27 Jully | 27 जुलै दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

27 Jully

27 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

दिनांक- 27/07/2023, 27 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 9

शके– 1945

सुविचार- अपयशाने डगमगू नका व यशाने फुशारून जाऊ नका.

Don’t be swayed by failure and don’t be proud of success.

म्हणी व अर्थ : अपयश हे मरणाहून वोखटे: अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे.

वाक्प्रचार- पाठीशी घालणे- संरक्षण देणे.

बातम्या

कोल्हापूर: पूरबाधित २८ गावातील शाळांना उद्यापासून सुट्टी, जिल्हाधिकाऱ्याचे आदेश
वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी, चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी; नागरिक, व्यापारी धास्तावले
मुंबई – सीएसटी स्थानकासामोरील आझाद मैदानकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसी डबल डेकर बसवर झाड कोसळले.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पण भीती कायम; ‘राधानगरी’ ९० टक्के भरले, ८३ बंधारे पाण्याखाली
नवी दिल्ली – मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधकांचा संसदेत गदारोळ, लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
मोहन भागवत, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मदनदास देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
रत्नागिरी – मुसळधार पावसामुळे १९ गावात अंधार, ३७ खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडीत

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०८ वा किंवा लीप वर्षात २०९ वा दिवस असतो.

सोळावे शतक

  • १५४९ – जेसुइट धर्मगुरू फ्रांसिस झेवियरचे जपानमध्ये आगमन.

सतरावे शतक

  • १६६३ – ब्रिटीश संसदेने कायदा केला ज्यानुसार अमेरिकेत जाणारा सगळा माल इंग्लंडच्याच जहाजातून इंग्लिश बंदरातूनच पाठवणे बंधनकारक ठरले.
  • १६९४ – बँक ऑफ इंग्लंडची रचना.

अठरावे शतक

  • १७७८ – अमेरिकन क्रांती-उशांतची पहिली लढाई – इंग्लंड व फ्रांसच्या आरमारे तुल्यबळ.
  • १७९४ – फ्रेंच क्रांती – १७,००पेक्षा अधिक क्रांतीशत्रूंच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत हात असलेल्या मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला अटक.

एकोणिसावे शतक

  • १८६६ – आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. यायोगे युरोप व अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य.
  • १८८० – दुसरे ॲंग्लो-अफगाण युद्ध-मैवांदची लढाई – अफगाण सैन्याचा विजय. दोन्हीकडे असंख्य सैनिक मृत्युमुखी.

विसावे शतक

  • १९२१ – फ्रेडरिक बॅंटिंगने इन्सुलिनचा शोध लावला.
  • १९४० – बग्स बनीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण.
  • १९४९ – जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललॅंड कॉमेटचे पहिले उड्डाण.
  • १९५३ – कोरियन युद्ध – चीन, उत्तर कोरिया व अमेरिकेची शस्त्रसंधी. दक्षिण कोरियाने संधीवर सही करण्यास नकार दिला परंतु संधी मान्य केली.
  • १९५५ – दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातून आपले सैनिक काढून घेतले.
  • १९७४ – वॉटरगेट कुभांड – अमेरिकन काँग्रेसच्या न्यायिक समितीने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन वर महाभियोग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
  • १९७६ – जपानच्या भूतपूर्व पंतप्रधान काकुएइ तनाकाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक.
  • १९९० – बेलारूसने सोवियेत संघापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • १९९० – त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये जमात-ए-मुसलमीनने उठाव केला आणि संसद व दूरचित्रवाणी कार्यालयात मुक्काम ठोकला.
  • १९९६ – अमेरिकेच्या अटलांटा शहरात १९९६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू असताना सेंटेनियल ऑलिंपिक पार्क येथे गावठी बॉम्बचा स्फोट. १ ठार, १११ जखमी.
  • १९९७ – अल्जीरियात सि झेरूक येथे दहशतवाद्यांनी ५० व्यक्तींना ठार मारले.

एकविसावे शतक

  • २००२ – युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.

जन्म

  • १६६७- योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.
  • १८५७- होजे सेल्सो बार्बोसा, पोर्तोरिकन नेता.
  • १८८२- जॉफ्रे डी हॅविललॅंड, ब्रिटीश विमान अभियंता.
  • १८९९- पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१५- जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५५- ऍलन बॉर्डर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९६३- नवेद अंजुम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ११०१ – कॉन्राड, जर्मनीचा राजा.
  • १२७६ – जेम्स पहिला, अरागॉनचा राजा.
  • १३८२ – जोन पहिली, नेपल्सची राणी.
  • १५६४ – फर्डिनांड पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १९८० – मोहम्मद रझा पहलवी, ईराणचा शहा.
  • २००२ – कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती.
  • २००३ – बॉब होप, इंग्लिश अभिनेता.
  • २०१५ – अब्दुल कलाम

प्रतिवार्षिक पालन

  • होजे सेल्सो बार्बोसा दिन – पोर्तोरिको.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

नोकर चोर आहे
एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत.
त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा.
ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो.
त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले.
त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे.
त्यानेच तुमचे दागिने चोरले. शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण !
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता
खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू !
तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान !
चाउ माउ चाउ माउ !
पितळीतले पाणी पिऊ हंडा पाणी गडप !
गुळाची पापडी हडप !

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) अस्पृश्यांचा मुक्ती संग्राम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : शंकरराव खरात
२) ‘श्रीमान योगी ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : रणजित देसाई
३) ‘ ग्रामगीता ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
४) ‘ सनी डेज ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : सुनिल गावस्कर
५) ‘ तिमिरातून तेजाकडे ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : डाॅ.नरेंद्र दाभोळकर

ENGLISH QUESTION

1) What is the color of lemon?
Ans : Yellow
2) What is the color of buffalo?
Ans : Black
3) What is the color of milk ?
Ans : White
4) What colur is the sky ?
Ans : Blue
5) What color is the parrot?
Ans : Green

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#27 jully, 27 jully 2023, 27 jully 2021 panchang, 27 jully 2022 special day, 27 jully 2023 weather, 27 jully 2022 panchang in hindi, 27 jully is celebrated as, what is celebrated on 27 jully, 27 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.