18 September | 18 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

18 September

18 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- सोमवार

दिनांक- 18/09/2023, 18 सप्टेंबर

मिती-  भाद्रपद शु. 3

शके– 1945

सुविचार- अपयशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

म्हणी व अर्थ –  झाकली मुठ सव्वा लाखाची – मौन पाळून अब्रू राखणे.

वाक्यप्रचार- तोंड भरून कौतुक करणे –  खूप स्तुती करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६१ वा किंवा लीप वर्षात २६२ वा दिवस असतो.

सोळावे शतक

  • १५०२ – क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत कोस्टा रिकाला पोचला.

अठरावे शतक

  • १७३९ – बेलग्रेडचा तह – बेलग्रेड ऑट्टोमन साम्राज्याच्या हवाली.

एकोणिसावे शतक

  • १८५० – अमेरिकेच्या काँग्रेसने फ्युजिटिव्ह स्लेव्ह ऍक्ट हा कायदा लागू केला.
  • १८८५ – माँत्रियालमध्ये कांजिण्याची लस घेणे सक्तीचे केल्याने लोकांनी दंगाधोपा सुरू केला.

विसावे शतक

  • १९०६ – चक्रीवादळ व त्यानंतर आलेल्या त्सुनामीने हाँगकाँगमध्ये १०,००० बळी घेतले.
  • १९१९ – नेदरलँड्समध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
  • १९२२ – हंगेरीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
  • १९३४ – सोवियेत संघाला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
  • १९३९ – दुसरे महायुद्ध – पोलंडचे सरकार पळून रोमेनियाला गेले.
  • १९४३ – ज्यूंचे शिरकाण – सोबिबोरची कत्तल.
  • १९३९ – दुसरे महायुद्ध – ब्रिटिश पाणबुडी एच.एम.एस. ट्रेडविंडने जपानच्या जुन्यो मारु हे जहाज बुडवले. ५,६०० मृत्युमुखी.
  • १९४८ – मार्गारेट चेझ स्मिथ अमेरिकेची पहिली स्त्री सेनेटर झाली.
  • १९६१ – संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस दाग हॅमरशील्डचा विमान अपघातात मृत्यू.
  • १९६२ – र्‍वांडा, बुरुंडी आणि जमैकाला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९७३ – पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९७४ – हरिकेन फिफि होन्डुरासच्या किनाऱ्यावर आले. ५,००० ठार.
  • १९८१ – फ्रांसमध्ये मृत्युदंड बेकायदा.
  • १९९० – लिश्टनस्टाइनला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९९७ – टेड टर्नरने संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकन डॉलर दान केले.
  • १९९८ – आयकानची स्थापना.

एकविसावे शतक

  • २००१ – ट्रेंटन, न्यू जर्सी येथून कोणीतरी अँथ्रॅक्सचे विषाणू असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली.
  • २००७ – पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून घेतल्यावर जनरल परवेझ मुशर्रफने लश्करप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले.

जन्म

  • ५३ – ट्राजान, रोमन सम्राट.
  • १७०९ – सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक.
  • १७६५ – पोप ग्रेगरी सोळावा.
  • १८७६ – जेम्स स्कलिन, ऑस्ट्रेलियाचा ९वा पंतप्रधान.
  • १८९२ – सॅम स्टेपल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९५ – जॉन डिफेनबेकर, कॅनडाचा १३वा पंतप्रधान.
  • १९३७ – आल्फोन्सो रॉबर्ट्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२३ – ऍन, रोमेनियाची राणी.
  • १९४० – ब्रेस मरे, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५८ – विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५८ – डेरेक प्रिंगल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७० – डॅरेन गॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ – लान्स आर्मस्ट्रॉँग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता.

मृत्यू

  • ९६ – डॉमिशियन, रोमन सम्राट.
  • ११८० – लुई सातवा, फ्रांसचा राजा.
  • १७८३ – लेओनार्ड ऑयलर, स्विस गणितज्ञ.
  • १८७० – चार्ल्स पंधरावा, स्वीडनचा राजा.
  • १९७० – जिमी हेंड्रिक्स, अमेरिकन संगीतकार.
  • १९९३ – असित सेन, विनोदी अभिनेते व दिग्दर्शक.
  • १९९४ – व्हिटास जेरुलायटिस, अमेरिकन टेनिस खेळाडू.
  • १९९५ – काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग, हिंदी कवी.
  • १९९९ – अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक.
  • २००२ – शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.
  • २००४ – डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक.

प्रतिवार्षिक पालन

  • वरिष्ठ नागरिक आदर दिन – जपान.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेऊनिया
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

*👣गुरुचे महत्व👣*
मी एकाला विचारले, “गुरुची कृपा किती होऊ शकते?”
तो माणूस त्या वेळी एक सफरचंद खात होता. त्याने एक सफरचंद माझ्या हाती ठेवले आणि विचारले, “सांगा पाहू यांत किती बिया असतील?”
सफरचंद कापून मी त्यांतील बिया मोजल्या आणि म्हणालो, “यात तीन बिया आहेत”‘
त्याने त्यातील एक बी आपल्या हाती घेतली आणि मला विचारले, “या एका बियेमध्ये किती सफरचंदे असतील असे तुला वाटते?”
मी मनातल्या मनातच हिशोब करू लागलो, एका ह्या बियेपासून एक झाड, त्या झाडावर अनेक सफरचंदे लागणार, त्या प्रत्येक सफरचंदांत पुन्हा तीन बिया, त्या प्रत्येक बियेमधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच तीन बिया असणारी फळे लागणार.
अबब! ही प्रक्रिया चालूच राहणार! कसा सांगू मी त्या बियेमध्ये असलेल्या भावी फळांची संख्या? मी चक्रावलोच.
माझी अशी अवस्था पाहून तो माणूस मला म्हणाला, ” अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते.
आपण फक्त भक्तीरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे.”

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव…
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव…
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव…
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव…
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव…

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव सांगा.
उत्तर : बाबाजीराजे
२) शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव सांगा.
उत्तर : मालोजीराजे
३) शिवाजी महाराजांच्या वडीलांचे नाव सांगा .
उत्तर : शहाजीराजे
४) शिवाजी महाराजांच्या आईचे नाव सांगा .
उत्तर : जिजाबाई
५) शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव सांगा.
उत्तर : शिवाजी शहाजी भोसले

इंग्रजी प्रश्न

1) How many fingers on both hands?
Ans : Ten
2) How many fingers on one hand?
Ans : Five
3) How many eyes do you have?
Ans : Two
4) How many legs do you have ?
Ans : Two
5) How many nose do you have?
Ans : One

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#18 september, 18 september 2023, 18 september 2021 panchang, 18 september 2022 special day, 18 september 2023 weather, 18 september 2022 panchang in hindi,18 september is celebrated as, what is celebrated on 18 september, 18 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.