23 March | मार्च दिनविशेष, शालेय परिपाठ

23 March

23 मार्च दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– गुरुवार

दिनांक- 23/03/2023, 23 March

मिती- चैत्र शुक्ल 2

शके– 1944

23 March daily routine
23 March

सुविचार- त्यागात सर्व सुख आहे.

म्हणी व अर्थ-
पळसाला पाने तीनच –
सगळीकडे सारखीच परिस्थिती.

मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यावर क्लिक करा…

आजचा दिनविशेष- 

मार्च २३ (23 March) हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८२ वा किंवा लीप वर्षात ८३ वा दिवस असतो.

हा जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी १९५० साली जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली होती.

ठळक घटना

अठरावे शतक

१७७५ – अमेरिकन क्रांतीदरम्यान पॅट्रिक हेन्‍रीने आपले रिचमंड, व्हर्जिनिया येथे मला स्वातंत्र्य द्या, नाहीतर मला मृत्यू द्या हे भाषण केले.

एकोणिसावे शतक

१८०१ – रशियाचा झार पॉल पहिल्याची हत्या.

१८३९ – बॉस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ.के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग.

१८४८ – जॉन विक्लिफ या जहाजातून स्कॉटिश लोक न्यू झीलंडच्या ड्युनेडिन शहराजवळ उतरले व त्यांनी पुढे तेथे वसाहत निर्माण केली.

१८५७ – न्यूयॉर्क शहरात पहिले उद्वाहक(लिफ्ट) सुरू करण्यात आली.

विसावे शतक

१९३१ – भारतीय क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी.

१९४२ – जपानी सैन्याने अंदमान बेटे काबीज केली.

१९५० – जागतिक हवामान संघटनेची स्थापना.

एकविसावे शतक

२००१ – रशियाचे मिर हे अंतराळ-स्थानक पृथ्वीवर कोसळले.

२००३ – २००३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर मात.

२००५ – टेक्सास सिटी येथील तेल शुद्धीकरण कारखान्यात स्फोट होऊन १५ कामगार मृत्युमुखी पडले.

२००७ – इराणच्या आरमाराने रॉयल नेव्हीच्या सैनिकांना पकडले.

जन्म

१६४५ – विल्यम किड, चाचा.

१६९९ – जॉन बार्ट्राम, अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ.

१७२३ – आगा मोहम्मद खान घजर, इराणचा राजा.

१७४९ – पिएर सिमॉन दि लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.

१८२३ – स्कायलर कोलफॅक्स, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.

१८३१ – एडुआर्ड श्लेगिन्ट्वाइट, जर्मन लेखक.

१८८१ – रॉजर मार्टिन दु गार्ड, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.

१८८१ – हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

१८८७ – फेलिक्स युसुपोव्ह, रास्पुतिनचा मारेकरी.

१९१० – डॉ. राममनोहर लोहिया : भारतीय स्वातंत्र्यसैनिक

१९१२ – वर्नर फॉन ब्रॉन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता.

१९२६ – रवींद्र पिंगे : मराठी लेखक

१९३१ – व्हिक्टर कॉर्चनॉय, रशियन बुद्धिबळपटू.

१९३८ – मेनार्ड जॅक्सन, अटलांटाचा पहिला श्यामवर्णीय महापौर.

१९६८ – मायकेल आथरटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९७९ – इमरान हाश्मी, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९९८ – हजरतुल्लाह झझई, अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

२००७ – श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.

२००८ – गणपत पाटील, मराठी चित्रपट अभिनेते.

प्रतिवार्षिक पालन

प्रजासत्ताकदिन – पाकिस्तान.

जागतिक हवामान दिन,

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत- mp3

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना-

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

लोभी राजा
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. इंद्रप्रस्थ एका आटपाट नगराचा राजा होता. त्याच्या राज्यात सर्व काही छान चालले होते. पण तरीही राजा अस्वस्थ होता. कारण त्याच्याकडे भरपूर धन होते. तरीही त्याला अजून धन मिळावे असे वाटे.
एके दिवशी त्याच्या दरबारात एक थोर तपस्वी येतो. राजा दोन दिवस त्यांची मनोभावे सेवा करतो. ते पाहून तो तपस्वी खूश होतो व त्याला म्हणतो, ‍’राजा, तू माझी जी सेवा केली त्याने मी प्रसन्न झालो आहे. तू पाहिजे तो वर माग’. तो लोभी राजा म्हणातो, ‘मला असा वर द्या की मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची होईल.’ तपस्वी म्हणतो, ‘नीट विचार कर. नंतर पश्चाताप करशील.’
राजा आपल्या मागणीवर ठाम असतो. तपस्वी तथास्तू म्हणतो. राजा लगेच शेजारच्या सिंहासनाला हात लावतो. ते सोन्याचे होते. तो खूष होतो. मग तो पुढे ज्या वस्तूंना हात लावतो, त्या सोन्याच्या व्हायला लागतात. थोड्यावेळाने त्याला भूक लागते. म्हणन तो फलाहार करायला जातो, पण ती फळेही सोन्याची होतात.
त्याला काहीच खाता, पिता येत नाही. कारण ज्याला तो हात लावी ते सोन्याचे होई. निराश झालेला राजा आपल्या सिंहासनावर बसलेला असताना त्याची मुलगी बागेतून खेळून त्याच्याकडे येते. तो आनंदातने तिला घेण्यासाठी हात करतो, तर ती ती सोन्याची होऊन जाते. राजा अतिशय दु:खी होतो.
त्याला एकदम रडू कोसळते. त्याची लाडकी मुलगी त्याला मिळालेल्या वरामुळे सोन्याची मूर्ती होऊन बसली होती. त्याला आपली चुक कळते, पण आता फार उशीर झालेला असतो.
तात्‍पर्य:- कोणत्याही गोष्टीचा अति लोभ वाईटच.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत-

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

बालगीत-

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

#23 march, 23 march 2023, 23 march 2021 panchang, 23 march 2022 special day, 23 march 2023 weather, 23 march 2022 panchang in hindi, 23 march is celebrated as, what is celebrated on 23 march, 23 march 2022

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.