21 March
21 मार्च दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– मंगळवार
दिनांक- 21/03/2023
मिती- फाल्गुन कृष्ण 30 ,दर्श अमावस्या
शके– 1944
सुविचार- हसा खेळा पण शिस्त पाळा.
मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी
डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यावर क्लिक करा…
आजचा दिनविशेष-
मार्च २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८० वा किंवा लीप वर्षात ८१ वा दिवस असतो.
ठळक घटना-
चौदावे शतक-
१३४९ – एरफुर्ट, जर्मनी येथे दंगलीत ३,००० ज्यूंची कत्तल.
पंधरावे शतक-
१४१३ – हेन्री पाचवा, इंग्लंड इंग्लंडच्या राजेपदी
१४२१ – बीग युद्धात इंग्रजांचा फ्रेंचांकडून पराभव.
१४९२ – अलोंझो पेट्रो हा खलाशी कोलंबससोबत सागरसफरीला निघाला.
सतरावे शतक-
१६१० – राजा जेम्स प्रथम याचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
१६९७ – झार पीटर महान यांच्या पश्चिम युरोप दौऱ्याची सुरुवात.
अठरावे शतक-
१७०२ – ऍन स्टुअर्ट राणी यांचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
१७८८ – अमेरिकेच्या न्यू ऑर्लिअन्स शहरात आग लागून शहर भस्मसात.
१७८८ – गुस्टास व्हेसा यांची चार्लोट राणीकडे आफ्रिकन गुलामांना मुक्त करण्याची याचिका.
१७९० – थॉमस जेफरसन यांनी राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे न्युयॉर्क येथे राज्याचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
१७९१ – न्यू हॅम्पशायरयेथील कॅप्टन होपले यीस्टन अमेरिकन नौदलाचे पहिले समितीय अधिकारी झाले.
एकोणिसावे शतक-
१८०० – रोममधून पळ काढलेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी बर्नाबा निकोलो मरिया लुइगी कियारामॉॅंतीला पायस पाचवा म्हणून पोपपदी राज्याभिषेक केला.
१८०४ – नेपोलियनचा फ्रेंच नागरी कायदा स्वीकृत.
१८२४ – कैरो येथील शस्त्रास्त्र कचरा आगारातील आगीत ४००० घोडे भक्ष्यस्थानी.
१८३५ – चार्ल्स डार्विन आणि मेरियानो गोन्झालेस यांची पोर्टिलो पास येथे भेट.
१८४३ – मॅसॅच्युसेट्स मधील भविष्यवेत्ता विल्यम मिलर याची या दिवशी जगबुडी होण्याची भविष्यवाणी.
१८४४ – बहाई सनाची सुरुवात.
१८५१ – कॅलिफोर्नियामध्ये योसेमिटी दरीचा शोध लागला.
१८५७ – जपानची राजधानी टोक्योत भूकंप. १,०७,००० ठार.
१८५९ – एडिनबर्ग येथे स्कॉटिश नॅशनल गॅलरीची स्थापना.
१८५९ – झूऑलॉजिकल सोसायटी ऑफ फिलाडेल्फिया ही अमेरिकेतील पहिली प्राणिशास्त्रीय संघटनेची स्थापना.
१८६० – अमेरिकेचा स्वीडन सोबत हस्तांतरण करार.
१८६४ – लुईझियाना मधील हेंडरसन पर्वतावर युद्ध.
१८६५ – बेंटनव्हिल युद्धाची समाप्ती.
१८६६ – राष्ट्रीय सैनिक निवासांना अमेरिकन काँग्रेसची मान्यता.
१८६८ – सोरोसिस या अमेरिकेतील पहिल्या व्यावसायिक महिला क्लबची न्यू यॉर्क येथे स्थापना.
१८७१ – पत्रकार हेन्री स्टॅनली यांच्या सुप्रसिद्ध आफ्रिका शोधामोहिमेची सुरुवात.
१८७१ – ऑट्टो फोन बिस्मार्क जर्मनीच्या चान्सेलरपदी.
१८८५ – फेरीच्या दुसऱ्या फ्रेंच सरकारचा राजीनामा.
१८८८ – लंडन येथे आर्थर पिनेरो यांच्या स्वीट लव्हेंडरचा पहिला खेळ.
१८९० – ऑस्ट्रियन ज्यू समाजाला कायदेशीर मान्यता.
विसावे शतक-
१९०९ – अमेरिकेचे मोरान व मॅकफरलॅण्ड युरोपच्या पहिल्या सहा दिवसीय सायकल स्पर्धेचे विजेते.
१९१३ – अमेरिकेच्या ओहायो प्रांतात पूराचे ४०० बळी.
१९१८ – पहिले महायुद्ध – सॉमची दुसरी लढाई सुरू.
१९२३ – अमेरिकेच्या आकाशवाणीवर पहिल्या परकीय भाषेच्या अभ्यासक्रमाचे प्रसारण.
