4 December | 4 डिसेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

4 December

4 डिसेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- सोमवार 

दिनांक-  04/12/2023, 4 डिसेंबर

मिती-  कार्तिक कृष्ण पक्ष 7

शके- 1945

सुविचार- इमानीपणामुळे गुलमगिरीत देखील उदारतेचा अंश चमकतो.

म्हणी व अर्थ –घोडा मैदान जवळ असणे.

★ अर्थ ::~ परीक्षा लवकरच होणे. 

वाक्यप्रचार- काम करणे- श्रम करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३८ वा किंवा लीप वर्षात ३३९ वा दिवस असतो.

नौदल दिन / ★International Day of Solidarity with the Palestinian People

आठवे शतक

  • ७७१ – कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रॅंकिश सम्राटपदी.

एकोणिसावे शतक

  • १८२९ – भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
  • १८७२ – ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.

विसावे शतक

  • १९१८ – पहिले महायुद्ध – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.
  • १९५२ – लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.
  • १९५४ – मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.
  • १९५८ – डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.
  • १९७१ – भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध – भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.
  • १९७१ – भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध -ऑपरेशन ट्रायडेंट अंतर्गत भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदल आणि कराचीवर हल्ला केला.
  • १९७१ – अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.
  • १९७७ – मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.
  • १९८४ – चीनने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९८४ – हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.
  • १९९१ – ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी अँडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.

एकविसावे शतक

  • २००८ – कॅनडाची संसद बरखास्त.

जन्म

  • १५५५ – हाइनरिक मैबॉम, जर्मन कवी व इतिहासकार.
  • १५९५ – ज्यॉॅं चेपलेन, फ्रेंच लेखक.
  • १६१२ – सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.
  • १७९५ – थॉमस कार्लाईल, इंग्लिश लेखक व इतिहासकार.
  • १८४० – क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.
  • १८५२ – ओरेस्ट ख्वोल्सन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९२ – फ्रांसिस्को फ्रॅंको, स्पेनचा हुकुमशहा.
  • १९१९ – इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.
  • १९३२ – रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४३ – फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.

मृत्यू

  • १९७५ – हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
  • १९८१ – ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

 नमने वाहुनि स्तवने
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.
विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.
आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.
विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

खटला 

दोघां भावात जमिनीवरून तंटा निर्माण झाला. मामला कोर्टात पोहोचला.
त्‍यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्‍या दोघांना प्रत्‍येकी दहा लाख रूपये वाटणीमध्‍ये आले होते.
न्‍यायाधिशांनी एका भावाला विचारले, तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्‍हणाला, माझा भाऊ प्रत्‍येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्‍याने केले नाही.
नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्‍याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला.
न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली.
तो म्‍हणाला, माझ्या वाड-वडिलांची देणगी दिली. म्‍हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्‍यावरही मी परिश्रम करण्‍याचे सोडले नाही.
मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्‍येक कामात माझा सहभाग असल्‍याने नोकरांची बोलण्‍याची हिंमत होत नव्‍हती.
आता जेव्‍हा याच्‍याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्‍हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत.
याने स्‍वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे.
यावर न्‍यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्‍याचा निर्वाळा दिला.
 तात्पर्य –
  मिळालेले धन टिकवुन ठेवने कठीण असते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

स्वातंत्र्य प्राण
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी
वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्‍नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪ भारतातील कोणत्या राज्यात संगमरवराचे साठे जास्त आहेत ?
➜ राजस्थान.
✪ वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहेत ?
➜ राष्ट्रकूट.
✪ मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ?
➜ लिओनार्दो दा विंची.
✪ वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता ?
➜ पोर्तुगीज.
✪ तेनालीराम हा कोणाच्या दरबारात होता ?
➜ कृष्णदेवराय.(विजयनगर)

इंग्रजी प्रश्न

1) How many minutes are there in an hour?
Ans. 60 minutes
2) How many seconds are there in a minute? Ans. 60 seconds
3) How many seconds make one hour?
Ans. 3600 seconds
4) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
5) How many minutes are there in half hour?
Ans: 30 minutes

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#4 december, 4 december 2023, 4 december 2021 panchang, 4 december 2022 special day, 4 december 2023 weather, 4 december 2022 panchang in hindi, 4 december is celebrated as, what is celebrated on 4 december, 4 december 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.