16 September | 16 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

16 September

16 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शनिवार

दिनांक- 16/09/2023, 16 सप्टेंबर

मिती-  भाद्रपद शु.1

शके– 1945

सुविचार- मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही.

“आपले कोण..?”  या दोन शब्दांचा अर्थ कळण्यासाठी “अडचण”  या शब्दाला जन्मच घ्यावा लागतो.

म्हणी व अर्थ – ओठात एक आणि पोटात एक- अर्थ :- बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे.

वाक्यप्रचार- पोटाशी धरणे- रक्षण करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५९ वा किंवा लीप वर्षात २६० वा दिवस असतो.

विसावे शतक

  • १९६३ – मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
  • १९२० – न्यू यॉर्कच्या वॉल स्ट्रीट भागातील जे.पी. मॉर्गन इमारतीसमोर घोडागाडीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट. ३८ ठार, ४०० जखमी.
  • १९४१ – दुसरे महायुद्ध-इराणचे शहा रझा पेहलवी, हे नाझी जर्मनीशी संधान बांधत असल्याचा संशय आल्याने युनायटेड किंग्डम आणि सोव्हिएत संघाने इराणवर चाल केली आणि शहाला आपला मुलगा मोहम्मद रझा पेहलवीला सत्तेवर ठेवून पदत्याग करण्यास भाग पाडले.
  • १९४५ – दुसरे महायुद्ध-हाँग काँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली.
  • १९४७ – जपानच्या टोकियो, सैतामा आणि तोन नदी भागात टायफून कॅथलीन या चक्रीवादळात १,९३० ठार.
  • १९५५ – हुआन पेरॉन आर्जेन्टिनात पदच्युत.
  • १९६३ – झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.

एकविसावे शतक

  • २००७ – वन-टु-गो एरलाइन्स फ्लाइट २६९ हे विमान थायलंडमध्ये कोसळले. १२८ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी ८९ ठार.
  • २००७ – इराकच्या बगदाद शहरात ब्लॅकवॉटर वर्ल्डवाइड या अमेरिकन सैन्याच्या भाडोत्री सैनिकांनी १७ इराकी नागरिकांना निसूर चौकात ठार मारले.

जन्म

  • १३८७ – हेन्‍री पाचवा, इंग्लंडचा राजा.
  • १५०७ – ज्याजिंग, चिनी सम्राट.
  • १७८२ – दाओग्वांग, चिनी सम्राट.
  • १८५३ – आल्ब्रेख्त कॉसेल, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन डॉक्टर.
  • १८५८ – अ‍ॅन्ड्र्यू बोनार लॉ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८७५ – जेम्स सी. पेनी, अमेरिकन उद्योगपती.
  • १९१३ – कमलाबाई ओगले, मराठी पाककृती रुचिराच्या लेखिका
  • १९१६ – एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
  • १९२५ – चार्ल्स हॉई, आयर्लंडचे पंतप्रधान.
  • १९३१ – जॉर्ज सुदर्शन, पद्मविभूषण पुरस्कारविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
  • १९४२ – ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
  • १९८३ – क्रिस्टी कोव्हेन्ट्री, झिम्बाब्वेची तरणपटू.

मृत्यू

  • ९६ – डॉमिशयन, रोमन सम्राट.
  • ३०७ – फ्लाव्हियस व्हॅलेरियस सेव्हेरस, रोमन सम्राट.
  • ८२७ – पोप व्हॅलेन्टाइन.
  • १०८७ – पोप व्हिक्टर तिसरा.
  • १३८० – चार्ल्स पाचवा, फ्रान्सचा राजा.
  • १४९८ – तोमास दि तोर्केमादा, स्पेनचा पहिला ग्रॅन्ड इन्क्विझिटर.
  • १७०१ – जेम्स दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १७३६ – गॅब्रिएल डॅनिएल फॅरनहाइट, पाऱ्याचा तापमापक तयार करणारा. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८२४ – लुई अठरावा, फ्रान्सचा राजा.
  • १९२५ – अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन,
  • १९४४ – गुस्ताफ बाउअर, जर्मनीचा चॅन्सेलर.
  • १९८९ – हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
  • १९९४ – जयवंत दळवी, मराठी साहित्यिक.
  • २००५ – गॉर्डन गूल्ड, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

प्रतिवार्षिक पालन

  • सप्टेंबर १६ – जागतिक ओझोन संरक्षण दिन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेऊनिया
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

*👣गुरुचे महत्व👣*
मी एकाला विचारले, “गुरुची कृपा किती होऊ शकते?”
तो माणूस त्या वेळी एक सफरचंद खात होता. त्याने एक सफरचंद माझ्या हाती ठेवले आणि विचारले, “सांगा पाहू यांत किती बिया असतील?”
सफरचंद कापून मी त्यांतील बिया मोजल्या आणि म्हणालो, “यात तीन बिया आहेत”‘
त्याने त्यातील एक बी आपल्या हाती घेतली आणि मला विचारले, “या एका बियेमध्ये किती सफरचंदे असतील असे तुला वाटते?”
मी मनातल्या मनातच हिशोब करू लागलो, एका ह्या बियेपासून एक झाड, त्या झाडावर अनेक सफरचंदे लागणार, त्या प्रत्येक सफरचंदांत पुन्हा तीन बिया, त्या प्रत्येक बियेमधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच तीन बिया असणारी फळे लागणार.
अबब! ही प्रक्रिया चालूच राहणार! कसा सांगू मी त्या बियेमध्ये असलेल्या भावी फळांची संख्या? मी चक्रावलोच.
माझी अशी अवस्था पाहून तो माणूस मला म्हणाला, ” अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते.
आपण फक्त भक्तीरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे.”

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव…
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव…
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव…
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव…
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव…

बालगीत

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

पोंगल कोणत्या राज्याचा सण आहे ?
तामिळनाडू
गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?
पंजाब
टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?
जॉन लोगी बेअर्ड
भारताची पहिली महिला शासिका कोण होती ?
रजिया सुलताना
इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती ?
भगतसिंग

इंग्रजी प्रश्न

1) How many fingers on both hands?
Ans : Ten
2) How many fingers on one hand?
Ans : Five
3) How many eyes do you have?
Ans : Two
4) How many legs do you have ?
Ans : Two
5) How many nose do you have?
Ans : One

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#16 september, 16 september 2023, 16 september 2021 panchang, 16 september 2022 special day, 16 september 2023 weather, 16 september 2022 panchang in hindi,16 september is celebrated as, what is celebrated on 16 september, 16 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.