1 august | ऑगस्ट दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

1 august

1 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- मंगळवार

दिनांक- 01/08/2023, 1 ऑगस्ट

मिती- अधिक श्रावण

शके– 1945

सुविचार- सत्य हेच अंतिम समाधान असते.

Truth is the ultimate solution.

म्हणी व अर्थ : अपयश हे मरणाहून वोखटे: अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे.

वाक्प्रचार- नवल वाटणे- आश्चर्य वाटणे, चकित होणे.

अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली.
त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती – मधुकर, शांता आणि शकुंतला.
साठे पहिल्यांदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले.१९४४ मध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले.
याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते १९४० च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची “१९५० च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना” होती.
भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला.

and

आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!” इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती.
आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.
साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला.
इ.स. १९५८ मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे”यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले.
या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते.
त्यांनी म्हटले आहे की, “दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.
साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह १५ आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत.
कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी लिहिली.

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला. लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले.
लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत.
टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना ‘भारतीय अशांततेचे जनक’ म्हणून संबोधले आणि टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना ६ वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली.
मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला.
देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली.
लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले.
बाळ गंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते.
भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व लोकमान्य टिळक यांचे १ ऑगस्ट १९२० रोजी आजारपणामुळे निधन झाले.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१३ वा किंवा लीप वर्षात २१४ वा दिवस असतो.

सहावे शतक

  • ५२७ – जस्टीनियन पहिला बायझेन्टाईन सम्राटपदी.

तेरावे शतक

  • १२९१ – स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.

पंधरावे शतक

  • १४६१ – एडवर्ड चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
  • १४९२ – ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी.
  • १४९८ – क्रिस्टोफर कोलंबसने व्हेनेझुएलात पाउल ठेवले.

सतरावे शतक

  • १६९१ – अमेरिकेत पहिले आफ्रिकन गुलाम आणले गेले.
  • १६६४ – सेंट गॉट्टहार्डची लढाई – ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव.

अठरावे शतक

  • १७७४ – जोसेफ प्रीस्टली व कार्ल विल्हेमने ऑक्सिजन मूलद्रव्याचा शोध लावला.

एकोणिसावे शतक

  • १८०० – ग्रेट ब्रिटन व आयर्लंडच्या राज्यांचे युनायटेड किंग्डममध्ये विलीनीकरण.
  • १८३१ – लंडन ब्रिज वाहतुकीस खुला.
  • १८३४ – ब्रिटीश साम्राज्याने गुलामगिरीस बंदी असल्याचे जाहीर केले.
  • १८३८ – त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
  • १८७६ – कॉलोराडो अमेरिकेचे ३८वे राज्य झाले.
  • १८९४ – पहिल्या चीन-जपान युद्धास सुरुवात.

विसावे शतक

  • १९०२ – अमेरिकेने फ्रांसकडून पनामा कालवा बांधून वापरण्याचे हक्क विकत घेतले.
  • १९१४ – पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९२७ – चीनी गृहयुद्ध – नान्चांगचा उठाव.
  • १९३६ – बर्लिनमध्ये १९३६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू.
  • १९४४ – ऍन फ्रॅंकने आपल्या रोजनिशीत शेवटची नोंद केली.
  • १९४४ – पोलंडची राजधानी वॉर्सोमध्ये नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव.
  • १९५७ – अमेरिका व कॅनडाने उत्तर अमेरिकी हवाई संरक्षण कमांड (नोरॅड)ची रचना केली.
  • १९६० – बेनिनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६६ – अमेरिकेच्या ऑस्टिन, टेक्सास शहरातील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑस्टिनच्या मुख्य इमारतीतून चार्ल्स व्हिटमनने १५ लोकांना गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी व्हिटमनलाही ठार केले.
  • १९६७ – इस्रायेलने पूर्व जेरुसलेम बळकावले.
  • १९६८ – हसनल बोल्कियाहला ब्रुनेइच्या राजगादीवर राज्याभिषेक.
  • १९९६ – मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.

एकविसावे शतक

  • २००४ – पेराग्वेची राजधानी ऍसन्शनमधील सुपरमार्केटमध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी.

जन्म

  • १० – क्लॉडियस, रोमन सम्राट.
  • १२६ – पर्टिनॅक्स, रोमन सम्राट.
  • १३१३ – कोगोन, जपानी सम्राट.
  • १३७७ – गो-कोमात्सु, जपानी सम्राट.
  • १८५६ – जॉर्ज कुल्टहार्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८५७ – जॉन हॅरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८६१ – सॅमी जोन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९०० – ओट्टो नथ्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१० – मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२० – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.
  • १९२४ – फ्रॅंक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
  • १९३५ – जॉफ पुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५२ – झोरान डिंडिक, सर्बियाचा पंतप्रधान.
  • १९५२ – यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५५ – अरुणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ – मायकेल वॅटकिन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ – ग्रॅहाम थोर्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ – मसूद राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ३७१ – संत युसेबियस.
  • ११३७ – लुई सहावा, फ्रांसचा राजा.
  • १७१४ – ऍन, इंग्लंडची राणी.
  • १९२० – बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक.
  • १९२९ – सिड ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९९९ – निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
  • २००५ – फह्द, सौदी अरेबियाचा राजा.

