17 June
17 जून दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– शनिवार
दिनांक- 17/06/2023, 17 June
मिती- जेष्ठ कृ.14
शके– 1945
सुविचार- सुंदर अक्षर हाच खरा दागिना.
म्हणी व अर्थ-
- अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
– एखादी संशयास्पद वाईट घटना घडली कि त्याच्याशी संबंधित संशयित कुठेतरी घटनास्थळापासून लांब गेलेले असल्याचे कानावर येते ,पळवाटा काढण्यासाठी तीर्थक्षेत्री गेले आहेत अशा बातम्याही कानावर येतात.
मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
ठळक घटना आणि घडामोडी
विवेक बोरकर यांचा जन्म-17/06/2004
17 जून हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६८ वा किंवा लीप वर्षात १६९ वा दिवस असतो.
सोळावे शतक
- १५७९ – सर फ्रांसिस ड्रेकने नोव्हा आल्बियोन (सध्याचे कॅलिफोर्निया) इंग्लंडचा भाग असल्याचे जाहीर केले.
अठरावे शतक
- १७७५ – अमेरिकन क्रांती – बंकर हिलची लढाई.
एकोणिसावे शतक
- १८३९ – हवाईचा राजा कामेहामेहा तिसऱ्याने रोमन कॅथोलिक लोकांना धर्मस्वातंत्र्य दिले.
- १८८५ – स्वतंत्रतादेवीचा पुतळा न्यू यॉर्कला पोचला.
- १९३३ – कुख्यात दरोडेखोर फ्रॅंक नॅशच्या साथीदारांनी त्याला सोडवण्यासाठी कॅन्सस सिटी, मिसूरीच्या रेल्वे स्थानकावर अंदाधुंद गोळीबार केला. चार एफ.बी.आय. अधिकारी व स्वतः नॅश ठार.
विसावे शतक
- १९४० – दुसरे महायुद्ध-ऑपरेशन एरियेल – दोस्त सैन्यांनी फ्रांसमधून माघार घेण्यास सुरुवात केली.
- १९४० – दुसरे महायुद्ध-एस्टोनिया, लात्व्हिया व लिथुएनिया सोवियेत संघाच्या आधिपत्याखाली.
- १९४४ – आइसलॅंड प्रजासत्ताक झाले.
- १९४८ – युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ६२४ हे डी.सी.-६ प्रकारचे विमान माउंट कार्मेल, पेनसिल्व्हेनियाजवळ कोसळले. ४३ ठार.
- १९५३ – पूर्व जर्मनीत दंगेखोर कामगारांना दडपण्यासाठी सोवियेत संघाने सैन्य पाठवले.
- १९६३ – अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
- १९७२ – वॉटरगेट कुभांड – डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यालय फोडून कागदपत्रे पळवल्याबद्दल रिचर्ड निक्सनच्या चार साथीदारांना अटक.
- १९८२ – रोबेर्तो कॅल्व्हीची हत्या.
- १९९१ – दक्षिण आफ्रिकेत बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
- १९९४ – आपली पत्नी निकोल ब्राउन सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनचा खून केल्याबद्दल ओ.जे. सिम्पसनला अटक.
एकविसावे शतक
- २०१३ – भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी (१३ इंच पाउस) पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.
जन्म
- १२३९ – एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १६८२ – चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.
- १६९१ – जियोव्हानी पाओलो पनिनी, इटालियन चित्रकार व स्थपती.
- १८६७ – जॉन रॉबर्ट ग्रेग, लघुलेखन पद्धतीचा शोधक.
- १८९८ – कार्ल हेर्मान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०२ – ऍलेक हरवूड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९२० – फ्रांस्वा जेकब, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ.
- १९३० – ब्रायन स्टॅधाम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३ – लियॅंडर पेस, भारतीय टेनिसपटू.
- १९८० – व्हिनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू.
- १९८१ – शेन वॉट्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- जिजाबाई, शिवाजी महाराजांची आई.
- १८५८ – राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी(लढाईत).
- १८९५ – गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक, विचारवंत.
- १९९६ – मधुकर दत्तात्रेय देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
- २००४ – इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत-
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान-
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना-
देह मंदिर चित्त मंदिर
देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थनाऽऽऽ
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना ।।धृ.॥
जीवनी नवतेज राहो, अंतरंगी भावनाऽऽऽ
सुंदराचा वेध लागो, मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, ध्यैर्य लाभो, सत्यता संशोधना॥१॥
सत्य, सुंदर मंगलाची…
भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासनाऽऽऽ
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू, बंधुतेच्या बंधना।।२।।
सत्य, सुंदर मंगलाची…
दुःखितांचे दुःख जावो, ही मनाची कामनाऽऽऽ
वेदना जाणावयाला, जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला, पौरुषाची साधना ॥३॥
सत्य, सुंदर मंगलाची…
@_प्रार्थना अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
बोधकथा-
बढाईखोर माणूस
एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही.
तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ?
या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.
तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत-
बल सागर भारत होओ
बलसागर भारत होओ,
विश्वात शोभुनी राहो ॥धृ॥
हे कंकण करि बांधियेले
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले
मी सिद्ध मरायाला हो। बलसागर…॥१॥
वैभवी देश चढवीन
सर्वस्व त्यास अीन
तिमिर घोर संहारीन
या बंधु सहायाला हो । बलसागर… ॥२॥
हातात हात घेऊन
हृदयात हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो। बलसागर… ॥३॥
करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दाऊ
ही माय निजपदा लाहो। बलसागर… ॥४॥
या उठा! करू हो शर्थ
संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो। बलसागर… ॥५॥
ही माय मुक्त होईल
वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांती देईल
तो सोन्याचा दिन येवो। बलसागर… ॥६॥ – साने गुरुजी
@_देशभक्तीपर गीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
बालगीत-
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
छान छान गोष्टी
उंदराची टोपी
उंदराची टोपी एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.
उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ‘ राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !’ राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ‘ जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’ शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली.
मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ‘राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_सुविचार अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_म्हणी विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_देशभक्तीपर गीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_प्रार्थना अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा
@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
#17 june, 17 june 2023, 17 june 2021 panchang, 17 june 2022 special day, 17 june 2023 weather, 17 june 2022 panchang in hindi, 17 june is celebrated as, what is celebrated on 17 june, 17 june 2022
DECLAIMER-
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.