1 November | 1 नोव्हेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

1 November

1 नोव्हेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार

दिनांक-  01/11/2023, 1 नोव्हेंबर

मिती-  आश्विन कृ.4

शके– 1945

सुविचार- शिक्षक दार उघडू शकतात, परंतु तुम्ही स्वतः प्रवेश केला पाहिजे.

म्हणी व अर्थ – सर्वस्व पणाला लावणे : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.

वाक्यप्रचार- नवल वाटणे – आश्चर्य वाटणे.

ठळक घटना आणि घडामोडी

नोव्हेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०५ वा किंवा लीप वर्षात ३०६ वा दिवस असतो.

जन्म

 • १७६२ – स्पेंसर पर्सिव्हाल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
 • १७७८ – गुस्ताफ चौथा एडॉल्फ, स्वीडनचा राजा
 • १८६५ – मॉॅंटी बाउडेन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू
 • १९१८ – शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते
 • १९२३ – ब्रुस डूलॅंड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
 • १९२६ – जेराल्ड स्मिथसन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू
 • १९४० – रमेश चंद्र लाहोटी, भारताचे सरन्यायाधीश
 • १९५१ – क्रेग सर्जियन्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
 • १९६४ – कोसला कुरुप्पुअराच्छी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू
 • १९६८ – अक्रम खान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू
 • १९७० – शर्विन कॅम्पबेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
 • १९७३ – ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री
 • १९७४ – व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू
 • १९८७ – इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री
 • १९४५ – डॉ.नरेंद्र दाभोलकर, संस्थापक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

मृत्यू

 • १३९१ – आमाद्युस सातवा, सव्हॉयचा राजा
 • १७०० – कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा
 • १८९४ – अलेक्झांडर तिसरा, रशियाचा झार

प्रतिवार्षिक पालन

 • मृतक दिन – मेक्सिको
 • राष्ट्र दिन – अल्जीरिया
 • स्वातंत्र्य दिन – ॲंटिगा आणि बार्बुडा
 • राज्य स्थापना दिन – केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,हरियाणा
 • जागतिक वनस्पतीभक्षक दिन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
 1. असो तुला देवा माझा
 2. देह मंदिर,चित्त मंदिर
 3. सर्वात्मका शिवसुंदरा
 4. केशवा माधवा
 5. या भारतात
 6. इतनी शक्ती हमे देना
 7. सत्यम शिवम सुंदरां
 8. हा देश माझा
 9. खरा तो एकची धर्म
 10. हंस वाहिनी
 11. तुम्ही हो माता
 12. शारदे मां
 13. ऐ मलिक तेरे बंदे
 14. हमको मन की शक्ती

बोधकथा

मूर्ख बोकड
एका जंगलामध्ये एक विहीर होती. ती सहजासहजी दिसून येत नसे. चालता चालता एके दिवशी एक कोल्हा त्या विहिरी मध्ये पडला आणि मदतीसाठी हाका मारू लागला.
त्या विहिरी मध्ये पाणी जास्त नव्हते त्यामुळे तो बुडला नाही. परंतु त्याला वर येता येईना. त्यामुळे तो मदतीसाठी इतरांना हाका मारू लागला. ‘वाचवा वाचवा मला कोणीतरी बाहेर काढा’.
परंतु खूप वेळ झाले तिथे कोणीच फिरकले नाही. खूप खूप उशिरा नंतर एक बोकड तेथून चालले होते. त्याने त्या विहिरीमध्ये सहज डोकावून पाहिले तर त्याला आतमध्ये कोल्हा दिसला.
बोकडाने कोल्ह्याला  विचारले ,”कोल्हे दादा तू काय करतो आहेस विहिरीमध्ये?”
कोल्ह्याला एक युक्ती सुचली त्याने बोकडाला खरे न सांगता खोटे सांगितले. म्हणाला, “अरे या विहिरीतील पाणी खूप गोड आहे. तुला प्यायचे का या विहिरीचे पाणी?
मी तर खूप वेळ झाले हे पाणी पीत आहे. ये तू पण हे पाणी प्यायला.”
हे ऐकून मूर्ख बोकडाला समजले नाही ,की हा कोल्ह्याचा कावा आहे.
त्यामुळे त्या बोकडाने विहिरीमध्ये उडी मारली. बोकडाने विहिरीमध्ये उडी मारता क्षणीच  कोल्हा त्याच्या पाठीवर चढून वरती निघून गेला आणि आणि बोकडाला म्हणाला,”मूर्ख बोकडा बस आता तू एकटाच पाणी पीत.
अशाप्रकारे बोकडाची मदत न करता उलट त्याला संकटात टाकून कोल्हा निघून गेला.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

या भारतात बंधु-भाव नित्य वसू दे ।
दे वरचि असा दे ।।
हे सर्व पंथ – संप्रदाय एक   दिसू  दे । मतभेद नसू दे ।।धृ।।
नांदोत सुखे गरिब-अमिर एकमतानी ।
मग हिंदू असो, ख्रिश्‍चन वा हो इस्लामी ।
स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे । दे वरचि असा दे ।।१।।
सकळांस कळो, मानवता, राष्ट्रभावना ।
हो सर्वस्थळी मिळूनि, समुदाय-प्रार्थना ।
उद्योगि तरुण वीर, शीलवान   दिसू  दे । दे वरचि असा दे ।।२।।
हा जातिभाव विसरुनिया एक हो अम्ही ।
अस्पृश्यता समूळ   नष्ट  हो   जगातूनी ।
खळ-निंदका-मनीही, सत्य न्याय वसू दे । दे वरचि असा दे ।।३।।
सौंदर्य  रमो   घरघरांत   स्वर्गियापरी ।
ही नष्ट होऊ दे विपत्ति, भीती बोहरी ।
तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसूदे । दे वरचि असा दे ।।४।।

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) धरण कशाला म्हणतात ?
उत्तर : धरण म्हणजे पाणी साठवण्यासाठी बांधलेला अडथळा
2) जगातील सर्वात उंच धरण कोणते?
उत्तर : नुरेक धरण (ताजिकिस्तान) हे जगातील सर्वात उंच धरण आहे.
3) भारतातील पहिले धरण कोणते?
उत्तर : कावेरी  नदीवरील कल्लनाई धरण  हे भारतातील पहिले धरण आहे.
4) भारतातील सर्वात लांब धरण कोणते?
उत्तर : हिराकुड धरण (ओरिसा) हे भारतातील सर्वात लांब धरण आहे
5) भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर : भाखरा नांगल धरण सतलज नदीवर आहे.

इंग्रजी प्रश्न

1) How many minutes are there in an hour?
Ans. 60 minutes
2) How many seconds are there in a minute? Ans. 60 seconds
3) How many seconds make one hour?
Ans. 3600 seconds
4) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
5) How many minutes are there in half hour?
Ans: 30 minutes

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#1 november, 1 november 2023, 1 november 2021 panchang, 1 november 2022 special day, 31 november 2023 weather, 1 november 2022 panchang in hindi, 1 november is celebrated as, what is celebrated on 1 november,  1 november 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.