5वी नवोदय
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिका स्वरूप
अ) विभाग पहिला- मानसिक क्षमता चाचणी मध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात. या सर्व भागात प्रत्येक भागात चार चार प्रश्न विचारलेले असतात. असे एकूण 40 प्रश्न 50 गुणासाठी विचारलेले असतात. हे सर्व प्रश्न आकृती वर आधारीत विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात.
ब) विभाग दुसरा- अंकगणित मध्ये अंकगणित या घटकावरील मुलभूत क्षमता जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आकडेमोड, अंकवाचन, अंकावरील क्रिया या वरील प्रश्न विचारलेले असातात. या प्रश्नांचा उद्देश आपले अंकज्ञान तपासणे हा असतो. यासाठी 20 प्रश्न 25 गुणासाठी विचारलेले असतात.
क) विभाग तिसरा- भाषा मध्ये भाषा विषयावर 20 प्रश्न हे 25 गुणासाठी विचारलेले असतात. भाषा या घटकाचा उद्देश हा वाचन व आकलन क्षमता तपासणे हा असतो आपली आकलन व वाचन क्षमता कशी आहे ते तपासले जाते. भाषा विषयातील चार परिच्छेद विचारलेले असतात. आपणास परिच्छिद काळजीपूर्वक वाचन करून त्यावर विचारलेले प्रश्न सोडवायचे असतात.
अनु. | विषय | टेस्ट लिंक |
१ | भाषा | क्लिक करा |
२ | गणित | क्लिक करा |
3 | मानसिक क्षमता चाचणी | क्लिक करा |