10 September | 10 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

10 September

10 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- रविवार

दिनांक- 10/09/2023, 10 सप्टेंबर

मिती-  श्रावण कृष्ण 11

शके– 1945

ठळक घटना आणि घडामोडी

10 september

सप्टेंबर १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५३ वा किंवा लीप वर्षात २५४ वा दिवस असतो.

एकोणिसावे शतक

  • १८२३ – सिमोन बॉलिव्हार पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १८९७ – लॅटिमरची कत्तल – पेनसिल्व्हेनियामध्ये शेरिफच्या टोळक्याने २० निःशस्त्र खाणकामगारांना ठार मारले.
  • १८९८ – लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.

विसावे शतक

  • १९३५ – देहरादून, भारत येथे दून स्कूलची स्थापना.
  • १९३९ – दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध – जर्मनीने रोममध्ये ठाण मांडले.
  • १९५१ – युनायटेड किंग्डमने इराणविरुद्ध आर्थिक निर्बंध लादले.
  • १९६१ – १९६१ इटालियन ग्रांप्री – चालक वोल्फगांग फोन ट्रिप्सच्या फेरारीला अपघात ट्रिप्स आणि १३ प्रेक्षक ठार.
  • १९६६ – पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
  • १९६७ – जिब्राल्टरने स्पेनमध्ये विलिन होण्यास नकार दिला.
  • १९७४ – गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
  • १९७५ – व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
  • १९७६ – झाग्रेबजवळ ब्रिटिश एरवेझच्या हॉकर सिडली ट्रायडेंट आणि आयनेक्स-एड्रियाच्या डग्लस डी.सी.-९ प्रकारच्या विमानांची टक्कर. १७६ ठार.

एकविसावे शतक

  • २००२ – स्वित्झर्लंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

जन्म

  • ११६९ – अलेक्सियस दुसरा कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १४८७ – पोप जुलियस तिसरा.
  • १६२४ – थॉमस सिडेनहॅम, इंग्लिश वैद्य.
  • १८७२ – रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू.
  • १८८७ – गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते.
  • १८९२ – आर्थर कॉम्प्टन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९५ – कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक.
  • १९३४ – रॉजर मारिस, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
  • १९४८ – भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
  • १९८९ – संजया मलाकार, अमेरिकन आयडॉलमधील कलाकार.

मृत्यू

  • २१० – चिन शि ह्वांग, चिनी सम्राट.
  • ९५४ – लुई चौथा, फ्रांसचा राजा.
  • १३०८ – गो-निजो, जपानी सम्राट.
  • १९४८ – फर्डिनांड, बल्गेरियाचा राजा.
  • १९६४ – पं.श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक.
  • १९७५ – जॉर्ज पेजेट थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९८३ – फेलिक्स ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९८३ – जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
  • २००६ – टॉफाहाऊ टुपोऊ, टोंगाचा राजा.

प्रतिवार्षिक पालन

  • राष्ट्र दिन – जिब्राल्टर.
  • शिक्षक दिन – चीन.
  • राष्ट्रगीत

    जनगणमन अधिनायक जय हे

    भारत भाग्य-विधाता |

    पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

    विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

    उच्छल जलधितरंग,

    तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

    गाहे तव जयगाथा,

    जनगण मंगलदायक जय हे,

    भारत भाग्य-विधाता|

    जय हे, जय हे, जय हे,

    जय जय जय, जय हे ||

    @_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    प्रतिज्ञा

    भारत माझा देश आहे.

    सारे भारतीय माझे बांधव आहेत.

    माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

    माझ्या देशातल्या समृद्ध आणि

    विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

    त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

    माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

    मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

    वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

    आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

    माझा देश आणि माझे देशबांधव

    यांच्याशी निष्ठा राखण्याची

    मी प्रतिज्ञा करीत आहे.

    त्यांचे कल्याण आणि

    त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

    सौख्य सामावले आहे.

