6 December | 6 डिसेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

6 December

6 डिसेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार 

दिनांक-  06/12/2023, 6 डिसेंबर

मिती-  कार्तिक कृष्ण पक्ष 9

शके- 1945

सुविचार- अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.

म्हणी व अर्थ –  बळी तो कान पिळी – बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो.

वाक्यप्रचार- डोळे ओले होणे – रडणे.

ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४० वा किंवा लीप वर्षात ३४१ वा दिवस असतो.

दहावे शतक

  • ९६३ – लिओ आठवा प्रतिपोपपदी.

तेरावे शतक

  • १२४० – रशियावर मोंगोल आक्रमण – बाटु खानने कियेवचा पाडाव केला.

सोळावे शतक

  • १५३४ – सेबास्टियान बेलाकाझारने इक्वेडोरची राजधानी क्विटो वसवली.

अठरावे शतक

  • १७६८ – एनसाय्क्लोपिडीया ब्रिटानिकाची पहिली आवृत्ती प्रकाशित.

एकोणविसावे शतक

  • १८६५ – अमेरिकन संविधानातील तेरावा बदल. गुलामगिरी बेकायदा.
  • १८७७ – वॉशिंग्टन पोस्टची पहिली आवृत्ती प्रकाशित.

विसावे शतक

  • १९१७ – हॅलिफॅक्सच्या बंदरात दारुगोळ्याचा स्फोट. १,९०० ठार. शहराचा एक भाग उध्वस्त.
  • १९१७ – फिनलंडने स्वतःला रशियापासून स्वतंत्र जाहीर केले.
  • १९७८ – स्पेनने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९९२ – अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी बाबरी मशीद पाडली.
  • १९९७ – सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार.

एकविसावे शतक

  • २००५ – ईराणच्या राजधानी तेहरानमध्ये ईराणचेच सी.१३० जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. १२०हून अधिक ठार.

जन्म

  • ८४६ – हसन अल् अस्कारी, शिया इमाम.
  • १२८५ – फर्डिनांड चौथा, कॅस्टिलचा राजा.
  • १४२१ – हेन्री सहावा, इंग्लंडचा राजा.
  • १८८२ – वॉरेन बार्ड्स्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१४ – सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४६ – फ्रॅंक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४९ – पीटर विली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५२ – रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक.
  • १९७७ – फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९८२ – शॉन अर्व्हाइन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ११८५ – आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल, पोर्तुगालचा राजा.
  • १३५२ – पोप क्लेमेंट सहावा.
  • १९५६ – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ.
  • २००५ – देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७६ – नाना पाटील, ‘प्रति(पत्री) सरकार’चे प्रवर्तक, क्रांतिसिंह

प्रतिवार्षिक पालन

  • महापरिनिर्वाण दिन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

 नमने वाहुनि स्तवने
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.
विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.
आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.
विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

गर्विष्ठ मोर
एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.
मोर म्हणायचा, “माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.
एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला.
मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, “किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत.
करकोचा म्हणाला, “मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस.
मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. “एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली.
मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला.
तात्पर्य : दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) विमानाचा शोध कोणी लावला ?
उत्तर : राईट बंधू
२) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर : मॅकमिलन
३) टेलिव्हिजन (TV)चा शोध कोणी लावला ?
उत्तर: जॉन बेअर्ड
४) टेलिफोन चा शोध कोणी लावला ?
उत्तर : अलेक्झांडर ग्राहम बेल
५) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर : थॉमस एडिसन

इंग्रजी प्रश्न

1) How many days are there in a week?
Ans. 7 days
2) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
3) How many letters are there in the English alphabet?
Ans. 26 letters
4) What is the National Anthem of India?
Ans. The National Anthem of India is Jana Gana Mana.
5) Name the national flower of India?
Ans. Lotus flower

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#6 december, 6 december 2023, 6 december 2021 panchang, 6 december 2022 special day, 6 december 2023 weather, 6 december 2022 panchang in hindi, 6 december is celebrated as, what is celebrated on 6 december, 6 december 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.