27 September | 27 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

27 September

27 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार

दिनांक- 27/09/2023, 27 सप्टेंबर

मिती-  भाद्रपद शु. 13

शके– 1945

सुविचार-  प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी पायरी असते.

म्हणी व अर्थ –  एका हाताने टाळी वाजत नाही- भांडणातील दोन्ही बाजू दोषी असतात.

वाक्यप्रचार- तोंड देणे- सामना करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

पर्यटन दिन 

सप्टेंबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७० वा किंवा लीप वर्षात २७१ वा दिवस असतो.

सोळावे शतक

  • १५४० – पोप पॉल तिसऱ्याने सोसायटी ऑफ जीझसला (जेसुइट्स) मान्यता दिली.
  • १५९० – अवघे १३ दिवस सत्तेवर राहिल्यावर पोप अर्बन सातव्याचा मृत्यू.

अठरावे शतक

  • १७७७ – लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.

एकोणिसावे शतक

  • १८२१ – मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • १८२५ – द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.
  • १८५४ – एस.एस. आर्क्टिकला अटलांटिक महासागरात जलसमाधी. ३०० मृत्युमुखी.

विसावे शतक

  • १९०५ – ऍनालेन डेर फिजिकमध्ये अल्बर्ट आइनस्टाइनचा एखाद्या वस्तूचे जडत्व त्यातील उर्जाप्रमाणावर अवलंबून असते का? हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. यात आइन्स्टाईनने E=mc2 हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
  • १९२२ – ग्रीसच्या राज कॉन्स्टन्टाईन पहिल्याने पदत्याग केला. त्याचा मुलगा जॉर्ज दुसरा सत्तेवर.
  • १९४० – जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० ठार.
  • १९५९ – जपानच्या त्रिपक्षी तह स्वीकारला.
  • १९९६ – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानीने पळ काढला तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.

एकविसावे शतक

  • २००२ – पूर्व तिमोरला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • २००२ – मराठीमाती या मराठी संकेतस्थळाची सुरुवात.

जन्म

  • १३८९ – कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.
  • १६०१ – लुई तेरावा, फ्रांसचा राजा.
  • १७२२ – सॅम्युएल ऍडम्स, अमेरिकन क्रांतिकारी.
  • १९०७ – भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी.
  • १९४८ – डंकन फ्लेचर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५३ – माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू.
  • १९५७ – बिल ऍथी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६२ – गॅव्हिन लार्सन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ – ग्वेनेथ पाल्ट्रो, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९७४ – पंकज धर्माणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ – लक्ष्मीपती बालाजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ – ब्रेन्डन मॅककुलम, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १५५७ – गो-नारा, जपानी सम्राट.
  • १५९० – पोप अर्बन सातवा.
  • १७०० – पोप इनोसंट बारावा.
  • १९१७ – एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.
  • १९७२ – एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.
  • १९९६ – नजीबुल्लाह, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००८ – महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक.

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक प्रवासी दिन.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

ससा आणि कासव
एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल.
ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.
ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” जोपर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससापर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते.
कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली.
ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससा च्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.
तात्पर्य :  कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !
अखिल देश पाठीशी, ‘जवान’ व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !
शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !
अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
जय जवान, जय किसान !

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

■ पहिले जलविद्युत यंत्र-
    ➜ दार्जिलिंग (१८९७-९८)
■ पहिला आकाशवाणी केंद्र-
    ➜ मुंबई (१९२७)
■ पहिला बोलपट-
    ➜ आलमआरा (१९३१)
■ पहिली पंचवार्षिक योजना-
    ➜ १९५१
■ पहिल्या सार्वत्रिक निवडणुका-
    ➜ १९५२

इंग्रजी प्रश्न

1) What is the National Animal of India?
Ans : Tiger
2) What is the National Bird of India?
Ans :  Indian Peacock
3) What is the National Flower of India?
Ans : Lotus
4) What is the National Anthem of India, and who wrote it?
Ans : Jana Gana Mana, written by Rabindranath Tagore
5) What is the National Song of India?
Ans : Vande Mataram, written by Bankim Chandra Chatterjee

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#27 september, 27 september 2023, 27 september 2021 panchang, 27 september 2022 special day, 27 september 2023 weather, 27 september 2022 panchang in hindi, 27 september is celebrated as, what is celebrated on 27 september, 27 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.