26 Jully | 26 जुलै दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

26 Jully

26 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

दिनांक- 26/07/2023, 26 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 8

शके– 1945

सुविचार- अपयशाने डगमगू नका व यशाने फुशारून जाऊ नका.

Don’t be swayed by failure and don’t be proud of success.

म्हणी व अर्थ : अपयश हे मरणाहून वोखटे: अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे.

वाक्प्रचार- पाठीशी घालणे- संरक्षण देणे.

बातम्या

कोल्हापूर: पूरबाधित २८ गावातील शाळांना उद्यापासून सुट्टी, जिल्हाधिकाऱ्याचे आदेश
वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी, चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी; नागरिक, व्यापारी धास्तावले
मुंबई – सीएसटी स्थानकासामोरील आझाद मैदानकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसी डबल डेकर बसवर झाड कोसळले.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पण भीती कायम; ‘राधानगरी’ ९० टक्के भरले, ८३ बंधारे पाण्याखाली
नवी दिल्ली – मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधकांचा संसदेत गदारोळ, लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
मोहन भागवत, एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मदनदास देवींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
रत्नागिरी – मुसळधार पावसामुळे १९ गावात अंधार, ३७ खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडीत

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०७ वा किंवा लीप वर्षात २०८ वा दिवस असतो.

बारावे शतक

  • ११३९ – अफोन्सो पहिला पोर्तुगालच्या राजेपदी.

अठरावे शतक

  • १७८८ – न्यू यॉर्कने अमेरिकेचे संविधान मान्य केले व त्यायोगे अमेरिकेचे ११वे राज्य झाले.

एकोणिसावे शतक

  • १८४७ – लायबेरियाला स्वातंत्र्य.

विसावे शतक

  • १९३६ – जर्मनी व इतर मित्र देशांचा स्पॅनिश गृहयुद्धात हस्तक्षेप.
  • १९४१ – दुसरे महायुद्ध – जपानच्या नैऋत्य एशियातील शिरकावास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेतील जपानी मालमत्ता सरकारी ताब्यात घेण्याचा आदेश दिला.
  • १९४५ – युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत लेबर पार्टीचा विजय. विन्स्टन चर्चिलने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.
  • १९४७ – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
  • १९४८ – हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.
  • १९४८ – आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९५३ – क्युबन क्रांतीला सुरुवात.
  • १९५३ – अमेरिकेच्या अ‍ॅरिझोना राज्यात मोर्मोन पंथाच्या फंडामेंटालिस्ट चर्च ऑफ जिझस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स या बहुपत्नीत्त्व पाळणाऱ्या मूलतत्त्ववादी उपपंथावर कार्रवाई.
  • १९५६ – जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
  • १९५७ – ग्वाटेमालाच्या हुकुमशहा कार्लोस कॅस्टियो अर्मासची हत्या.
  • १९५८ – अमेरिकेने एक्स्प्लोरर ४ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
  • १९६३ – सिनकॉम २ या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • १९६३ – युगोस्लाव्हियातील स्कोप्ये शहरात भूकंप. १,१०० ठार.
  • १९६५ – मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९७१ – अमेरिकेच्या अपोलो १५ अंतराळयानाचे प्रक्षेपण.

एकविसावे शतक

  • २००५ – मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
  • २०११ – मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.

जन्म

  • १८७४ – शाहू महाराज, समाज सुधारक.
  • १०३० – संत स्टानिस्लॉ.
  • १६७८ – जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १८०२ – मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८५६ – जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक.
  • १८५८ – टॉम गॅरेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८७५ – कार्ल युंग, स्विस मनोवैज्ञानिक.
  • १९०८ – साल्व्हादोर अलेंदे, [[:वर्ग:चिलेचे राष्ट्राध्यक्ष|चिलेचे राष्ट्राध्यक्ष].
  • १९२७ – जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२८ – फ्रांसिस्को कॉसिगा, इटालियन प्रजासत्ताकचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२८ – स्टॅन्ली कुब्रिक, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
  • १९३९ – जॉन हॉवर्ड, ऑस्ट्रेलियाचा २५वा पंतप्रधान.
  • १९४२ – व्लादिमिर मेचियार, स्लोव्हेकियाचा पंतप्रधान.
  • १९४३ – मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.
  • १९४९ – थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.
  • १९६९ – जॉॅंटी ऱ्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ – खालेद महमुद, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ७९६ – ऑफा, मर्शियाचा राजा.
  • ८११ – निसेफोरस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १३८० – कोम्यो, जपानी सम्राट.
  • १४७१ – पोप पॉल दुसरा.
  • १८४३ – सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८६७ – ओट्टो, ग्रीसचा राजा.
  • १९५२ – एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.
  • २००९ – भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.

प्रतिवार्षिक पालन

  • राष्ट्रीय क्रांती दिन – क्युबा.
  • स्वातंत्र्य दिन – लायबेरिया, मालदीव.
  • विजय दिन – भारत (कारगिल युद्धाची समाप्ती).

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

ससा आणि कासव
एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल.
ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.
so ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” जो पर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससा पर्यंत आले and कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली.
ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससाच्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.
तात्पर्य :  कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण !
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता
खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
कवी : ग. दि. माडगूळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) अस्पृश्यांचा मुक्ती संग्राम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : शंकरराव खरात
२) ‘श्रीमान योगी ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : रणजित देसाई
३) ‘ ग्रामगीता ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
४) ‘ सनी डेज ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : सुनिल गावस्कर
५) ‘ तिमिरातून तेजाकडे ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : डाॅ.नरेंद्र दाभोळकर

ENGLISH QUESTION

1) What is the color of lemon?
Ans : Yellow
2) What is the color of buffalo?
Ans : Black
3) What is the color of milk ?
Ans : White
4) What colur is the sky ?
Ans : Blue
5) What color is the parrot?
Ans : Green

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#26 jully, 26 jully 2023, 26 jully 2021 panchang, 26 jully 2022 special day, 26 jully 2023 weather, 26 jully 2022 panchang in hindi, 26 jully is celebrated as, what is celebrated on 26 jully, 26 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.