16 June,16 जून दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

16 June

16 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– शुक्रवार

दिनांक- 16/06/2023, 16 June

मिती- जेष्ठ कृ.13

शके– 1945

सुविचार- त्यागात सर्व सुख आहे.

म्हणी व अर्थ-

अचाट खाणे मसणात जाणे– अतिरेक हा वाईटच , जसे भरपूर खाल्ल्यामुळे विविध आजार होऊन अखेर मृत्यू होतो.

मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर

ठळक घटना आणि घडामोडी

16 जून हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६७ वा किंवा लीप वर्षात १६८ वा दिवस असतो.

अठरावे शतक

  • १७७९ – स्पेनने ग्रेट ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले व जिब्राल्टरला वेढा घातला.

एकोणिसावे शतक

  • १८४६ – पोप पायस नववा पोपपदी.
  • १८५८ – अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई
  • १८९१ – जॉन ऍबट कॅनडाच्या पंतप्रधानपदी.

विसावे शतक

  • १९०३ – फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.
  • १९४० – दुसरे महायुद्ध – हेन्री फिलिप पेटें विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १८४६ – पोप पायस बाराव्याने हुआन पेरॉनला वाळीत टाकले.
  • १९६३ – व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा पहिली स्त्री अंतराळयात्री झाली.
  • १९७६ – दक्षिण आफ्रिकेच्या सोवेटो शहरात दंगलखोरांवर पोलिसांचा गोळीबार ५६६ विद्यार्थी ठार.
  • १९७७ – ऑरेकल कॉर्पोरेशनची सॉफ्टवेर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीझ नावाने स्थापना.
  • १९९४ – चीनचे तुपोलेव तू-१५४ प्रकारचे विमान कोसळले. १६० ठार.
  • १९९७ – दैरात लॅबग्वेरची कत्तल – अल्जीरियात ५० ठार.

जन्म

  • ११३९ – कोनो, जपानी सम्राट.
  • १६१२ – मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट.
  • १६३३ – ज्यॉं दि थिवेनो, फ्रेंच भटक्या.
  • १८०१ – जुलियस प्लकर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ.
  • १८०६ – एडवर्ड डेव्ही, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
  • १८२९ – जेरोनिमो, अपाचे नेता.
  • १८५८ – गुस्ताफ पाचवा, स्वीडनचा राजा.
  • १८७४ – आर्थर मेइघेन, कॅनडाचा नववा पंतप्रधान.
  • १८८८ – अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८८८ – पीटर स्टोनर, अमेरिकन गणितज्ञ व अंतराळतज्ञ.
  • १८९७ – जॉर्ज विट्टिग, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९१० – हुआन व्हेलास्को, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२० – हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
  • १९२० – जॉन हॉवर्ड ग्रिफिन, अमेरिकन लेखक.
  • १९२० – होजे लोपेझ पोर्तियो, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२७ – टॉम ग्रेव्हनी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३७ – सिमियॉन सॅक्से-कोबर्ग-गोथा, बल्गेरियाचा झार.
  • १९४१ – ऍल्ड्रिच एम्स, सी.आय.ए.त काम करणारा सोवियेत संघाचा हेर.
  • १९८६ – फरहाद रझा, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
  • १९९४ – आर्या आंबेकर, मराठी गायिका.

मृत्यू

  • १९२५ – देशबंधू चित्तरंजन दास, बंगालमधील कायदेपंडित.
  • १९३० – एल्मर ॲंब्रॉझी स्पेरी, अमेरिकन संशोधक.
  • १९७७ – श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक, नट.
  • २०२० – हरीभाऊ माधव जावळे, राजकारणी.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान- 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना-

इतनी शक्ती हमे देना दाता

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होना
हम चले नेक रस्ते में हम से, भुल कर भी कोई भूल हो ना॥धृ॥

दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमे ज्ञान की रोशनी दे।
हर बुराई से बचते रहें हम, जितनी भी दे भली जिंदगी दे।
बैर हो ना किसी का किसी से, भावना मन मे बदले की हो ना।
हम चले नेक रस्ते पे हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥१॥

हम ना सोचे हमे क्या मिला, हम ये सोचे किया क्या है अर्पण।
फुल खुशियों के बाँटे सभी को, सब का जीवन भी बन जाये मधुबन।
अपनी करुणा जल तू बहा के, कर दे पावन हर-एक मन का कोना।
हम चले नेक रस्ते में हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥२॥

बोधकथा-

विहिरीतील पाणी कुणाचे

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रामपूर नावाचे गाव होते. त्या गावात महादेव नावाचा शेतकरी राहत होता. तो फार मेहनती होता. त्याच्या शेताच्या बाजूलाच सुखदेवचे शेत होते. सुखदेव आळशी होता.तो महादेवच्या शेतातील पीक पाहून नेहमी जाळायचा.

महादेव निसर्गाच्या पाण्यावर शेती करायचा. सुखदेवच्या शेतात विहीर होती. मात्र विहीर असूनही सुखदेव मेहनत घेत नसल्याने त्याला कमी उत्पन्न व्हायचे. परिणामी सुखदेवने त्याच्या क्षेत्रांपैकी काही भाग विकायचा निर्णय घेतला. जो भाग सुखदेव विकनार होता त्यात विहीर येत होती.

महादेवाला तर विहीर हवीच होती. म्हणून मग त्याने सुखदेवकडून जमिनीसोबत विहीर विकत घेतली. आता आपण आणखी चांगल्यारीत्या पीक घेऊ शकू या आनंदात महादेव होता. त्या आनंदात त्याला झोपच लागली नव्हतं. केव्हा शेतात जातो आणि काम सुरु करतो असे त्याला वाटत होते.

दुसऱ्या दिवशी

तो सकाळीच उठून शेतात गेला. विहिरीपाशी पोचला तर तेथे पाहतॊ काय? सुखदेवने विहिरीवर झाकण लावून त्याला कुलूप लावलेलं आहे. आणि तो बाजूलाच उभा आहे. त्याला असे करण्याचे कारण विचारले तर म्हणाला की ” मी तुला विहीर विकली आहे. विहिरींमधील पाणी नाही.”

त्याचे बोलणे ऐकून महादेवाला समजून आले की  याच्या मनात लबाडी आहे आणि उगाच त्रास देण्यासाठी हा असले काम करतोय. महादेवने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी महादेव त्यांचा तंटा पंचायतीमध्ये घेऊन गेला.

पंचायतीमध्ये पंचांनी दोन्ही बाजूचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले. त्यांना कळत होते कि सुखदेव लबाडी करतोय. त्याचे वागणे  योग्य नाही.पण त्याच्या मुद्द्याला तोडणेसुद्धा शक्य नव्हते. कारण कागदोपपात्री फक्त विहिरीचा उल्लेख होता. विहिरीतील पाण्याचा नव्हता.

सर्वांना तर वाटायला लागले होते कि आता महादेव वर अन्याय होणार आहे. आणि तो सर्वांना मान्यही करावा लागणार आहे. पण ऐनवेळी एका म्हाताऱ्या पंचाला तोडगा सुचला. पंच सुखदेवला म्हणाला की  ” तू तर विहीर विकली आहेस. तेव्हा तुला तिच्यात तुझे पाणी ठेवण्याचा काही हक्क नाही. “

“एकतर तुझे पाणी घेऊन जा किंवा महादेवचा त्या पाण्यावरचा हक्क मान्य कर. आणि पुन्हा त्या विहिरीकडे फिरू नकोस. ” सुखदेवला कळून चुकले होते कि आपण आपल्याच फासामध्ये चांगलेच फसलो आहोत. तेव्हा त्याने आपला हट्ट सोडला आणि महादेवची क्षमा मागून तेथून निघून गेला.

