शालेय गणवेश | shaley ganvesh | School Uniform, एक राज्य एक गणवेश

शालेय गणवेश

shaley ganvesh, गणवेश कसा?

School Uniform, एक राज्य एक गणवेश

एक राज्य एक गणवेश

येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात ” एक राज्य एक गणवेश “योजना राज्य सरकार राबविणार आहे. यामुळे राज्यातील सर्व सरकारी शाळेत एकच गणवेश लागू होईल.

मात्र काही शाळांनी या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा व तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

या योजनेमुळे यंदा राज्यात 25000 सरकारी शाळांमधील 64 लाख 28 हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. काही शाळांनी कपड्यांची ऑर्डर दिल्यामुळे अशा शाळांमध्ये शाळेने ठरवून दिलेला गणवेश सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस परिधान करतील; तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस परिधान करतील असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

असा असेल शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश

आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पॅन्ट असा हा गणवेश असेल,

मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल,

जर शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची आणि कमीज आकाशी रंगाचा असेल असेही केसरकर म्हणाले.

मुलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असावी या भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे.

गणवेश स्काऊट गाईडची साधर्म्य साधणारा असेल असेही ते म्हणाले. बूट आणि मोजेही देण्यात येतील.यापूर्वी मागासवर्गीय मुलांना गणवेश देत होतो आता सर्व मुलांना गणवेश दिला जाईल. आमचा निर्णय सरकारी शाळांसाठी आहे मात्र खाजगी शाळांतील मुलांना ही गणवेश देण्याचा मानस असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात खालील प्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.

प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसूचित जाती व जमाती मधील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना दोन गणवेशाचा लाभ देण्यात येतो.

मात्र तसेच उपरोक्त शाळांमधील दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील सन 2023 24 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
प्रस्तुत योजनेअंतर्गत केवळ सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापुरता एका गणवेशाचा लाभ पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देणार देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित एका गणवेशाचा लाभ शासनामार्फत या शैक्षणिक वर्षांमध्ये देण्यात येणार आहे. प्रस्तुत योजना अंतर्गत यापुढे राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना एकसमान एक रंगाचा दर्जेदार गणवेशाचा लाभ देण्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीस शासनामार्फत गणवेशाचे कापड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदर कापडापासून महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत नोंदणीकृत असलेल्या जवळच्या महिला बचत गट संस्था यांच्याकडून तसेच नजीकच्या ठिकाणी बचत गट नसेल तर स्थानिक शिवणदारांकडून शिलाई शाळा व्यवस्थापन समितीने करून सदर दोन गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गणवेशाचा गणवेशाच्या शिलाईचा खर्च शाळा व्यवस्थापन समिती शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल.

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

DECLAIMER-

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.