20 June
20 जून दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– सोमवार
दिनांक- 20/06/2023, 20 June
मिती- आषाढ शुक्ल 2
शके– 1945
सुविचार- “सुखात इतरांना वाटेकरी केले तर ते वाढत राहते, दुःखात इतरांचे सहकार्य मिळाले तर ते कमी होते.”
म्हणी व अर्थ-
- अंधारात अत्तराचे दिवे लावणे.
– अति श्रीमंतीचा बडेजाव मिरवण्याच्या नादात मूळ गरजेकडे दुर्लक्ष होणे. म्हणजे मूळ गरज अंधार नाहीसा करून दिव्याच्या माध्यमातून प्रकाश पसरवणे पण श्रीमंतीच्या दिखाव्याच्या नादात तेलाऐवजी अत्तर घातले तर ते दिवे कसे प्रकाश देतील?
मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
ठळक घटना आणि घडामोडी-
जून २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७१ वा किंवा लीप वर्षात १७२ वा दिवस असतो.
सतरावे शतक-
- १६३१ – आयर्लंडमधील बाल्टिमोर शहर अल्जीरियाच्या चाच्यांनी लुटले.
अठरावे शतक-
- १७५६ – कोलकाताचा फोर्ट विल्यम हा ब्रिटीश किल्ला जिंकल्यावर बंगालच्या नवाब सिराज उद् दौलाने ब्रिटीश सैनिकांना तुरुंगात डांबले.
- १७८२ – अमेरिकेच्या कॉॅंग्रेसने राष्ट्रमुद्रा ठरवली.
- १७८९ – पॅरिसमध्ये सुमारे ५०० लोकप्रतिनिधींनी टेनिस कोर्टवरील शपथ घेतली व फ्रेंच क्रांतीला बळ दिले.
- १७९१ – फ्रेंच क्रांतीत आपले मरण असल्याचे ओळखून फ्रेंच राजघराण्याने व्हारेनला पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला.
एकोणिसावे शतक-
- १८३७ – व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी.
- १८६२ – रोमेनियाचा पंतप्रधान बार्बु कटार्जुची हत्या.
- १८६३ – वेस्ट व्हर्जिनीया अमेरिकेचे ३५वे राज्य झाले.
- १८७७ – अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने कॅनडातील हॅमिल्टन शहरात व्यापारी तत्त्वावर चालणारा प्रथम दूरध्वनी बसवला.
विसावे शतक-
- १९१९ – मायाग्वेझ, पोर्तोरिको येथील तियात्रो याग्वेझ या नाट्यगृहाला आग. १५० ठार.
- १९५६ – व्हेनेझुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
- १९६० – मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६० – सेनेगालला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६९ – जॉक शबान-देल्मास फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतक-
- २००१ – परवेझ मुशर्रफ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जन्म-
- १००५ – अली अझ-झहीर, खलिफा.
- १५६६ – सिगिस्मंड तिसरा, पोलंडचा राजा.
- १६३४ – चार्ल्स इमॅन्युएल, सव्हॉयचा राजा.
- १८६० – जॅक वॉराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, फुटबॉलपटू व प्रशिक्षक.
- १८६९ – लक्ष्मणराव किर्लोस्कर, मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक.
- १९३९ – रमाकांत देसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४६ – जनाना गुस्माव, पूर्व तिमोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४८ – लुडविग स्कॉटी, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५४ – ऍलन लॅम्ब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७२ – पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-
- ४५१ – थियोडोरिड, व्हिझिगॉथ राजा.
- ८४० – भक्त लुई, फ्रॅंक राजा.
- १६६८ – हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृत भाषाप्रवण.
- १८३७ – विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.
- १९१७ – जेम्स मेसन क्राफ्ट्स, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९९७ – बासू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९९७ – वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर, मराठीतील प्रथम शायर.
- २००८ – चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन-
- ध्वज दिन – आर्जेन्टिना.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत-
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान-
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना-
सत्यं शिवं सुंदरा
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यं शिवं सुंदरा ।।धृ।।
शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ॥१॥
विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतिरी दयासागरा।।२।।
होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धीमंत
कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा।।३।।
@_प्रार्थना अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
बोधकथा-
अरण्य व लाकूडतोड्या
एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला.
लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्याला नावं ठेवायला जागा नाही.’
तात्पर्य– शत्रूची कीव करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
शत्रूवरही उपकार करण्यात, त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे. हे जरी खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्यालाच उपद्रव देऊ शकेल. अशा प्रकारचे साह्य त्याला देणे हा मूर्खपणा होय.
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत-
इतनी शक्ती हमे देना दाता
इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होना
हम चले नेक रस्ते में हम से, भुल कर भी कोई भूल हो ना॥धृ॥
दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमे ज्ञान की रोशनी दे।
हर बुराई से बचते रहें हम, जितनी भी दे भली जिंदगी दे।
बैर हो ना किसी का किसी से, भावना मन मे बदले की हो ना।
हम चले नेक रस्ते पे हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥१॥
हम ना सोचे हमे क्या मिला, हम ये सोचे किया क्या है अर्पण।
फुल खुशियों के बाँटे सभी को, सब का जीवन भी बन जाये मधुबन।
अपनी करुणा जल तू बहा के, कर दे पावन हर-एक मन का कोना।
हम चले नेक रस्ते में हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥२॥
@_देशभक्तीपर गीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
बालगीत-
ए आई मला पावसात जाउ दे
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे
कवियत्री : वंदना विटणकर
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
छान छान गोष्टी
कावळा
एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरट्यात राहत होते. त्याच झाडाखालील बिळात एक साप रहात होता. हा साप त्या कावळ्यांची नजर चुकवून पिल्ले खाऊन टाकी.
दरवेळी असे झाल्याने कावळा-कावळी खूपच दु:खी होते. त्या सापाचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात ते जोडपे नेहमी असे. जवळच एक कोल्हा रहात होता. त्या कोल्ह्याकडे जाऊन सापाचा बंदोबस्त करता येतो का ते विचारण्यासाठी कावळ्याने त्याची भेट घेतली.
कावळा कोल्ह्यास म्हणाला, ”दरवेळी आमची पिल्ले हा दुष्ट साप खाऊन टाकतो. या सापाला ठार मारण्याचा काही उपाय सांगशील तर उपकार होतील.” कोल्हा म्हणाला, ”एखादेवेळी छोटासा प्राणी युक्तीने जी गोष्ट करतो तीच गोष्ट मोठा प्राणीही करू शकत नाही.”
कोल्ह्याने विचार बराच केला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. त्याने ती कावळ्याला ऐकवली, ”एखाद्या नगरात जाऊन श्रीमंत किंवा राजघराण्यातील मौल्यवान वस्तू किंवा दागिना घेउन ये आणि त्या सापाच्या बिळात टाक.
ज्याची वस्तू आहे तो तुमच्या पाठलागावर असणारच. बिळातली वस्तू काढण्यासाठी प्रथम सापाला ठार मारतील व आपली वस्तू ते घेऊन जातील.”
कावळ्यातला हा उपाय एकदम पटला. कावळा लगेच जवळच्या राजधानीत गेला. तेथील एका सरोवराजवळ काही राजस्त्रिया स्नान करीत होत्या. स्नानासाठी त्या स्त्रियांनी अंगावरचे दागिने काठावरच काढून ठेवले होते.
कावळ्याने एक मौल्यवान हार उचलला आणि उडत जाऊ लागला. त्याच्यामागून राजाचे शिपाई धावत होते.
कावळ्याने तो हार बरोबर त्या सापाच्या बिळात टाकला. ते बघून शिपाई बिळ उकरू लागले. तेव्हा तो साप बाहेर आला.
त्याबरोबर त्या शिपायांनी त्याला भाल्याने ठार मारले आणि तो हार घेऊन ते निघून गेले. कावळ्याच्या जोडप्याची चिंता दूर झाल्याने ते खुषीत होते.
उपदेश : काही प्रसंगी शूरांच्या शक्तीपेक्षा क्षुद्राची युक्तीच श्रेष्ठ ठरते.
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_सुविचार अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_म्हणी विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_देशभक्तीपर गीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_प्रार्थना अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा
@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
#20 june, 20 june 2023, 20 june 2021 panchang, 20 june 2022 special day, 20 june 2023 weather, 20 june 2022 panchang in hindi, 20 june is celebrated as, what is celebrated on 20 june, 20 june 2022
DECLAIMER-
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.