तात्पर्य- बरेचदा आपण दुसऱ्यासाठी तयार केलेला फास आपल्याच गळ्याभोवती आवळला जातो. मात्र दुसऱ्यासाठी केलेली मदत आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने परत येते. 

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत-

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

सदा शक्ति बरसाने वाला,

प्रेम सुधा सरसाने वाला

वीरों को हरषाने वाला

मातृभूमि का तन-मन सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

स्वतंत्रता के भीषण रण में,

लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,

काँपे शत्रु देखकर मन में,

मिट जावे भय संकट सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

इस झंडे के नीचे निर्भय,

हो स्वराज जनता का निश्चय,

बोलो भारत माता की जय,

स्वतंत्रता ही ध्येय हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

आओ प्यारे वीरों आओ,

देश-जाति पर बलि-बलि जाओ,

एक साथ सब मिलकर गाओ,

प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

इसकी शान न जाने पावे,

चाहे जान भले ही जावे,

विश्व-विजय करके दिखलावे,

तब होवे प्रण-पूर्ण हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

बालगीत-

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

कवी : मंगेश पाडगावकर

संत ज्ञानेश्वर

महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे महत्त्व खूपच मोठेआहे. कष्टकरी जनसामान्यांच्या वारकरी संप्रदायात “माऊली” उच्चारताच संत ज्ञानेश्वर महाराज वारक-यांच्या मनात येतात. वारकरी संप्रदायामध्ये माऊलींचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी आपले सर्व जीवन पांडुरंगाच्या भक्तीत तसेच लोककार्यासाठी वाहून दिले. त्याकाळी ज्ञानोबा व त्यांच्या भावडांना खूप मोठ्या त्रासाला तोंड दयावे लागले. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व आई रुखमिणी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्विकारल्याचे प्रायश्चित म्हणून गावक-यांनी त्यांना देहांताची शिक्षा दिली. आपल्या मुलांवर समाजाने टाकलेला बहिष्कार परत घ्यावा ह्यासाठी उभयतांनी इंद्रायणीत आपला देहत्याग केला.

संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाचे तेज लहानपणापासूनच जाणवायचे. त्याकाळी संस्कृत भाषेत असलेले ज्ञान केवळ विशिष्ट वर्गातच सिमित होते त्यासाठी वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला. so संत ज्ञानेश्वरानी भगवतगीतेचे सार सामान्यांसाठी मराठीत लिहिले. त्याव्यतिरिक्त हरिपाठ व पसायदान असे अध्यात्मिक लिखाणही लोकांसाठी केले.

hence लहानपणी आळंदी येथे वास्तव्यास असतांना ज्ञानेश्वर आणि and त्यांची भावंडे माधुकरी मागून जीवन कंठीत असत. एके दिवशी भाक-या थापण्यासाठी खापर कोणी दिले नाही. त्यावेळी छोटया मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी थापल्या. योगी चांगदेव वाघावर बसून माउलीकडे निघाले त्यावेळेला ज्ञानेश्वर त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडासह अर्धवट बांधलेल्या भिंतीवर बसून चाल करुन गेले . कर्मठ पंडीतासमोरही ज्ञानेश्वरांनी रेडयाच्या मुखी वेद बोलून दाखवला.

असे अनेक प्रसंग ज्ञानेश्वरांचे मोठेपण आणि दिव्यशक्तीचा प्रत्यय देतात. उभ्या महाराष्ट्राच्या ह्या माऊलींनी केवळ २२ वर्षांचे असतांना जीवंत समाधी घेतली.

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

#16 june, 16 june 2023, 16 june 2021 panchang, 16 june 2022 special day, 16 june 2023 weather, 16 june 2022 panchang in hindi, 16 june is celebrated as, what is celebrated on 16 june, 16 june 2022

DECLAIMER-

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.