9 September | 9 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

9 September

9 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शनिवार

दिनांक- 09/09/2023, 9 सप्टेंबर

मिती-  श्रावण कृष्ण 10

शके– 1945

सुविचार- एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय. Done with a concentrated mind The result of any work That means success

म्हणी व अर्थ : बपळसाला पाने तीनच – कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे.

वाक्प्रचार- धमाल उडणे – मजा येणे, आनंद वाटणे.

ठळक घटना आणि घडामोडी

  • सप्टेंबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५२ वा किंवा लीप वर्षात २५३ वा दिवस असतो.

    सोळावे शतक

    • १५४३ – मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.

    सतरावे शतक

  • १७७६ – अमेरिकेची अधिकृ्तरित्या देश म्हणून घोषणा करण्यात आली.

    अठरावे शतक

    • १९४५ – दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.
    • १९४८ – उत्तर कोरिया: प्रजासत्ताक दिवस
    • १९८५ – मूक-बधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉयने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी, पोहून पार करून विक्रम केला.
    • १९९१ – ताजिकिस्तानला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले.
    • १९९४ – सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले

    एकोणिसावे शतक

    • २००१ – नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमद शाह मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.
    • २००१ – व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंगला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

    जन्म

    • २१४ – ऑरेलियन, रोमन सम्राट.
    • ३८४ – फ्लाव्हियस ऑनरियस, रोमन सम्राट.
    • १८२८ – काऊंट लिओ टॉलस्टॉय, रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म.
    • १८५३ – फ्रेड स्पॉफोर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १८५५ – अँथोनी फ्रांसिस लुकास, खनिजतेल शोधक.
    • १८७८ – सर्जियो ओस्मेन्या, फिलिपाईन्सचा चौथा राष्ट्राध्यक्ष.
    • १८९४ – बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
    • १९२२ – हान्स जॉर्ज डेह्मेल्ट, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
    • १९४१ – डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
    • १९४९ – ज्यो थाइसमान, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
    • १९६७ – अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
    • १९७४ – विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.
    • १९७४ – क्वोक वान, ब्रिटिश फॅशन-संकल्पक.
    • १९८६ – जस्टिस चिभाभा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू

    • ७०१ – संत सर्जियस पहिला.
    • १००० – ओलाफ पहिला, नॉर्वेचा राजा.
    • १०८७ – विल्यम पहिला, इंग्लंडचा राजा.
    • १३९८ – जेम्स पहिला, सायप्रसचा राजा.
    • १४८७ – चेंगह्वा, चिनी सम्राट.
    • १५१३ – जेम्स चौथा, स्कॉटलंडचा राजा.
    • १९०९ – एडवर्ड हेन्री हॅरीमान, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.
    • १९७६ – माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.
    • १९८० – जॉन ग्रिफिन, अमेरिकन लेखक.
    • १९८५ – पॉल फ्लोरी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
    • १९९० – सॅम्युएल डो, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
    • २००१ – अहमद शाह मसूद, अफगाण नेता.
    • २०१० – वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.

    प्रतिवार्षिक पालन

    • प्रजासत्ताक दिन – उत्तर कोरिया (१९४८).
    • स्वातंत्र्य दिन – ताजिकिस्तान (१९९१).

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ||
जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे।।
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे।।
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे।।
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪ गंगोत्री राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
  ➜उत्तराखंड.
 ✪ बळीवंश या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
  ➜डाॅ.आ.ह.साळुंखे.
 ✪ स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
  ➜सरदार वल्लभभाई पटेल.
 ✪ उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
  ➜लातूर.
 ✪ गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
  ➜ न्यूटन.
✪ विमानाचा शोध कोणी लावला ?
उत्तर : राईट बंधू

इंग्रजी प्रश्न

1) Which animal guards the house?
Ans: The dog guards the house
2) animal is useful for agricultural work?
Ans: Bullock is useful for agricultural work
3) What does a cow give?
Ans: Cow gives a milk
4) Which is the fastest running animal?
Ans: Cheetah is the fastest running animal.
5) Who is called tiger aunt?
Ans: The cat is called the tiger’s aunt

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#9 september, 9 september 2023, 9 september 2021 panchang, 9 september 2022 special day, 9 september 2023 weather, 9 september 2022 panchang in hindi,9 september is celebrated as, what is celebrated on 9 september, 9 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.