14 September | 14 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

14 September

14 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- गुरुवार

दिनांक- 14/09/2023, 14 सप्टेंबर

मिती-  श्रावण कृष्ण 15 (दर्श पिठोरी अमावस्या)

शके– 1945

सुविचार- तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.

म्हणी व अर्थ – छत्तीसाचा आकडा – 

★ अर्थ :~  विरुद्ध मत असणे.
वाक्यप्रचार- जीवाचे रान करणे – खूप कष्ठ करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

हिंदी दिन ,मातृदिन,वृषभ पूजन

सप्टेंबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५७ वा किंवा लीप वर्षात २५८ वा दिवस असतो.

आठवे शतक

  • ७८६ – हरून अल रशीद बगदादच्या खलीफापदी.

अठरावे शतक

  • १७५२ – ब्रिटिश साम्राज्याने ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा उपयोग सुरू केला व या वर्षातून ११ दिवस गाळले.

एकोणिसावे शतक

  • १८२९ – एड्रियानोपलचा तह – रशिया व ओट्टोमन साम्राज्यातील युद्ध संपुष्टात आले.

विसावे शतक

  • १९०१ – आठ दिवसांपूर्वीच्या खूनी हल्ल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीचा मृत्यू. थियोडोर रूझवेल्ट राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९१७ – रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
  • १९२३ – मिगेल प्रिमो दि रिव्हेरा स्पेनचा सर्वेसर्वा झाला.
  • १९५९ – सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
  • १९६० – ओपेकची स्थापना.
  • १९८२ – निवडणूकांमध्ये विजयी ठरलेल्या बशीर गमायेलची राष्ट्राध्यक्षपदी बसण्यापूर्वीच हत्या.
  • १९९९ – किरिबाटी, नौरू व टोंगाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

एकविसावे शतक

  • २००० – मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले.
  • २००३ – स्वीडनच्या जनतेने आपले चलन स्वीडीश क्रोना हेच प्रमाण ठेवले व युरोचा अस्वीकार केला.
  • २००३ – एस्टोनियाच्या जनतेने युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

जन्म

  • १८६८ – आर्थर सेकल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १८८४ – डेव्हिड स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८९५ – चार्ल्स मॅरियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०५ – हर्बी वेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९११ – रॉबर्ट हार्वे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१३ – जॅकोबो आर्बेंझ, ग्वातेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१६ – जेफ नोब्लेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१९ – न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९१९ – गिल लँग्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५६ – पॉल ऍलोट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५७ – केप्लर वेसल्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५८ – जेफ क्रोव, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५९ – सलिया अहंगामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ – रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६६ – आमिर सोहेल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • (इ.स.१९९९)-विनायक नवघरे.

मृत्यू

  • ५८५ – बिदात्सु, जपानी सम्राट.
  • ७७५ – कॉन्स्टन्टाईन पाचवा, बायझेन्टाईन सम्राट.
  • ७८६ – अल-हदी, खलिफा.
  • ८९१ – पोप स्टीवन पाचवा.
  • ११४६ – झेंगी, सिरियाचा राजा.
  • ११६४ – सुटोकु, जपानी सम्राट.
  • १५२३ – पोप एड्रियान सहावा.
  • १७१२ – जियोव्हानी कॅसिनी, इटालियन खगोलतज्ञ.
  • १८३६ – एरन बर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९०१ – विल्यम मॅककिन्ली, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३७ – टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९६५ – जे.डब्ल्यु. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • २०११ – हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेऊनिया
तुळसी हार गळा कांसे पितांबर
आवडे निरंतर तेची रूप
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजीत
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

गुरु गोविंदसिंह 
शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह लहानपणापासूनच वैराग्‍याचा भाव बाळगून होते. सर्वसामान्‍य मुलासारखे ते कोणत्‍याही वस्‍तूची मागणी करत नसत.
अध्‍ययन आणि ईश्‍वराच्‍या स्‍मरणात त्‍यांचा संपूर्ण दिवस जात होता. बालकांचा खोडकरपणाही त्‍यांच्‍या स्‍वभावात नव्‍हता. त्‍यांची आई त्‍यांचे हे आचरण पाहून हैराण होत असे.
परंतु त्‍यांच्‍यावर ती प्रेमही फार करत असे. एके दिवशी त्‍यांच्‍या आईच्‍या मनात त्‍यांना सोन्‍याचे कडे घालण्‍याचा विचार आला. त्‍यांनी एक सोन्‍याचे कडे बनविले आणि गोविंदसिंह यांना मोठ्या प्रेमाने घातले.
मात्र काही वेळातच बालक गोविंदच्‍या हातातले कडे गायब झालेले आईला दिसले. आई त्रस्‍त झाली. बालक गोविंदला विचारले तर त्‍याने नदीकाठी नेले व कडे नदीत टाकून दिल्‍याचे सांगितले.
आईने असे करण्‍याचे कारण विचारले असता गुरु गोविंदसिंह म्‍हणाले,”मला गुरुनानकांनी चालविलेल्‍या मार्गाने चालावयाचे असताना तू मला संसाराच्‍या मोहमायेत अडकावू नये, या बेडीत जर मी बांधलो गेलो तर मला गुरुनानकांच्‍या मार्गावर चालता येणार नाही.
बालक गोविंदसिंह यांचे विचार विरक्त जीवनाचे संकेत देत होते.
तात्पर्य –
थोरांचे जीवन हे प्रेरणादायी असते. महान लोक हे मोह मायेपासून दूर रहाण्‍याचा प्रयत्‍न करतात.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव…
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव…
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव…
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव…
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव…

बालगीत

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪ भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण ?
➜ पंडित जवाहरलाल नेहरू.
✪  कोणत्या सणाला रंगाचा सण म्हणतात ?
➜ होळी.
✪  रेडियोचा शोध कोणी लावला ?
➜ मार्कोनी.
✪ भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?
 ➜ आठ.
✪  गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले ?
 ➜ महात्मा ज्योतिराव फुले

इंग्रजी प्रश्न

1) How many fingers on both hands?
Ans : Ten
2) How many fingers on one hand?
Ans : Five
3) How many eyes do you have?
Ans : Two
4) How many legs do you have ?
Ans : Two
5) How many nose do you have?
Ans : One

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#14 september, 14 september 2023, 14 september 2021 panchang, 14 september 2022 special day, 14 september 2023 weather, 14 september 2022 panchang in hindi,14 september is celebrated as, what is celebrated on 14 september, 14 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.