली–पसरली,मोहर-फुलोरा,टंटणी-बारीक फुलांची वनस्पती,फुली–नाकात घालायची चमकी,बुरांडी–पिवळ्या फुलांचे झुडूप,पहाळी-पावसाची सर,वाळली–सुकली.
गाण्याचा अर्थ-Ranvedi Kavita
ती लहानगी मुलगी डोंगरावर भुलली.त्याच्या नादी लागून सगळ्या रानात आनंदाने हुंदडली.
रानगवताची फुलं तिच्या कानांमध्ये डोलू लागली.चाईच्या फुलांच्या मोहराची माळ तिने गळ्यात सरीसारखी घातली.टंटणीची फुलं तिने नाकात चमकीसारखी घातली आणि बुरांडीची पिवळी फुले तिने केसात माळली.ती लहानगी मुलगी डोंगराला भुलली.
ती लहानगी मुलगी हिरवळीवर खेळली आणि वाऱ्याशी बोलली.वडाच्या पारंबीचा तिने झोका केला.तिचा झोका उंच आभाळात गेला.तिने पानसाबरीचे बोंड खाल्ल्यामुळे तिचे तोंड लाल झाले.मग ती हसत हसत मऊ गवतावर लोळू लागली.ती लहानगी मुलगी डोंगराला भाळली.
डोंगरातून वाहत खाली येणाऱ्या पाण्याच्या वाटेने गाई डोंगरावर जोमाने चढत चालल्या होत्या.ढगांचा गडगडात झाला.जणू ढगांचा ढोल वाजू लागला.मुलीने रानात मोरांचा नाच पाहिला.पावसाची मोठी सर येताच ती डोंगराच्या कपारीत आडोशाला लपली.पुन्हा फिरून ऊन पडले,तेव्हा मघाशी पावसात जरी ती भिजली होती,तरी ती उन्हात सुकली.
प्रश्नोत्तर-
प्रश्न–१) मुलगी कशावर भाळली आहे?
उत्तर–मुलगी डोंगरावर भाळली आहे.
प्रश्न-२) लहान मुलगी कोठे हुंदडली?
उत्तर–लहान मुलगी सगळ्या रानात आनंदाने हुंदडली.
प्रश्न–३) मुलीने कानामध्ये काय घातले आहे?
उत्तर–मुलीने कानात रानगवताची फुले घातली आहेत.
प्रश्न–४) मुलीने नाकात चमकीसारखे काय घातले आहे?
उत्तर–मुलीने नाकात चमकीसारखे टंटणीची फुलं घातली आहेत.
प्रश्न–५) बुरांडीच्या फुलांचा रंग कसा असतो?
उत्तर–बुरांडीच्या फुलांचा रंग पिवळा असतो.
प्रश्न–६) मुलीचे तोंड का रंगले आहे?
उत्तर–मुलीने पानसाबरीचे बोंड खाल्ल्याने तोंड रंगले आहे.
प्रश्न-७) मुलीने कशाचा नाच पाहिला?
उत्तर–मुलीने मोराचा नाच पाहिला.
प्रश्न–८) पावसाची सर येताच मुलगी कोठे लपली?
उत्तर–पावसाची सर येताच मुलगी डोंगराच्या आडोशाला लपली.
प्रश्न–९) वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांग.
नादी लागणे –
उत्तर–वेड लागणे.
प्रश्न-१०) रानवेडी कवितेचे कवी कोण?
उत्तर–तुकाराम धांडे.
रानवेडी कवितेवर पाठावर आधारित मनोरंजक टेस्ट सोडवा.
इयत्ता तिसरीसाठी २० गुणांची टेस्ट सोडवा.
पाठावरील संकल्पना स्पष्ट होण्यास उपयोगी टेस्ट
व्हेरी नाईस
Use ful
Its very useful for students
Shambhu gorakh Kothare
Shrikant dhembre
सरावासाठी खुपच छान
You me
He kya aahe kasle pan prashana det aahet je kavitet aahe nhi te shabad deta aahe prashana Madha he kaisli test kavita madhil shabada prashana madhe dyavet tar prashan yogya hoil jase ki kavitet bhalli aahe ti thi tumhi bhulli lihit aahet prashana yogya dyavet
parisar prashn uttare