15 June
15 जून दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– गुरुवार
दिनांक- 15/06/2023, 15 June
मिती- जेष्ठ कृ.12
शके– 1945
सुविचार- ज्ञान तेथे मान.
म्हणी व अर्थ-
- अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
– स्वतः च्या कृतीमुळे झालेल्या अडचणीसाठी दुसऱ्याला नावं ठेवणे . आपणच म्हशींवर बसून चाललोय तर म्हशीला बोलण्यात काय अर्थ की मला कुठे नेतेस !
मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
ठळक घटना आणि घडामोडी
दहावे शतक
- ९२३ – सॉइसॉंची लढाई – फ्रांसचा राजा रॉबर्ट पहिला मारला गेला.
बारावे शतक
- ११८४ – फिमराइटची लढाई – नॉर्वेचा राजा मॅग्नुस पाचवा मारला गेला.
तेरावे शतक
- १२१५ – इंग्लंडच्या राजा जॉनने मॅग्ना कार्टा मान्य केले मारला गेला.
चौदावे शतक
- १३८९ – कोसोवोची लढाई – ऑट्टोमन सैन्याने सर्बिया व बॉस्नियाच्या सैन्याला हरवले.
सोळावे शतक
- १५२० – पोप लिओ दहाव्याने एक्सर्जे डॉमने हा पोपचा फतवा काढून मार्टिन ल्युथरला वाळीत टाकण्याची धमकी दिली.
सतरावे शतक
- १६६७ – डॉ.ज्यॉं-बॅप्टिस्ट डेनिसने पहिल्यांदा मानवाला दुसऱ्याचे रक्त दिले.
अठरावे शतक
- १७५२ – बेंजामिन फ्रॅंकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.
- १७७५ – अमेरिकन क्रांती – जॉर्ज वॉशिंग्टनची खंडीय सेनेच्या नेतेपदी नेमणूक.
एकोणिसावे शतक
- १८०४ – अमेरिकेच्या संविधानातील बारावा बदल स्वीकृत.
- १८०८ – जोसेफ बोनापार्ट स्पेनच्या राजेपदी.
- १८३६ – आर्कान्सा अमेरिकेची २५वे राज्य झाले.
- १८४६ – ऑरेगोनचा तह – ४९० उत्तर अक्षांश अमेरिका व कॅनडामधील सीमा ठरवण्यात आली.
- १८५९ – ऑरेगोनच्या तहाबद्दलच्या गैरसमजूतीमुळे अमेरिका व कॅनडाच्या नागरिकांत युद्ध.
- १८८८ – विल्हेल्म दुसरा जर्मनीच्या कैसरपदी.
विसावे शतक
- १९०४ – न्यू यॉर्कमध्ये एस.एस. जनरल स्लोकम या बोटीला आग लागून १,००० मृत्युमुखी.
- १९११ – आय.बी.एम.च्या पूर्वज कंपनी टॅब्युलेटिंग कम्प्युटिंग रेकोर्डिंग कंपनीची स्थापना.
- १९४४ – दुसरे महायुद्ध – सैपानची लढाई सुरू.
- १९५४ – युएफाची स्थापना.
- १९९२ – अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की अमेरिकेला हव्या असलेल्या संशयितांना इतर देशांतून पळवून आणणे कायदेशीर आहे.
एकविसावे शतक
- २००२ – नियर अर्थ ऍस्टेरॉइड २००२ एम.एन. पृथ्वीपासून फक्त १,२०,००० कि.मी. (७५,००० मैल) दूरून गेला.
जन्म
- १८९८ – डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ आणि गीतेचे अभ्यासक.
- १९२९ – सुरैय्या, हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका.
- १९३३ – सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
- १९३८ – अण्णा हजारे, मराठी समाजसेवक.
मृत्यू
- १९३१ – अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.
- १९७१ – वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत- mp3
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना-
देह मंदिर चित्तमंदिर
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
बोधकथा-
लोभी राजा
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. इंद्रप्रस्थ एका आटपाट नगराचा राजा होता. त्याच्या राज्यात सर्व काही छान चालले होते. पण तरीही राजा अस्वस्थ होता. कारण त्याच्याकडे भरपूर धन होते. तरीही त्याला अजून धन मिळावे असे वाटे.
