2 November | 2 नोव्हेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

2 November

2 नोव्हेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार-  गुरुवार 

दिनांक-  02/11/2023, 2 नोव्हेंबर

मिती-  आश्विन कृ. 5

शके– 1945

सुविचार- सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.

म्हणी व अर्थ – मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.

★ अर्थ ::~ एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये.

वाक्यप्रचार- नवल वाटणे – आश्चर्य वाटणे.

ठळक घटना आणि घडामोडी

औद्योगिक सुरक्षा दिवस

नोव्हेंबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०६ वा किंवा लीप वर्षात ३०७ वा दिवस असतो.

विसावे शतक

  • १९१४ – पहिले महायुद्ध – रशियाने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले
  • १९३० – हेल सिलासी – इथियोपियाच्या सम्राटपदी
  • १९४७ – कॅलिफोर्नियात स्प्रूस गूसचे एकमेव उड्डाण
  • १९५३ – पाकिस्तानने आपले नाव बदलून पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक असे केले
  • १९६० – लेडी चॅटर्लीझ लव्हर हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल पेंग्विन बूक्सवरील अश्लीलतेच्या खटल्यातून प्रकाशकाची निर्दोष सुटका
  • १९६३ – दक्षिण व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्ष न्गो दिन्ह दियेमची हत्या
  • १९६४ – सौदी अरेबियाच्या राजा सौदला सत्तेवरून हुसकून लावून त्याचा भाऊ फैसल राजा झाला
  • १९७४ – सोलमध्ये नाइटक्लबला लागलेल्या आगीत ७४ ठार

एकविसावे शतक

  • २००० – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (चित्रित) पहिले रहिवासी पोचले.
  • २०१४ – भारत आणि पाकिस्तानमधील सरहद्दीवर असलेल्या वाघा चेकपोस्टवर पाकिस्तानच्या बाजूला आत्मघातकी दहशतवाद्याने घडवलेल्या स्फोटात ५२ ठार, २०० जखमी.

जन्म

  • १०८२ – सोंग हुईजोंग, चीनी सम्राट
  • १७५५ – मेरी ऑंत्वानेत, फ्रेंच सम्राज्ञी
  • १७९५ – जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष
  • १८४४ – महमद चौथा, ऑट्टोमन सम्राट
  • १८६५ – वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष
  • १८६५ – फ्रेडरिक बर्टन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
  • १८७७ – व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
  • १८७७ – आगा खान तिसरा, शिया इमाम
  • १८९१ – हॅरी इलियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १९०८ – फ्रेड बेकवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १९२८ – जेरी अलेक्झांडर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
  • १९३५ – मोहम्मद मुनाफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
  • १९३८ – सोफिया, स्पेनची राणी
  • १९६५ – शाहरुख खान, भारतीय अभिनेता
  • १९८१ – इरफान फझील, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू

मृत्यू

  • १२८५ – पीटर तिसरा, अरागॉनचा राजा
  • १३२७ – जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा
  • १९३५ – जेम्स कॅमेरोन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
  • १९५० – जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक
  • १९६३ – न्गो दिन्ह दियेम, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

तू सुखकर्ता, सिद्धिविनायक
शुभकारक तू आम्हाला
विघ्नेश्वर तू भवतारक तू
प्रथम नमन गणराज तुला
कर्पूरगौरा, मंगलदायक
भक्तगणांना तू सुखकारक
सकल जनांच्या हरिसी चिंता
चिंतामणी जन म्हणती तुला
गौरीसुता, शिवशंकर तनया
विद्यापती तू करिसी किमया
श्रद्धेने जे धरिती पाया
देसी तयांना तुच लळा
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

समाधान हेच खरे धन
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला.
आपली मनोव्यथा त्याला सांगितली. ‘मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,’ अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला आपादमस्तक न्याहाळले व ते म्हणाले, ‘तुझ्या घराजवळ एक झोपडे आहे.
त्यात एक म्हातारी राहते. त्या म्हातारीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.
दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व म्हातारीला म्हणाला, ‘तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत.
त्यांचा स्वीकार व्हावा.’ म्हातारीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, ‘आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाद्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.’
मग आपण उद्यासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.’ श्रीमंत माणूस उद्गारला, ‘अंगण साफ करणारी म्हातारीची सून उद्गारली, ‘आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही.
उद्याची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.’ ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला. ‘उद्याची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढय़ांची काळजी करणारा मी कोठे?
असा विचार त्याच्या मनात आला. संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.
तात्पर्य-
जीवनात संतोष व समाधान हेच खरे धन आहे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

चिर विजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिर विजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येय पथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळि काळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिर विजयाचे वारस आम्ही॥४॥

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) धरण कशाला म्हणतात ?
उत्तर : धरण म्हणजे पाणी साठवण्यासाठी बांधलेला अडथळा
2) जगातील सर्वात उंच धरण कोणते?
उत्तर : नुरेक धरण (ताजिकिस्तान) हे जगातील सर्वात उंच धरण आहे.
3) भारतातील पहिले धरण कोणते?
उत्तर : कावेरी  नदीवरील कल्लनाई धरण  हे भारतातील पहिले धरण आहे.
4) भारतातील सर्वात लांब धरण कोणते?
उत्तर : हिराकुड धरण (ओरिसा) हे भारतातील सर्वात लांब धरण आहे
5) भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर : भाखरा नांगल धरण सतलज नदीवर आहे.

इंग्रजी प्रश्न

1) How many minutes are there in an hour?
Ans. 60 minutes
2) How many seconds are there in a minute? Ans. 60 seconds
3) How many seconds make one hour?
Ans. 3600 seconds
4) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
5) How many minutes are there in half hour?
Ans: 30 minutes

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#2 november, 2 november 2023, 2 november 2021 panchang, 2 november 2022 special day, 2 november 2023 weather, 2 november 2022 panchang in hindi, 2 november is celebrated as, what is celebrated on 2 november, 2 november 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.