20 September | 20 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

20 September

20 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार

दिनांक- 20/09/2023, 20 सप्टेंबर

मिती-  भाद्रपद शु. 5

शके– 1945

सुविचार-  त्वरीत कार्य करा आणि हळूवारपणे विचार करा.

म्हणी व अर्थ –  जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही – मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.

वाक्यप्रचार-  नवल वाटणे – आश्चर्य वाटणे.

ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६३ वा किंवा लीप वर्षात २६४ वा दिवस असतो.

बारावे शतक

 • ११८७ – सलाद्दीनने जेरुसलेमला वेढा घातला.

सतरावे शतक

 • १६३३ – पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवर खटला चालवण्यात आला.
 • १६९७ – रीसवीकचा तह.

अठरावे शतक

 • १७३७ – वॉकिंग परचेस – लेनापे-डेलावेर लोकांची १२ लाख एकर जागा पेनसिल्व्हेनिया वसाहतीला देण्यात आली.

एकोणिसावे शतक

 • १८५४ – अल्माची लढाई – फ्रांस आणि ब्रिटिश सैन्यांनी रशियाला हरवले.
 • १८५७ – १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध – ब्रिटिश फौजेने दिल्ली परत घेतले.
 • १८८१ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डच्या हत्येनंतर चेस्टर ए. आर्थर राष्ट्राध्यक्षपदी.

विसावे शतक

 • १९४२ – ज्यूंचे शिरकाण – जर्मन एस.एस.ने ३,००० ज्यूंची कत्तल केली.
 • १९७० – सिरियाने जॉर्डनवर चाल केली.
 • १९७६ – टर्किश एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान तुर्कस्तानच्या टॉरस माउंटनमध्ये कोसळले. १५५ ठार.
 • १९७७ – व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
 • १९७९ – मध्य आफ्रिकेच्या साम्राज्यात लश्करी उठाव. सम्राट बोकासा पहिला पदच्युत.
 • १९८४ – बैरुतच्या अमेरिकन वकिलातीवर आत्मघातकी हल्ला. २२ ठार.
 • १९९० – दक्षिण ऑसेटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले.

एकविसावे शतक

 • २००१ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने दहशतीविरुद्ध युद्ध पुकारले.
 • २००४ – एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

जन्म

 • १८५३ – राम पाचवा तथा चुलालोंगकोर्ण, थायलंडचा राजा.
 • १८६१ – वॉल्टर ग्रिफेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८९७ – नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
 • १९२१ – पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९२२ – द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.
 • १९२५ – राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा.
 • १९३४ – सोफिया लॉरेन, इटालियन अभिनेत्री.
 • १९५१ – स्टीवन ब्रूक, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९४४ – रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९६३ – अनिल दलपत, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९६८ – इजाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९७३ – नवीद नवाझ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १३८४ – लुई पहिला, नेपल्सचा राजा.
 • १९३३ – ऍनी बेझंट, ब्रिटिश, भारतीय समाजसुधारिका.
 • १९२८ – नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक .
 • १९९६ – दया पवार, मराठी साहित्यिक.
 • १९७९ – लुडविक स्वोबोदा, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.

प्रतिवार्षिक पालन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेऊनिया
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
 1. असो तुला देवा माझा
 2. देह मंदिर,चित्त मंदिर
 3. सर्वात्मका शिवसुंदरा
 4. केशवा माधवा
 5. या भारतात
 6. इतनी शक्ती हमे देना
 7. सत्यम शिवम सुंदरां
 8. हा देश माझा
 9. खरा तो एकची धर्म
 10. हंस वाहिनी
 11. तुम्ही हो माता
 12. शारदे मां
 13. ऐ मलिक तेरे बंदे
 14. हमको मन की शक्ती

बोधकथा

*👣गुरुचे महत्व👣*
मी एकाला विचारले, “गुरुची कृपा किती होऊ शकते?”
तो माणूस त्या वेळी एक सफरचंद खात होता. त्याने एक सफरचंद माझ्या हाती ठेवले आणि विचारले, “सांगा पाहू यांत किती बिया असतील?”
सफरचंद कापून मी त्यांतील बिया मोजल्या आणि म्हणालो, “यात तीन बिया आहेत”‘
त्याने त्यातील एक बी आपल्या हाती घेतली आणि मला विचारले, “या एका बियेमध्ये किती सफरचंदे असतील असे तुला वाटते?”
मी मनातल्या मनातच हिशोब करू लागलो, एका ह्या बियेपासून एक झाड, त्या झाडावर अनेक सफरचंदे लागणार, त्या प्रत्येक सफरचंदांत पुन्हा तीन बिया, त्या प्रत्येक बियेमधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच तीन बिया असणारी फळे लागणार.
अबब! ही प्रक्रिया चालूच राहणार! कसा सांगू मी त्या बियेमध्ये असलेल्या भावी फळांची संख्या? मी चक्रावलोच.
माझी अशी अवस्था पाहून तो माणूस मला म्हणाला, ” अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते.
आपण फक्त भक्तीरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे.”

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव…
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव…
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव…
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव…
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव…

बालगीत

पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची ।।धृ।।
इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती ।।१।।
आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ।।२।।
पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे ।।३।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव सांगा.
उत्तर : बाबाजीराजे
२) शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव सांगा.
उत्तर : मालोजीराजे
३) शिवाजी महाराजांच्या वडीलांचे नाव सांगा .
उत्तर : शहाजीराजे
४) शिवाजी महाराजांच्या आईचे नाव सांगा .
उत्तर : जिजाबाई
५) शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव सांगा.
उत्तर : शिवाजी शहाजी भोसले

इंग्रजी प्रश्न

What day is it today?
Ans : Friday
What day was it yesterday?
Ans : Thursday
What day will be tomorrow?
Ans : Saturday
How many days are there in a week?
Ans : Seven
When is the school holiday during the week?
Ans : Sunday

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#20 september, 20 september 2023, 20 september 2021 panchang, 20 september 2022 special day, 20 september 2023 weather, 20 september 2022 panchang in hindi, 20 september is celebrated as, what is celebrated on 20 september, 20 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.