प्रतिवार्षिक पालन

  • लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी – भारत.
  • सैन्य दिन – ॲंगोला, चीन, लेबेनॉन.
  • मुक्ती दिन – त्रिनिदाद व टोबेगो, बार्बेडोस.
  • राष्ट्र दिन – बेनिन, स्वित्झर्लंड.
  • मातृ-पितृ दिन – कॉॅंगो.
  • उत्सव दिन – निकाराग्वा.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

एकीचे बळ
एका माणसाला चार मुले होती. त्या चारही भावांचे आपापसात बिलकुल पटत नसे. ते सतत एकमेकांशी छोट्यामोठ्या कारणांवरून भांडत राहायचे. कधी कधी मारामारीही करायचे. त्यांचे आईवडील त्यांना उपदेश करून करून थकले होते, पण त्यांच्यावर काही परिणाम नव्हता. त्या माणसाचे मोठे शेत होते.
तो त्या मुलांना कामासाठी शेतावर घेऊन जायचा. पण तिथेही ते कोणी कोणतं काम करावं, कोणी कमी काम केलं, कोणी जास्त काम केलं अशा क्षुल्लक गोष्टींवरून भांडत राहायचे आणि काम बाजुला राहायचं. गावातली मंडळी त्यांना फार नावे ठेवत असत.
तो माणुस आता म्हातारा होत आला होता.
त्याला आपल्या मुलांची फार काळजी वाटत होती. आपल्यानंतर यांच्यात काहीच सलोखा राहणार नाही, बाकी लोक त्याचा फायदा घेतील अशी त्याला फार भीती वाटत असे.

so

एक दिवस त्याने आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीने समजावुन सांगायचे ठरवले. त्याने आपल्या सर्व मुलांना बोलावले, आणि रानात जाऊन सरपणासाठी म्हणुन वाळलेल्या लाकडी काटक्या आणायला सांगितले.
ते सर्व रानात जाऊन आले आणि बऱ्याच काटक्या गोळा करून आले. पुन्हा कोणी जास्त आणल्या यावरून त्यांची स्पर्धा सुरु झाली.
त्यांचे वडील म्हणाले, “पोरांनो जरा इकडे लक्ष द्या. प्रत्येकाने एक एक काडी उचला आणि तोडुन दाखवा.”
मुलांनी क्षणार्धात एकेक काड्या घेऊन काडकन तोडुन टाकल्या.
वडील म्हणाले “शाब्बास. आता या तुम्ही आणलेल्या काटक्यांची घट्ट मोळी बांधा आणि तिला तोडून दाखवा.”
मुलांनी घट्ट बांधलेली मोळी तोडण्याचा प्रयत्न करून पाहिला.
प्रचंड जोर लावुनही एकालाही मोळी तोडता आली नाही.
वडील गालातल्या गालात हसत होते. त्यांनी सांगितले “पाहिलंत मुलांनो? एक एक काडी तोडायला काही बळ लागत नाही. पण हेच जर काही काड्या एकत्र आल्या आणि त्यांना घट्ट बांधले कि कोणालाही तोडता येत नाही.”
“तुम्हा भावांचे पण असेच आहे.

and

तुम्ही एकमेकांशी भांडुन एकेकटेच राहायला लागलात तर कोणीही बाहेरचा येऊन तुम्हाला त्रास देऊ शकेल. पण तेच जर तुम्ही एकमेकांना घट्ट धरून राहिलात, आधार दिलात, तर तुमच्या एकीच्या शक्तीला कोणी तोडू शकणार नाही.”
“आपली माणसे हि एकमेकांना आधार देण्यासाठीच असतात.
क्षुल्लक कारणांवरून भांडत बसायला नाही. आता मी म्हातारा झालो. माझ्यानंतर तुम्हीच एकमेकांसाठी असणार. तेव्हा आता फुटकळ भांडणे सोडा. एकमेकांना मदत करायला शिका.”
त्यादिवशी मुलांनाही जाणीव झाली आणि त्यांनी विनाकारण भांडणे सोडुन दिले.
एकमेकांची मदत करत खेळीमेळीने राहण्यात जो आनंद असतो तो त्यांनाही अनुभवायला मिळाला. त्यांच्या वडिलांनी उरलेले आयुष्य समाधानाने घालवले.
तात्पर्य : एकीचे बळ मिळते फळ

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण !
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता
खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) ॠतूची नावे सांगा.
उत्तर : पावसाळा, हिवाळा, उन्हाळा
२) उन्हाळ्यात आपण कोणते कपडे वापरतो ?
उत्तर : सुती
३) हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून कोणते कपडे वापरतो ?
उत्तर: उबदार
४) पावसाळ्यात बाहेर जातांना अंग भिजू नये म्हणून आपण काय वापरतो?
उत्तर: छत्री, रेनकोट, इरले
५) झाडाची पाने कोणत्या ऋतूत गळतात?
उत्तर : हिवाळ्यात

ENGLISH QUESTION

1) How many sides does a square have?
Ans : Four
2) How many sides does a triangle have?
Ans : Three
3) How many sides does a circle have?
Ans : Zero
4) How many sides does a pentagon have?
Ans : Five
5) How many sides does a hexagon have?
Ans : Six

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#1 august, 1 august 2023, 1 august 2021 panchang, 1 august 2022 special day, 1 august 2023 weather, 1 august 2022 panchang in hindi, 31 august is celebrated as, what is celebrated on 1 august, 1 august 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.