    जय हिंद…

    @_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    राज्यगीत

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

    भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

    अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

    दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

    काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

    पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

    दारिद्रयाच्या उन्हात शिजला

    निढळाच्या घामाने भिजला

    देश गौरवासाठी झिजला

    दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

    @_जय जय महाराष्ट्र माझा mp3

    अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    भारताचे संविधान

    उद्देशिका

    आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

    समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

    व त्याच्या सर्व नागरिकांस

    सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

    विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

    व उपासना यांचे स्वातंत्र्य;

    दर्जाची व संधीची समानता;

    निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

    आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

    आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

    प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

    आमच्या संविधानसभेत

    आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

    याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

    करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

    @_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    प्रार्थना

    खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ||
    जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पददलित
    तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
    सदा जे आर्त अति विकल
    जयांना गांजती सकल
    तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
    कुणा ना व्यर्थ शिणवावे
    कुणा ना व्यर्थ हिणवावे
    समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे।।
    प्रभूची लेकरे सारी
    तयाला सर्वही प्यारी
    कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे।।
    असे हे सार धर्माचे
    असे हे सार सत्याचे
    परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे।।
    1. असो तुला देवा माझा
    2. देह मंदिर,चित्त मंदिर
    3. सर्वात्मका शिवसुंदरा
    4. केशवा माधवा
    5. या भारतात
    6. इतनी शक्ती हमे देना
    7. सत्यम शिवम सुंदरां
    8. हा देश माझा
    9. खरा तो एकची धर्म
    10. हंस वाहिनी
    11. तुम्ही हो माता
    12. शारदे मां
    13. ऐ मलिक तेरे बंदे
    14. हमको मन की शक्ती

    बोधकथा

    अती शहाणा 
    एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी, पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत.
    एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका !
    सिंह त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.
    एक दिवस, सिंह शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते.
    कधी – कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.
    एका संध्यकाळी , कोल्हा सिंहाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा.
    सिंह म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही.
    नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच सिंहाला विनंती करतो. पण सिंह त्याला खाण्यचे टाळतो.
    उंट विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे.
    मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल.
    आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.
    तात्पर्य:~ अती शहाणा त्याचा बैल रिकामा.

    @_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    पसायदान

    आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

    तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

    जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

    भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

    दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

    जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

    वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

    अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

    चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

    बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

    चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

    ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

    किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

    भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

    आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

    दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

    येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

    येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

    @_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    देशभक्तीपर गीत

    बलसागर भारत होवो
    बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
    हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
    राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
    वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
    तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
    हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
    ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
    करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
    विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
    या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
    हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
    ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
    जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
    कवी : साने गुरुजी

    बालगीत

    चांदोबा चांदोबा भागलास का ?
    निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
    निंबोणीचे झाड करवंदी,
    मामाचा वाडा चिरेबंदी !
    आई-बाबांवर रुसलास का ?
    असाच एकटा बसलास का ?
    आता तरी परतुनी जाशील का ?
    दूध न्‌ शेवया खाशील का ?
    आई बिचारी रडत असेल,
    बाबांचा पारा चढत असेल !
    असाच बसून राहशील का ?
    बाबांची बोलणी खाशील का ?
    चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
    दिसता दिसता गडप झाला !
    हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
    पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
    कवी : ग. दि. माडगुळकर

    @_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    प्रश्नमंजुषा

    ✪ गंगोत्री राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
      ➜उत्तराखंड.
     ✪ बळीवंश या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
      ➜डाॅ.आ.ह.साळुंखे.
     ✪ स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
      ➜सरदार वल्लभभाई पटेल.
     ✪ उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
      ➜लातूर.
     ✪ गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
      ➜ न्यूटन.
    ✪ विमानाचा शोध कोणी लावला ?
    उत्तर : राईट बंधू
    ✪ सायकलचा शोध कोणी लावला ?
    उत्तर : मॅकमिलन
    ✪ टेलिव्हिजन (TV)चा शोध कोणी लावला ?
    उत्तर: जॉन बेअर्ड
    ✪ टेलिफोन चा शोध कोणी लावला ?
    उत्तर : अलेक्झांडर ग्राहम बेल
    ✪ विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
    उत्तर : थॉमस एडिसन

    इंग्रजी प्रश्न

    1) Which animal guards the house?
    Ans: The dog guards the house
    2) animal is useful for agricultural work?
    Ans: Bullock is useful for agricultural work
    3) What does a cow give?
    Ans: Cow gives a milk
    4) Which is the fastest running animal?
    Ans: Cheetah is the fastest running animal.
    5) Who is called tiger aunt?
    Ans: The cat is called the tiger’s aunt

    अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

    @_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    Tags

    #10 september, 10 september 2023, 10 september 2021 panchang, 10 september 2022 special day, 10 september 2023 weather, 10 september 2022 panchang in hindi,10 september is celebrated as, what is celebrated on 10 september, 10 september 2023,

    शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

    DECLAIMER

    वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.