29 august | 29 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

29 august

29 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- सोमवार

दिनांक- 29/08/2023, 29 ऑगस्ट

मिती-  श्रावण शुक्ल 13

शके– 1945

सुविचार-

Happiness depends upon ourselves. आनंद स्वतःवर अवलंबून असतो.

म्हणी व अर्थ : हाजीर तो वजीर – जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल.

वाक्प्रचार- जिवापाड प्रेम करणे – खूप प्रेम करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४१ वा किंवा लीप वर्षात २४२ वा दिवस असतो.

जन्म

  • १७८० – ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.
  • १८३० – हुआन बॉतिस्ता अल्बेर्डी, आर्जेन्टिनाचा राष्ट्रपिता.
  • १८४२ – आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८५७ – सॅंडफर्ड शुल्त्झ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८६२ – अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.
  • १८८० – लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
  • १९०१ – विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.
  • १९०५ – ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू.
  • १९२३ – हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२९ – रिचर्ड ऍटनबरो, इंग्लिश चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
  • १९३६ – जॉन मेककेन, अमेरिकन राजकारणी.
  • १९४६ – बॉब बीमन, अमेरिकन लांबउडी-विश्वविक्रमधारक.
  • १९५८ – मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.
  • १९५९ – अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.

मृत्यू

  • ८८६ – बेसिल पहिला, बायझेन्टाईन सम्राट.
  • १५२६ – लुई दुसरा, हंगेरीचा राजा.
  • १५३३ – अताहुआल्पा, पेरूचा शेवटचा इंका राजा.
  • १७९९ – पोप पायस सहावा.
  • १९०४ – मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
  • १९०६ – बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.
  • १९१० – ऍलन हिल,इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३५ – ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
  • १९५१ – अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक.
  • १९६९ – शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.
  • १९८२ – इन्ग्रिड बर्गमन, स्वीडीश अभिनेत्री.

प्रतिवार्षिक पालन

    • राष्ट्रीय क्रीडा दिन – भारत

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
कवी : साने गुरुजी
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

ससा आणि लांडगा 
एक लांडगा जंगलात खुप भुकेला होउन हिंडत होता. पण त्याला शिकार मिळत नव्हती. फिरता फिरता एका झाडाच्या ढोलीत त्याला एक ससा बसलेला दिसला आणि लांडग याला खुप आनंद झाला.
लांडगा आपल्याच दिशेने येतो आहे हे पाहून सावध झालेला ससा ढोलीतुन उडी मारून जोरात पळत सुटला.
लांडगाही त्याच्या मागे धावू लागला. पण शेवटी ससा जोरजोरात पळत खुप पुढे निघून गेला.
लांडगा आधीच भुकेलेला आणि आता पळून पळून थकला होता तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. इतकावेळ ससा आणि लांडग्याची पळापळ झाडावर बसलेला एक कावळा पाहत होता.
त्याने खवचटपणे लांडग्याला विचारले, ” काय हे एवढासा ससा तुझ्या हातात सापडला नाही ?
असं झाल तर तुझा धाक कसा राहील ?” त्यावर स्वःताची बाजू सावरत लबाड लांडगा म्हणाला, ” त्याला त्याच्या जीवाची भीती होती म्हणून तो जीवानिशी धावत होता.
हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला सोडून दिलं.
दुसऱ्याच चांगल होण्यासाठी स्वतःचा थोडा तोटा झाला तरी तो सोसायला हवा.
तात्पर्य  – स्वार्थापेक्षा परमार्थ श्रेष्ठ.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

जिंकू किंवा मरू
माणुसकीच्या शत्रुसंगे,
युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू
लढतिल सैनिक, लढू नागरिक,
लढतिल महिला, लढतिल बालक शर्थ लढ्याची करू,
जिंकू किंवा मरू
देश आमुचा शिवरायाचा,
झाशिवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू,
जिंकू किंवा मरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर,
भुई न देऊ एक तसूभर मरू पुन्हा अवतरू,
जिंकू किंवा मरू
हानी होवो कितीहि भयंकर,
पिढ्या-पिढ्या हे चालो संगर अंती विजयी ठरू,
जिंकू किंवा मरू
– ग. दि. माडगूळकर

बालगीत

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
कवी : ग. दि. माडगूळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) हरियाणा राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : चंदिगड
२) हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : सिमला
३) जम्मू काश्मिर राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : श्रीनगर
४) झारखंड राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : रांची
५) केरळ राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : तिरूअनंतपुरम

ENGLISH QUESTION

1) How many colors are there in the national flag of India?
Ans : Three
2) Which color is at the top of the national flag of India?
Ans: Saffron
3) Which color is in the center of the national flag of India?
Ans: White
4) Which is the lowest color in the national flag of India?
Ans: Green
5) How many spoke are there in Ashoka Chakra in India’s national flag?
Ans : 24

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#29 august, 29 august 2023, 29 august 2021 panchang, 29 august 2022 special day, 29 august 2023 weather, 29 august 2022 panchang in hindi, 29 august is celebrated as, what is celebrated on 29 august, 29 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.