30 September | 30 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

30 September

30 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शनिवार

दिनांक- 30/09/2023, 30 सप्टेंबर

मिती-  भाद्रपद कृ.1

शके– 1945

सुविचार- कामात आनंद निर्माण केला की त्याच ओझं वाटत नाही.

म्हणी व अर्थ –  एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.

वाक्यप्रचार- अधीर होणे – उत्सुक होणे.

ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७३ वा किंवा लीप वर्षात २७४ वा दिवस असतो.

एकोणिसावे शतक

  • १८९५ – मादागास्कर फ्रांसच्या आधिपत्याखाली.

विसावे शतक

  • १९३५ – हूवर डॅम बांधून पूर्ण.
  • १९३५ – लीग ऑफ नेशन्सने मुद्दामहून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे बेकायदा ठरवले.
  • १९४७ – पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • १९५४ – यु.एस.एस. नॉटिलस या जगातील अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
  • १९६५ – इंडोनेशियात कम्युनिस्ट पार्टीने केलेल्या उठावाचा वचपा म्हणून जनरल सुहार्तोने कम्युनिस्ट किंवा कम्युनिस्ट असल्याची कुणकुण लागलेल्या १०,००,००० लोकांची कत्तल करण्यास सुरुवात केली.
  • १९६६ – बोत्स्वानाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९८० – झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स[मराठी शब्द सुचवा] जाहीर केले.
  • १९९१ – हैतीत राष्ट्राध्यक्ष ज्याँ-बर्ट्रांड अरिस्टिडची उचलबांगडी.
  • १९९३ – लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.

एकविसावे शतक

  • २००५ – स्पेनचा एक भाग असलेल्या कॅटेलोनिया प्रांताच्या संसदेने १२०-१५ बहुमताने कॅटेलोनिया एक राष्ट्र आहे असे जाहीर केले.
  • २००५ – डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.
  • २००६ – सर्बियाने नवीन संविधान अंगिकारले.

जन्म

  • १९३३ – प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.
  • १९३९ – ज्याँ-मरी लेह्न, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
  • १९४३ – योहान डायझेनहॉफर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९४५ – एहूद ओल्मर्ट, इस्रायलचा बारावा पंतप्रधान.
  • १९४६ – पॉल शीहान, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६२ – शान, भारतीय संगीतकार.
  • १९७२ – अरी बेह्न, नॉर्वेजियन लेखक.
  • १९८० – मार्टिना हिंगीस, स्वित्झर्लंडची टेनिस खेळाडू.

मृत्यू

  • १२४६ – यारोस्लाव्ह दुसरा, रशियाचा झार.
  • १९१३ – रुडॉल्फ डीझेल, जर्मन संशोधक.
  • १९९२ – गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – बोत्स्वाना.
  • शेती राष्ट्रीयीकरण दिन – साओ टोमे आणि प्रिन्सिप.
  • आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !
अखिल देश पाठीशी, ‘जवान’ व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !
शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !
अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
जय जवान, जय किसान !

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) नदी कशी तयार होते?
उत्तर : असंख्य ओहोळ एकत्र येऊन नदी तयार होते.
२) झरा कशाला म्हणतात ?
उत्तर : जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते  त्याला झरा म्हणतात.
३) जलरूपांची नावे सांगा.
उत्तर: झरा , ओढा, नदी,  तळे,  जलाशय, खाडी,  समुद्र,  महासागर
४) भूरूपांची नावे सांगा .
उत्तर : पर्वत, शिखर, डोंगर, टेकड्या, पठारे, मैदाने, खिंड, दरी
५) धरण कशाला म्हणतात?
उत्तर :  नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते त्याला धरण म्हणतात.

इंग्रजी प्रश्न

1) What is the National Animal of India?
Ans : Tiger
2) What is the National Bird of India?
Ans :  Indian Peacock
3) What is the National Flower of India?
Ans : Lotus
4) What is the National Anthem of India, and who wrote it?
Ans : Jana Gana Mana, written by Rabindranath Tagore
5) What is the National Song of India?
Ans : Vande Mataram, written by Bankim Chandra Chatterjee

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#30 september, 30 september 2023, 30 september 2021 panchang, 30 september 2022 special day, 30 september 2023 weather, 30 september 2022 panchang in hindi, 30 september is celebrated as, what is celebrated on 30 september, 30 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.