13 Jully | 13 जुलै दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

13 Jully

13 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार – गुरुवार

दिनांक- 13/07/2023, 13 Jully

मिती- आषाढ कृ.11

शके– 1945

सुविचार-

शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
Education is the tool; Not achieved.

म्हणी व अर्थ : खाई त्याला खवखवे :- वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.

वाक्प्रचार- तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.
13 jully परिपाठ
बातम्या-
उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल. सोबत हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल.
सोलापूर : शेतात लटकलेली वायर बांधताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या बस दुर्घटनेतील जखमींची आमदार अनिल पाटील यांच्याकडून विचारपूस
पुण्यात नितेश राणेंच्या वक्तव्यावरून तृतीयपंथी आक्रमक; पोलीस तृतीयपंथी यांच्यात झटापट
साखर कारखाना घोटाळा: मंत्री हसन मुश्रीफांना दिलासा, अटकपूर्व जामिनावरील सुनावणी २५ जुलैला
छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडवर बिल्डगावानजीक पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प
हिमाचलच्या अतिवृष्टीत पुण्यातील पर्यटक अडकले; सर्व जण सुरक्षित असून अधिकाऱ्यांच्या संपर्कात
नागपूर पुणे ट्रॅव्हल्सचा औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघात, दहाहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती.

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९४ वा किंवा लीप वर्षात १९५ वा दिवस असतो.

सतरावे शतक

  • १६६० – पावनखिंडीतील लढाई

अठरावे शतक

  • १७९४ – व्हॉस्गेसची लढाई.

एकोणिसावे शतक

  • १८३२ – हेन्री रोव स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचे उगमस्थान शोधले.
  • १८६३ – सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध न्यू यॉर्क शहरात दंगा.
  • १८७८ – १८७८चा बर्लिनचा तह – सर्बिया, मॉॅंटेनिग्रो व रोमेनिया ओट्टोमन साम्राज्यातून वेगळे झाले.

विसावे शतक

  • १९०८ – ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
  • १९०९ – कॅनडातील कोक्रेन, ऑन्टारियो शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
  • १९१२ – मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
  • १९४१ – दुसरे महायुद्ध – मॉॅंटेनिग्रोत जर्मन वा इटालियन राजवटीविरुद्ध उठाव.
  • १९७७ – न्यू यॉर्कमधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालूट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
  • १९८३ – श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप व कॅनडा व भारतात पलायन.

एकविसावे शतक

  • २००५ – पाकिस्तानच्या घोटकी रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
  • २००६ – इस्रायलने बैरूत विमानतळावर हल्ला चढवला.

जन्म

  • १०० – जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
  • १५९० – पोप क्लेमेंट दहावा.
  • १६०८ – फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८०८ – पॅट्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९०४ – जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
  • १९४० – पॅट्रिक स्टुअर्ट, इंग्लिश अभिनेता.
  • १९४२ – हॅरिसन फोर्ड, अमेरिकन अभिनेता.
  • १९४५ – ऍशली मॅलेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५३ – लॅरी गोम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५४ – रे ब्राइट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ – उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ९३९ – पोप लिओ सातवा.
  • १६६० – बाजीप्रभू देशपांडे.
  • १७६१ – तोकुगावा लेशिगे, जपानी शोगन.
  • १७९३ – ज्यॉं पॉल मरात, फ्रेंच क्रांतिकारी.
  • १९८० – सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

चतुर बिरबल 
एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत.
त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे.
या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला.
आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठया पाहिल्या.
 त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले.
त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.’
शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले.
तात्पर्य – करावे तसे भरावे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : मुंबई
२) गुजरात राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : गांधीनगर
३) मध्यप्रदेश राज्याची राजधानी कोणती?
उत्तर : भोपाळ
४) कर्नाटक राज्याची राजधानी कोणती?
उत्तर : बेंगळुरू
५) गोवा राज्याची राजधानी कोणती?
उत्तर : पणजी

ENGLISH QUESTION

1) Which is the national bird of India?
Ans : The Peacock
2) Which is the national animal of India ?
Ans : Tiger
3) Which is the national flower of India?
Ans : Lotus flower
4) Which is the national fruit of India?
Ans : Mango
5) What is the National Anthem of India?
Ans : Jana Gana Mana.

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#13 jully, 13 jully 2023, 13 jully 2021 panchang, 13 jully 2022 special day, 13 jully 2023 weather, 13 jully 2022 panchang in hindi, 13 jully is celebrated as, what is celebrated on 13 jully, 13 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.