१९२४ – मास इन्व्हेस्टर्स फंड अमेरिकेचे पहिले म्युच्युअल फंड झाले.
१९२५ – एडिनबर्गमधील मरेफिल्ड क्रीडांगणाचे उद्घाटन.
१९२५ – इराणने खोर्शिदी सौर हिज्राह दिनदर्शिका स्वीकारली.
१९२७ – ब्रिटीश नौदलाची माघार आणि गुमिंगडॅंग सैन्याचा शांघाईवर विजय.
१९३३ – अॅडॉल्फ हिटलर, गोरिंग, ब्रुनिंग व जर्मन सैन्याच्या इतर उच्च अधिकाऱ्यांची बर्लिन येथे बैठक.
१९३३ – जपानच्या हॉकोडर्ट येथील आगदुर्घटनेत १,५०० लोक मृत्युमुखी.
१९३५ – पर्शियाचे इराण हे अधिकृतरीत्या नामकरण.
१९४० – पॉल रेनॉ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
१९४२ – जर्मनीचा माल्टावर जोरदार हल्ला.
१९४३ – अॅडॉल्फ हिटलरवर प्राणघातक हल्ल्याचा असफल प्रयत्न.
१९४३ – आठव्या ब्रिटीश सैन्यदलाचा ट्युनिशियाच्या मरेथ लाईन वर हल्ल्याला प्रारंभ.
१९४५ – दुसरे महायुद्ध – ब्रिटीश सैनिकांनी मांडले जपानी आधिपत्यातून मुक्त केले.
१९५२ – अमेरिकेच्या आर्कान्सा, टेनेसी, मिसूरी, मिसिसिपी, अलाबामा व केंटकी प्रांतातील चक्रीवादळात ३४३ मृत्युमुखी.
१९५८ – सोवियेत संघाची वातावरणीय अण्वस्त्र चाचणी.
१९६० – दक्षिण आफ्रिकेतील वंशवादाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या निःशस्त्र आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. ६९ ठार, १८० जखमी.
१९६२ – स्वनातीत गतीने प्रवास करणारा अस्वल हा पहिला प्राणी.
१९६८ – इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेवरील हल्ल्यासाठी जॉर्डन नदी ओलांडली.
१९६९ – अमेरिकेची नेव्हाडा केंद्रावर अण्वस्त्र चाचणी.
१९७१ – क्रिकेट खेळात जॉर्जटाऊन येथे भारताच्या सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिलेवहिले शतक, ११६ धावा.
१९७५ – ३००० वर्षांनंतर इथियोपियातील राजेशाही समाप्त.
१९७९ – इजिप्शियन संसदेची इस्रायेलशी शांतता करार करण्यास अविरोध मान्यता.
१९८० – अमेरिकेने सोवियेत संघाच्या मॉस्को शहरात होऊ घातलेल्या बाविसाव्या ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
१९९० – नामिबिया दक्षिण आफ्रिकेपासून स्वतंत्र झाले; सॅम नुजाना राष्ट्राध्यक्ष.
१९९१ – अमेरिकन नौदलाच्या दोन पाणबुडीविरोधी विमानांच्या टकरीत २७ जण समुद्रात बेपत्ता.
१९९३ – डन्स स्कोट्सला पोप जॉन पॉल द्वितीयने संतपद बहाल केले.
एकविसावे शतक-
२००५ – मिनेसोटाच्या रेड लेक गावातील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने १० व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले.
जन्म-
१८५४ – ऍलिक बॅनरमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९१६ – बिस्मिल्ला खॉं, भारतीय सनईवादक.
१९४६ – टिमोथी डाल्टन, इंग्लिश अभिनेता.
१९७८ – राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू-
१६१७ – पोकाहोन्टास, मूळ अमेरिकन स्त्री, पोव्हाटनची मुलगी.
१८४३ – ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन-
पृथ्वी दिन.
सलोखा दिन – ऑस्ट्रेलिया.
मातृ दिन – इजिप्त, लेबेनॉन, जॉर्डन.
स्वातंत्र्य दिन – नामिबिया.
मानवी हक्क दिन – दक्षिण आफ्रिका.
वंशभेद निर्मूलन दिन – संयुक्त राष्ट्रे.
जागतिक वन दिन
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत- mp3
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना-
बोधकथा-
एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजा-पाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या.
दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.
द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना ‘तू कुठे अन् का जातोस,’ ते विचारलं.
चोर म्हणाला, ‘मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?’
अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून मला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे.
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत-
बालगीत-
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा
@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
#21 march, 21 march 2023, 21 march 2021 panchang, 21 march 2022 special day, 21 march 2023 weather, 21 march 2022 panchang in hindi, 21 march is celebrated as, what is celebrated on 21 march, 21 march 2022