एके दिवशी त्याच्या दरबारात एक थोर तपस्वी येतो. राजा दोन दिवस त्यांची मनोभावे सेवा करतो. ते पाहून तो तपस्वी खूश होतो व त्याला म्हणतो, ’राजा, तू माझी जी सेवा केली त्याने मी प्रसन्न झालो आहे. तू पाहिजे तो वर माग’. तो लोभी राजा म्हणातो, ‘मला असा वर द्या की मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची होईल.’ तपस्वी म्हणतो, ‘नीट विचार कर. नंतर पश्चाताप करशील.’
राजा आपल्या मागणीवर ठाम असतो. तपस्वी तथास्तू म्हणतो. राजा लगेच शेजारच्या सिंहासनाला हात लावतो. ते सोन्याचे होते. तो खूष होतो. मग तो पुढे ज्या वस्तूंना हात लावतो, त्या सोन्याच्या व्हायला लागतात. थोड्यावेळाने त्याला भूक लागते. म्हणन तो फलाहार करायला जातो, पण ती फळेही सोन्याची होतात.
त्याला काहीच खाता, पिता येत नाही. कारण ज्याला तो हात लावी ते सोन्याचे होई. निराश झालेला राजा आपल्या सिंहासनावर बसलेला असताना त्याची मुलगी बागेतून खेळून त्याच्याकडे येते. तो आनंदातने तिला घेण्यासाठी हात करतो, तर ती ती सोन्याची होऊन जाते. राजा अतिशय दु:खी होतो.
त्याला एकदम रडू कोसळते. त्याची लाडकी मुलगी त्याला मिळालेल्या वरामुळे सोन्याची मूर्ती होऊन बसली होती. त्याला आपली चुक कळते, पण आता फार उशीर झालेला असतो.
तात्पर्य:- कोणत्याही गोष्टीचा अति लोभ वाईटच.
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत-
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
बालगीत-
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
संत ज्ञानेश्वर
महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठेआहे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदायात “माऊली” उच्चारताच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड दयावे लागले. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुखमिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्विकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. आपल्या मुलांवर समाजाने टाकलेला बहिष्कार परत घ्यावा ह्यासाठी उभयतांनी इंद्रायणीत आपला देहत्याग केला.
संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचे तेज लहानपणापासूनच जाणवायचे. त्याकाळी संस्कृत भाषेत असलेले ज्ञान केवळ विशिष्ट वर्गातच सिमित होते त्यासाठी वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला. so संत ज्ञानेश्वरानी भगवतगीतेचे सार सामान्यांसाठी मराठीत लिहिले. त्याव्यतिरिक्त हरिपाठ व पसायदान असे अध्यात्मिक लिखाणही लोकांसाठी केले.
hence लहानपणी आळंदी येथे वास्तव्यास असतांना ज्ञानेश्वर आणि and त्यांची भावंडे माधुकरी मागून जीवन कंठीत असत. एके दिवशी भाक-या थापण्यासाठी खापर कोणी दिले नाही. त्यावेळी छोटया मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी थापल्या. योगी चांगदेव वाघावर बसून माउलीकडे निघाले त्यावेळेला ज्ञानेश्वर त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडासह अर्धवट बांधलेल्या भिंतीवर बसून चाल करुन गेले . कर्मठ पंडीतासमोरही ज्ञानेश्वरांनी रेडयाच्या मुखी वेद बोलून दाखवला.
असे अनेक प्रसंग ज्ञानेश्वरांचे मोठेपण आणि दिव्यशक्तीचा प्रत्यय देतात. उभ्या महाराष्ट्राच्या ह्या माऊलींनी केवळ २२ वर्षांचे असतांना जीवंत समाधी घेतली.
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा
@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
#15 june, 15 june 2023, 15 june 2021 panchang, 15 june 2022 special day, 15 june 2023 weather, 15 june 2022 panchang in hindi, 15 june is celebrated as, what is celebrated on 15 june, 15 june 2022
DECLAIMER-
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.