31 Jully | 31 jully दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

31 Jully

31 jully दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- सोमवार

दिनांक- 31/07/2023, 31 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 13

शके– 1945

सुविचार- दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो.

Sacrifice makes man bigger than charity.

म्हणी व अर्थ : आवळा देऊन कोहळा काढणे: अल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे.

वाक्प्रचार- डोळे उघडणे- अद्दल घडणे, अनुभवाने सावध होणे.

 

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१२ वा किंवा लीप वर्षात २१३ वा दिवस असतो.

आठवे शतक

  • ७८१ – जपानच्या फुजियामा ज्वालामुखीच्या उद्रेकाची प्रथम नोंद.

अकरावे शतक

  • १००९ – सर्जियस चौथा पोपपदी.

पंधरावे शतक

  • १४९८ – क्रिस्टोफर कोलंबस त्रिनिदादला पोचला.

अठरावे शतक

  • १७०३ – डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुले मारली.

एकोणिसावे शतक

  • १८५६ – न्यू झीलंडची राजधानी क्राइस्टचर्चची स्थापना.

विसावे शतक

  • १९१७ – पहिले महायुद्ध – य्प्रेसची तिसरी लढाई.
  • १९३२ – जर्मनीतील निवडणुकांत नाझी पार्टीला ३८% मते मिळाली.
  • १९४० – अमेरिकेत कुयाहोगा फॉल्स, ओहायो येथे रेल्वे अपघात. ४३ ठार.
  • १९४५ – दुसरे महायुद्ध – विची फ्रांसच्या पंतप्रधान पिएर लव्हालने दोस्त राष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केले.
  • १९४८ – न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला.
  • १९५१ – जपान एरलाइन्सची स्थापना.
  • १९५४ – इटलीच्या अर्दितो देसियोच्या नेतृत्वाखाली गिऱ्यारोहक पथकाचे के-२ शिखरावर पहिले यशस्वी आरोहण.
  • १९५६ – ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.
  • १९७१ – अपोलो १५च्या अंतराळवीरांनी चंद्रावर पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली.
  • १९७३ – डेल्टा एरलाइन्सचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. ८९ ठार.
  • १९७५ – अमेरिकेतील टीम्स्टर युनियनचा नेता जिमी हॉफा गायब.
  • १९८१ – पनामाचा हुकुमशहा ओमर तोरिहोसचा विमान अपघातात मृत्यू.
  • १९८७ – कॅनडातील एडमंटन शहरात एफ.४ टोर्नेडो. २७ ठार, ३३ कोटी डॉलरपेक्षा जास्त मिळकतीचे नुकसान.
  • १९८८ – मलेशियाच्या बटरवर्थ शहरात फेरीवर जाण्यासाठीचा पूल कोसळला. ३२ ठार, १,६७४ जखमी.
  • १९९२ – थाई एरवेझचे एरबस ए.३०० प्रकारचे विमान नेपाळची राजधानी काठमांडूजवळ कोसळले. ११३ ठार.

जन्म

  • ११४३ – निजो, जपानी सम्राट.
  • १५२७ – मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १९०२ – सर ऑस्वाल्ड ब्राउनिंग ऍलन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१२ – बिल ब्राउन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१२ – मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.
  • १९१९ – लेफ्टनंट कर्नल हेमु अधिकारी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५३ – जिमी कूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४१ – अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.
  • १९७५ – अँड्रु हॉल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८२ – ब्लेसिंग माहविरे, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ११०८ – फिलिप पहिला, फ्रांसचा राजा.
  • १५०८ – नाओद, इथियोपियाचा सम्राट.
  • १५४७ – फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
  • १७५० – होआव पाचवा, पोर्तुगालचा राजा.
  • १८७५ – अँड्रु जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४३ – हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (युद्धबंदी असताना).
  • १९७२ – पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान.
  • १९८० – मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
  • १९९३ – बॉद्वां पहिला, बेल्जियमचा राजा.

प्रतिवार्षिक पालन

  • हरी पहलावान – मलेशिया.
  • का हेइ हवाई – हवाई.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

नोकर चोर आहे
एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे. माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत.
त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा.
ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो.
त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले.
त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे.
त्यानेच तुमचे दागिने चोरले. शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण !
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता
खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
कवी : ग. दि. माडगूळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : प्रकाश आमटे
२) ‘मृत्युंजय’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : शिवाजी सावंत
३) ‘बलुतं’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : दया पवार
४) ‘बनगरवाडी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : व्यंकटेश माडगूळकर
५) ‘अग्निपंख’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर :  डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम

ENGLISH QUESTION

1) How many days do we have in a week?
Answer: Seven
2) How many days are there in a normal year?
Answer: 365 (not a leap year)
3) How many days are there in the month of February in a leap year?
Answer: 29 days
4) How many hours are there in two days?
Answer: 48 hours
5) How many weeks are there in one year?
Answer: 52

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#31 jully, 31 jully 2023, 31 jully 2021 panchang, 31 jully 2022 special day, 31 jully 2023 weather, 31 jully 2022 panchang in hindi, 31 jully is celebrated as, what is celebrated on 31 jully, 31 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.