5 December | 5 डिसेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

5 December

5 डिसेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- मंगळवार 

दिनांक-  05/12/2023, 5 डिसेंबर

मिती-  कार्तिक कृष्ण पक्ष 8

शके- 1945

सुविचार- मौन हे खंडन करण्यासाठी सर्वात कठीण युक्तिवाद आहे.

म्हणी व अर्थ – लेकी बोले सुने लागे – एकाला उदेशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.

वाक्यप्रचार-  तक्रार करणे – फिर्याद करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३९ वा किंवा लीप वर्षात ३४० वा दिवस असतो.

पंधरावे शतक

  • १४८४ – पोप इनोसंट आठव्याने समिस देसिदरांतेस हा पोपचा फतवा (papal bull) काढला व त्याद्वारे हाइन्रिक क्रेमर व जेकब स्प्रेन्गर यांची सत्यशोधकपदी नेमणूक केली. त्यांची प्रमुख कामगिरी होती जर्मनी मधील तथाकथित चेटूक व जादूटोणा शोधून त्याचा नायनाट करणे. हे ‘सत्यशोधन’ म्हणजे जर्मनीच्या ईतिहासातील अतिकठोर प्रकरणांपैकी एक होय.
  • १४९२ – क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.

सोळावे शतक

  • १५६० – फ्रांसचा राजा फ्रांसिस दुसरा याचा मृत्यू. चार्ल्स नववा राजेपदी.
  • १५९० – निक्कोलो स्फोन्द्राती ग्रेगोरी चौदावा म्हणून पोपपदी.

विसावे शतक

  • १९३२ – जर्मनीत जन्मलेल्या व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
  • १९४५ – फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.
  • १९८९ – फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.

एकविसावे शतक

  • २०००

जन्म

  • १३७७ – ज्यान्वेन, चीनी सम्राट.
  • १४४३ – पोप ज्युलियस दुसरा.

मृत्यू

  • ७४९ – दमास्कसचा संत जॉन.
  • १५६० – फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.
  • १७९१ – वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.
  • १९२६ – क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
  • २०१३ – नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता
  • .२०१६ – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री तसेच अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा “जयललिता” यांचे त्यांच्या ६८ व्या वर्षी चेन्नई येथे अपोलो रुग्णालयात प्रदिर्घ आजाराने निधन झाले.

प्रतिवार्षिक पालन

  • आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

 नमने वाहुनि स्तवने
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.
विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.
आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.
विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

गर्विष्ठ मोर
एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.
मोर म्हणायचा, “माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.
एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला.
मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, “किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत.
करकोचा म्हणाला, “मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस.
मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. “एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली.
मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला.
तात्पर्य : दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

स्वातंत्र्य प्राण
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी
वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्‍नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪ भारतातील कोणत्या राज्यात संगमरवराचे साठे जास्त आहेत ?
➜ राजस्थान.
✪ वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राजघराण्याने घडविले आहेत ?
➜ राष्ट्रकूट.
✪ मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ?
➜ लिओनार्दो दा विंची.
✪ वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता ?
➜ पोर्तुगीज.
✪ तेनालीराम हा कोणाच्या दरबारात होता ?
➜ कृष्णदेवराय.(विजयनगर)

इंग्रजी प्रश्न

1) How many days do we have in a week?
Answer: Seven
2) How many days are there in a normal year?
Answer: 365 (not a leap year)
3) How many days are there inthe month of February in a leap year?
Answer: 29 days
4) How many hours are there in two days?
Answer: 48 hours
5) How many weeks are there in one year?
Answer: 52

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#5 december, 5 december 2023, 5 december 2021 panchang, 5 december 2022 special day, 5 december 2023 weather, 5 december 2022 panchang in hindi, 5 december is celebrated as, what is celebrated on 5 december, 5 december 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.