1ली, नवीन अभ्यासक्रम | बालभारती भाग 1 ते 4, New syllabus-1

इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम

बालभारती भाग 1 ते 4

‘इयत्ता पहिली’ च्या या पाठ्यपुस्तकाची निर्मिती एकात्मिक स्वरूपात करण्यात आली असून भाषा, गणित, इंग्रजी आणि खेळू, करू, शिकू या विषयांचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे.
आर्ट इंटिग्रेटेड (Art Integrated) आणि स्पोर्ट इंटिग्रेटेड (Sport Integrated) दृष्टिकोनाचा विचारही पाठ्यपुस्तक करताना केलेला आहे आणि त्यासाठीच खेळू, करू, शिकू हा विषयही यात सामावून घेतला आहे.
 Learn how to learn व Lifelong Learner यांवर या शैक्षणिक धोरणात भर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एकात्मिक शिक्षणावरही भर देण्यात आलेला आहे.

बालभारती (मराठी व सेमी माध्यम)

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 नवीन अभ्यासक्रम क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच पाठ्यपुस्तकात अनेक प्रतीकांचा (emoji) उपयोग करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रतीके पाहूनच विदयार्थ्यांना कोणती कृती करावयाची आहे याचा बोध होऊ शकतो. याबाबतची माहिती पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीच्या भागातच देण्यात आलेली आहे.

पहिलीच्या विषयानुसार अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 

विचारक चाव्या (Thinker Keys) आणि सहा थिंकिंग हॅट्स (Six thinking hats) यांचा वापर करण्यात आलेला आहे. यांद्वारे विदयार्थ्यांच्या विचारांना आणि कल्पनांना चालना मिळणार आहे त्यामुळे इयत्ता पहिलीपासूनच विदयार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विकसित होण्यास मदत होणार आहे.
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.