Setu abhyas PDF,सेतू अभ्यास, Bridge Course | पहिली ते दहावी

सेतू अभ्यास , Bridge Course

Setu abhyas PDF

दुसरी ते दहावी
सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स), Setu abhyas हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र ,पुणे SCERT PUNE ने तयार केला आहे.

Setu abhyas PDF हा  SCERT PUNE ने इयत्तानुसार व विषयानुसार 2री ते 10वी pdf file स्वरुपात शैक्षणिक वर्ष 2022 -2023 चा डाउनलोड साठी https://www.maa.ac.in/ वेबसाईटवर 16 जून 2022 पासून उपलब्ध केला आहे..

खालील लिंकवरून वर्ष 2021-2022 व 2022 -2023 चा 1ली ते 10वी

पहिली विद्याप्रवेश  व सेतू अभ्यास 

1 पहिली  क्लिक करा 
2 दुसरी क्लिक करा
3 तिसरी क्लिक करा
4 चौथी क्लिक करा
5 पाचवी क्लिक करा
6 सहावी क्लिक करा
7 सातवी क्लिक करा
8 आठवी क्लिक करा
9 नववी क्लिक करा
10 दहावी क्लिक करा

#दुसरी ते दहावी, सेतू ,(ब्रीज कोर्स), #Setu abhyas PDF 2022-23, #setu abhyaskram 2022, सेतू अभ्यासक्रम pdf download, पूर्व चाचणी, #Bridge course

मागील वर्षी सन 2021 मध्ये 1 जुलै 2021 ते 14 ऑगस्ट 2021 असे 45 दिवस हा सेतू अभ्यास सुरु होता. दर पंधरा दिवसांनी एक अशा तीन मूल्यमापन चाचण्या आपण घेतल्या आहेत.

Setu abhyas PDF ,या वर्षी एक पूर्वचाचणी , 30 दिवसाचा सेतू अभ्यास  व एक उत्तर चाचणी असे सविस्तर नियोजन राज्य शासनाने केले आहे.

Setu abhyas PDF,सेतू अभ्यास हा लॉकडाऊन काळात खूप उपयोगी पडला.चालू वर्षी हा पुन्हा पुनर्रचित सेतू अभ्यास शाळा सुरु झाल्यावर मिळणार आहे.

क्लिक करून दि-3 /6/2022 चा शासन निर्णय पहा.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप-

1. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
2. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.
3. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.
4. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.
5. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.
6. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.
7. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. 16 जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दि.23 जुलै / दि.6 ऑगस्ट, 2022 पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी-

सेतू अभ्यास पूर्व व उत्तर चाचणी 

अ.क्र. पूर्व चाचणी उत्तर चाचणी 
2री क्लिक करा क्लिक करा
3री क्लिक करा क्लिक करा
4थी क्लिक करा क्लिक करा
5वी क्लिक करा क्लिक करा
6वी क्लिक करा क्लिक करा
7वी क्लिक करा क्लिक करा
8वी क्लिक करा क्लिक करा
9वी क्लिक करा क्लिक करा
10वी क्लिक करा क्लिक करा
पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :-
1. सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
2. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.
3. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या 30 दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.
4. सदर कृतीपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.
5. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.
6. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका ठेवाव्यात. तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.
7. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी.
8. शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेसाठी दि. ९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी विषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप, कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल.