18 June | 18 जून दिनविशेष, शालेय परिपाठ,Daily Routine

18 June

18 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– रविवार

दिनांक- 18/06/2023, 18 June

मिती- जेष्ठ कृ.15

शके– 1945

सुविचार- ध्येर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. “

म्हणी व अर्थ-

  • अडला हरी गाढवाचे पाय धरी.
    – शहाण्या माणसांनाही वेळ प्रसंगी मुर्खांची मनधरणी करावी लागते. प्रसंगानुरूप वागावे.

मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर

ठळक घटना आणि घडामोडी-

जून १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६९ वा किंवा लीप वर्षात १७० वा दिवस असतो.

अठरावे शतक

  • १७६७- सॅम्युएल वॉलिस ताहितीला पोचणारा पहिला युरोपीय झाला.
  • १७७८- अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैन्याने फिलाडेल्फियातून पळ काढला.

एकोणिसावे शतक

  • १८१२- १८१२ चेयुद्ध – अमेरिकेने युनायटेड किंग्डमविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १८१५- वॉटर्लूच्या युद्धानंतर नेपोलियन बोनापार्टने फ्रांसचे राज्य सोडले.

विसावे शतक

  • १९००- चीनने देशातील बाल-स्त्रीयांसकट सगळ्या परदेशी व्यक्तींना ठार मारण्याचा हुकुम सोडला.
  • १९०८- ७८१ जपानी व्यक्ती पेरूच्या किनाऱ्यावर पोचले.
  • १९५३- इजिप्त प्रजासत्ताक झाले.
  • १९५३ – अमेरिकेचेसी.-१२४ प्रकारचे विमान टोक्योजवळ कोसळले. १२९ ठार.
  • १९५४- पिएर मेंडेस-फ्रांस फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९७९- अमेरिका व सोवियेत संघात सॉल्ट २ तह.
  • १९८३- सॅली राइड पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री झाली.

एकविसावे शतक

  • २००६- कॅझसॅट या कझाकस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • २०१३- भारताच्या उत्तराखंड राज्यात मुसळधार पाउस पडून मंदाकिनी व अलकनंदा नद्यांना महापूर. शेकडो मृत्युमुखी, हजारो बेघर.

जन्म

  • १५१७- ओगिमाची, जपानी सम्राट.
  • १५५२- गॅब्रियेलो चियाब्रेरा, इटालियन कवी.
  • १८१२- इव्हान गॉन्चारोव्ह, रशियन लेखक.
  • १९१५- रेड अडेर, अमेरिकन अग्निशामक.
  • १८१८- जेरोम कार्ल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९३१- फर्नान्डो हेनरिके कार्दोसो, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३२- डडली आर. हर्शबाख, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९३७- जॉन डी. रॉकेफेलर चौथा, अमेरिकन सेनेटर.
  • १९४२- सर पॉल मॅककार्टनी, इंग्लिश संगीतकार.
  • १९४२ -थाबो म्बेकी, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४९- लेक कझिन्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४९ -यारोस्लॉ कझिन्स्की, पोलंडचा पंतप्रधान, लेक कझिन्स्कीचा जुळा भाऊ.
  • १९६४- उदय हुसेन, इराकी नेता.

मृत्यू

  • १९०१- रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार या मासिकाचे संपादक.
  • १९७१- पॉल कारर, स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९९९- श्रीपाद रामकृष्ण काळे, मराठी साहित्यिक
  • २००३- जानकीदास, भारतीय चरित्र अभिनेता.

प्रतिवार्षिक पालन

  • राष्ट्र दिन -सेशेल्स.
  • वॉटरलू दिन -युनायटेड किंग्डम.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान- 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना-

तुम ही हो माता

तुम ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो॥धृ॥

तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे
कोई न अपना, सिवा तुम्हारे
तुम्ही हो नैया, तुम्ही खिवय्या॥१॥

जो खिल सके ना, वो फूल हम है
तुम्हारे चरणों की धूल हम है।
दया की दृष्टी सदा ही रखना॥२॥

@_प्रार्थना अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

बोधकथा-

वेळेचे महत्त्व

एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले.

काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे.

व त्यांचा पाठलाग करावा.हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला.

लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.

तात्पर्य-

जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत-

या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।

आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥

शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।

शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥

@_देशभक्तीपर गीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

बालगीत-

असं हे बालपण!

बोलक पसरून खुदुखुदु हसायचं,

भोकाड पसरून धो-धो रडायचं !

घर-भर फिरायचं, हव ते मागायचं,

कोणालाच नाही जुमानायचं,

असं हे बालपण ! असं हे बालपण !

गोड गोड गोजिरवाणी !

देवाजीच सुंदर लेण !

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

छान छान गोष्टी 

राक्षस, चोर आणि ब्राह्मण

एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या.
दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं.

एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.
द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती.

सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली.

परस्परांनी एकमेकांना ‘तू कुठे अन् का जातोस,’ ते विचारलं.
चोर म्हणाला, ‘मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे.

पण तू कुठे चालला आहेस?’ 
अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे.

ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे.

झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता.

राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!
तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू?
राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना.

असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली.
त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही.

ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले.

त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला.

तात्पर्य :

फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_सुविचार अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_म्हणी विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_देशभक्तीपर गीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_प्रार्थना अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

#18 june, 18 june 2023, 18 june 2021 panchang, 18 june 2022 special day, 18 june 2023 weather, 18 june 2022 panchang in hindi, 18 june is celebrated as, what is celebrated on 18 june, 18 june 2022

DECLAIMER-

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.