NISHTHA 3.0 FLN Courses
National Initiative For School Head’s and Teachers Holistic Advancement -NISHTHA
1ली ते 5वी च्या शिक्षकांसाठी
दिनांक 1 जानेवारी, 2022 पासून निष्ठा 3.0 (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे.
सद्यस्थितीमध्ये देशातील कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर देशामधील प्राथमिक शाळांमधील इयत्ता 1 ली ते 5 वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA3.0 FLN (National Initiative For School Head’s and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. सदरचे प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण 12 घटकसंचांचा (मोड्यूल्स) चा समावेश असणार आहे.
उक्त नमूद तपशीलवार माहितीनुसार एकूण 12 सामान्य अभ्यासक्रमावर आधारित घटकसंचाचे (मोड्यूल्स) चे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. यामध्ये सदरचे सामान्य अभ्यासक्रमावरील प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे 3 ते 4 तासाचे असणार आहे.
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये दीक्षा प्लॅटफॉर्म वर होणार असल्याने यासाठी आवश्यक सुचना खालीलप्रमाणे,
सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून घेतले जाणार असल्याने सर्व शिक्षकांनी DIKSHA अॅपवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
DIKSHA अॅपवर नोंदणी करणेसाठी
या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहू शकता.
ऑनलाईन नोंदणी व लॉगीन तसेच इतर शंका दूर करण्यासाठी आवश्यक सर्व व्हिडीओ देखील पत्रासोबत देण्यात आलेले आहे. तसेच सदरच्या प्रशिक्षणासाठीची ऑनलाईन नोंदणी असणे आवश्यक आहे.
नोंदणी करणेसाठी …
सामान्य अभ्यासक्रमावर आधारित-मराठी माध्यम कोर्सेस
8 मे पासून निष्ठा 1 ते 12 COURSE पुन्हा सुरु झाले आहेत. 25 जून पर्यंत नोंदणी करता येईल व 30 जून रोजी बँचची शेवटची तारीख आहे.
1. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.
2. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.
3. अध्ययनार्थ्यांचे आकलन: मुल कसे शिकते?
4. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग
5. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन
6. पायाभूत भाषा आणि साक्षरता.
7. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण
8. अध्ययन मुल्यांकन.
9. पायाभूत संख्याज्ञान
10. शालेय शिक्षणातील पुढाकार
11. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर
12. खेळणीधारित अध्यापनशास्त्र
सदरच्या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक 30 दिवसांच्या कालावधीमध्ये एकूण सामान्य अभ्यासक्रमवार आधारित दिनांक 8 मे, 2022 पासून सदरचे सर्व 12 कोर्सेस (मोड्यूल्स) पुन्हा उपलब्ध झाले आहेत.
शिक्षकांसाठी सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम हा मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.
सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये DIKSHA अॅपवर दर 30 दिवसांसाठी एकूण 4 मोड्यूल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे.
शिक्षक आपल्या पसंतीनुसार एका वेळी एक किंवा एका पेक्षा जास्त मोड्यूल्स चे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात.
उपलब्ध करून देण्यात आलेले मोड्यूल्स हे विहित मुदतीमध्ये शिक्षकांनी पूर्ण करणे आवश्यक आहेत. याचे सविस्तर वेळापत्रक सोबत जोडण्यात येत आहे.

तसेच दिनांक 1जानेवारी, 2022 पासून सदरच्या प्रशिक्षणास सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरुवात होत आहे.
याचबरोबर सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे जो प्रशिक्षणार्थी कोर्स वर आधारित मुल्यांकनामध्ये किमान 70% गुणांकन प्राप्त करेल अशाच प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे, याची नोंद घ्यावी.
निष्ठा प्रशिक्षण संदर्भात जी आर डाऊनलोड करा