3 November
3 नोव्हेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- शुक्रवार
दिनांक- 03/11/2023, 3 नोव्हेंबर
मिती- आश्विन कृ. 6
शके– 1945
सुविचार- जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
म्हणी व अर्थ – अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ. दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.
ठळक घटना आणि घडामोडी
नोव्हेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०७ वा किंवा लीप वर्षात ३०८ वा दिवस असतो.
एकोणिसावे शतक
- १८३८ – द टाइम्स ऑफ इंडियाची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना
विसावे शतक
- १९०३ – शेव्हरोलेची स्थापना
- १९१८ – पोलंड रशीया पासून स्वतंत्र
- १९८८ – श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरून भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
- १९९८ – पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या जेसी व्हेंचुराची मिनेसोटाच्या राज्यपालपदी निवड
एकविसावे शतक
- २००७ – पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली
जन्म
- ३९ – ल्युकान, रोमन कवि
- १६०४ – उस्मान दुसरा, ऑट्टोमन सम्राट
- १६१८ – औरंगझेब, मोगल सम्राट
- १७९३ – स्टीवन ऑस्टिन, टेक्सासचा क्रांतिकारी
- १८०१ – कार्ल बेडेकेर, जर्मन लेखक व प्रकाशक
- १८५२ – मैजी, जपानी सम्राट
- १८८४ – क्लॉड फोकेट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
- १८९२ – ज्यो स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
- १९०० – रॉजर ब्लंट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९०१ – लिओपोल्ड तिसरा, बेल्जियमचा राजा
- १९०२ – चार्ल्स जोन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
- १९१२ – आल्फ्रेदो स्त्रॉसनर, पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष
- १९२६ – व्हाल्दास आडम्कुस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष
- १९३३ – अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ
- १९३३ – मायकेल डुकाकिस, अमेरिकन राजकारणी
- १९३४ – डिक रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९५१ – अझमत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
- १९५९ – व्हॉन ब्राउन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९६४ – ब्रायन यंग, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९७७ – हेमंता बोटेजु, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू
मृत्यू
- ३६१ – कॉन्स्टॅन्टियस दुसरा, रोमन सम्राट
- १२५४ – जॉन तिसरा डुकास व्हेटाट्झेस, बायझेन्टाईन सम्राट
- १९७० – पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा
- १९९६ – ज्यॉॅं-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष
- २००४ – शेख झायेद बिन सुल्तान अल नहायान, संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन- पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया
- संस्कृती दिन- जपान
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#3 november, 3 november 2023, 3 november 2021 panchang, 3 november 2022 special day, 3 november 2023 weather, 3 november 2022 panchang in hindi, 3 november is celebrated as, what is celebrated on 3 november, 3 november 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.