19 June | 19 जून दिनविशेष शालेय परिपाठ, Daily Routine

19 June

19 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– सोमवार

दिनांक- 19/06/2023, 19 June

मिती- आषाढ शुक्ल 1

शके– 1945

सुविचार- “पावसानंतर ऊन जसे सुखदायक असते, तसे प्रेम हे आत्माला सुख देणारे असते.”

म्हणी व अर्थ-

  • अडली गाय खाते काय.
    – गायीला पिल्लू होताना असंख्य वेदना होत असतात अशावेळी ती तहानभूक हरवून बसलेली असते ह्याच अर्थाने एखादी व्यक्ती आधीच संकटात असेल तर त्या व्यक्तीला दैनंदिन गोष्टीत जसे खाणे ,पिणे ह्यात विशेष रस नसतो.

मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर

ठळक घटना आणि घडामोडी-

महाकवी कालिदास दिन

19 जून हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७० वा किंवा लीप वर्षात १७१ वा दिवस असतो.

तेरावे शतक

  • १२६९ – फ्रांसचा राजा लुई नवव्याने ज्यू व्यक्तींना जाहीर ठिकाणी पिवळे फडके न घालता आढळल्यास १० लिव्रचा दंड फर्मावला.

चौदावे शतक

  • १३०६ – मेथ्वेनची लढाई.

अठरावे शतक

  • १७७० – इमॅन्युएल स्विडेनबर्गने येशू ख्रिस्त पुन्हा जन्मल्याची नांदी केली.

एकोणिसावे शतक

  • १८६२ – अमेरिकेने आपल्या प्रांतातील गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली.
  • १८६५ – अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
  • १८६७ – मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्यूदंड.

विसावे शतक

  • १९१२ – अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.
  • १९४३ – बोमॉॅंट, टेक्सास येथे वांशिक दंगल.
  • १९६१ – कुवैतला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९६६ – शिव सेना या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
  • १९७८ – गारफील्ड या कार्टून व्यक्तिमत्त्वाचे वर्तमानपत्रात पदार्पण.

जन्म

  • १३०१ – राजकुमार मोरिकुनी, जपानी शोगन.
  • १५६६ – जेम्स पहिला, इंग्लंडचा राजा.
  • १६२३ – ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
  • १७६४ – होजे गेर्व्हासियो आर्तिगास, उरुग्वेचा राष्ट्रपिता.
  • १८९६ – वॉलिस सिम्प्सन, इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.
  • १९०३ – वॉली हॅमंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४१ – वाक्लाव क्लाउस, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४५ – ऑॅंग सान सू की, म्यानमारची राजकारणी.
  • १९४७ – सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक.
  • १९७० – राहुल गांधी, भारतीय राजकारणी.

मृत्यू

  • १८६७ – मॅक्सिमिलियन पहिला, मेक्सिकोचा सम्राट (जन्म-१८३२), मृत्यूदंड.
  • १९०२ – आल्बर्ट, सॅक्सनीचा राजा.

प्रतिवार्षिक पालन

  • जून्टीन्थ – अमेरिका

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||



@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा



राज्यगीत-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान- 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना-

खरा तो एकचि धर्म

खरा तो एकचि धर्म।
जगाला प्रेम अर्पावे ॥धृ॥

जगी जे हीन अतिपतित,
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे।
जगाला प्रेम अर्पावे ॥१॥

सदा जे आर्त अति विकल,
ज्यांना गांजिती सकल
तया जाऊन हसवावे।
जगाला प्रेम अर्पावे।।२।।

कुणा ना व्यर्थ शिणवावे,
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावें।
जगाला प्रेम अर्पावे ॥३॥

प्रभुची लेकरे सारी,
तयाला सर्व ही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावें
जगाला प्रेम अर्पावे॥४॥

असे हे सार धर्माचे,
असे हे सार सत्याचे
परार्था प्राण ही द्यावे।
जगाला प्रेम अर्पावे ॥5॥

@_प्रार्थना अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

बोधकथा-

स्वार्थी मांजर

एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीनअसे रागाने म्हटले.

ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली.

थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्‍या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला.

एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली.

वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.

तात्पर्यस्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत-

हम होंगे कामयाब

होंगे कामयाब हम होंगे कामयाब
हम होंगे कामयाब-एक दिन
मन में है विश्वास,
पूरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन ॥धृ.॥

हम चलेंगे साथ-साथ,
डाल हाथों में हाथ
हम चलेंगे साथ-साथ
मन में है विश्वास
पूरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन।
होंगी शांती चारो और (२)

होंगी शांती चारो और एक दिन
मन में है विश्वास,
पूरा है विश्वास,
हम होंगे कामयाब एक दिन (२)

होंगी जीत सच्चाई की
होंगी जीत सचाई की एक दिन
मन मे है विश्वास
पूरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन (२)

युग बदलेगा चारो और
युग बदलेगा चारो और एक दिन
मन में हे विश्वास
पूरा हैं विश्वास
हम होंगे कामबाब एक दिन॥

@_देशभक्तीपर गीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा



बालगीत-

आपडी थापडी
आपडी थापडी गुळाची पापडी

धम्मक लाडू तेल काढू !

तेलंगीचे एकच पान दोन हाती धरले कान !

चाउ माउ चाउ माउ !

पितळीतले पाणी पिऊ हंडा पाणी गडप !

गुळाची पापडी हडप !
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

छान छान गोष्टी 

घामाचा पैसा

धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.

दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल’ मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला.

शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला.

काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. ‘साहेब, इकडे आणा’. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला.

साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. ‘बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?’ शेठजींनी त्याला जवळ घेतले.

पाठीवरून हात फिरवला, ‘बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.’ स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_सुविचार अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_म्हणी विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_देशभक्तीपर गीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_प्रार्थना अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

#19 june, 19 june 2023, 19 june 2021 panchang, 19 june 2022 special day, 19 june 2023 weather, 19 june 2022 panchang in hindi, 19 june is celebrated as, what is celebrated on 19 june, 19 june 2022

DECLAIMER-

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.