2 December | 2 डिसेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

2 December

2 डिसेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शनिवार  

दिनांक-  02/12/2023, 2 डिसेंबर

मिती-  कार्तिक कृष्ण पक्ष 5

शके- 1945

सुविचार- काम करा तरच यश मिळेल.

म्हणी व अर्थ – हाजीर तो वजीर – जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल… 

वाक्यप्रचार- जिवापाड प्रेम करणे – खूप प्रेम करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३६ वा किंवा लीप वर्षात ३३७ वा दिवस असतो.

पंधरावे शतक

  • १४०२ – लीपझीग विद्यापीठ सुरू झाले.

एकोणिसावे शतक

  • १८०४ – नोत्र देम कॅथेड्रलमध्ये नेपोलियन बोनापार्टचा फ्रांसच्या सम्राटपदी राज्याभिषेक.
  • १८०५ – ऑस्टर्लित्झची लढाई – नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्वाखाली फ्रांसच्या लश्कराचा रशिया व ऑस्ट्रियाच्या संयुक्त दलावर विजय.
  • १८४५ – मॅनिफेस्ट डेस्टिनी – पश्चिमेचे प्रदेश काबीज करावयाची अमेरिकन काँग्रेसला उद्देशून अमेरिकन अध्यक्ष जेम्स पोकची घोषणा.
  • १८४८ – फ्रांझ जोसेफ पहिला ऑस्ट्रियाच्या सम्राटपदी.
  • १८५२ – नेपोलियन तिसरा फ्रांसच्या सम्राटपदी.

विसावे शतक

  • १९३९ – न्यू यॉर्क शहरातील ला ग्वार्डिया विमानतळाचे उद्घाटन.
  • १९७१ – संयुक्त अरब अमिरातीची स्थापना. अबु धाबी, अजमान, फुजैरा, शारजा, दुबई व उम-अल-कुवैन सदस्य.
  • १९८८ – बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
  • १९८९ – भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.

एकविसावे शतक

  • २००१ – एन्रॉनने दिवाळे काढल्याचे जाहीर केले.

जन्म

  • १८९८ – ईंद्र लाल रॉय, भारतीय वैमानिक.
  • १८२५ – पेद्रो दुसरा, ब्राझिलचा सम्राट.
  • १८६० – चार्ल्स स्टड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०६ – एरिक डाल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१० – बॉब न्यूसन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१२ – जॉर्ज एमेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४९ – फ्रांसिस ऍलन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३३ – के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता.
  • १९३७ – मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
  • १९४४ – इब्राहीम रुगोवा, कोसोव्होचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९४५ – ऍलन थोमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९४७ – धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६६ – क्लाइव्ह एकस्टीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ – सुजीत सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७९ – अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ – स्टीवन स्वानपोल, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १३४८ – हानाझोनो, जपानी सम्राट.
  • १५४७ – हर्नान कोर्तेझ, स्पॅनिश कॉंकिस्तादोर.
  • १९८० – चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान.
  • १९९३ – पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी.

प्रतिवार्षिक पालन

  • राष्ट्र दिन – संयुक्त अरब अमिराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
  • राष्ट्र दिन – लाओस.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

 नमने वाहुनि स्तवने
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.
विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.
आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.
विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

वाईट संगत
एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.
एक दिवशी शेतकर्‍याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले.
सगळे कावळे जाण्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला. तो म्हणाला, “अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल.” एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला आश्चर्य वाटले.
त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्या बरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले.
शेतकरी कबुतराला म्हणाला, “तु कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही.
तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल.” असे म्हणून शेतकऱ्यांने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले.
धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्ष्यांना ठार मारले.
तात्पर्य: वाईट संगतीत राहू नये.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

एक सुराने गाऊ
हिंदू , मुस्लिम , बौद्ध , ख्रिस्तीअन , सीख आपण भाऊ
या देशाचे भविष्य घडवू , एक जुटीने राहू ll धृ ll
काश्मीर ठेवे भाल उंच ते नंदनवन ही साजे
जलधि मधे चरण टाकुनी , कन्याकुमारी विराजे
हिमालयाची ढाल घेवूनी , फडकत ठेवे बाहु ll १ ll
या देशाचे …..
लाल , बाळ अन् पालही लढले , लढली राणी झाशी
लढले गांधी भगतसिंगही , हासत गेले फाशी
जालियनवाला बाग घातली , रक्तामधे न्हावू ll २ ll
या देशाचे …..
कलाम अब्दुल , मनमोहनजी सकलां येथे संथी
महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील , गुजराथ मधले मोदी
मंदिर मस्जिद गुरुद्वारा अन् बौद्ध विहारी जावू ll ३ ll
या देशाचे …..
ऑगस्ट पंधरा घेवून येई , स्वातंत्र्याचा उत्सव
जानेवारीची सव्वीस करते , गणराज्याचा महोत्सव
सर्व धर्म समभाव जागवू ,
एक सुराने गावू ll ४ ll
या देशाचे …

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) हदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणते तेल उपयुक्त आहे?
उत्तर : करडई
२) वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
उत्तर- ०.०४ टक्के
३) खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
उत्तर – ‘क’ जीवनसत्व
४) निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
उत्तर- ‘ब’ जीवनसत्व
५) हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
उत्तर: ‘ड’ जीवनसत्व

इंग्रजी प्रश्न

1) How many minutes are there in an hour?
Ans. 60 minutes
2) How many seconds are there in a minute? Ans. 60 seconds
3) How many seconds make one hour?
Ans. 3600 seconds
4) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
5) How many minutes are there in half hour?
Ans: 30 minutes

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#2 december, 2 december 2023, 2 december 2021 panchang, 2 december 2022 special day, 2 december 2023 weather, 2 december 2022 panchang in hindi, 2 december is celebrated as, what is celebrated on 2 december, 2 december 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.