23 June | 23 जून दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

23 June

23 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– शुक्रवार

दिनांक- 23/06/2023, 23 June

मिती- आषाढ शुक्ल 5

शके– 1945

सुविचार- जो कर्तव्याला जागतो, तो कौतुकास पात्र होतो.

म्हणी व अर्थ-

  • गरज सरो, वैद्य मरो – आपले काम संपताच उपकार कर्त्याला विसरणे.
23 जून दिनविशेष

ठळक घटना आणि घडामोडी

23 जून (23 june) हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७४ वा किंवा लीप वर्षात १७५ वा दिवस असतो.

सोळावे शतक

  • १५३२ – हेन्री आठवा व फ्रांस्वा पहिल्याने चार्ल्स पाचव्याविरुद्ध गुप्त कट रचला.

सतरावे शतक

  • १६८३ – पेनसिल्व्हेनियात विल्यम पेनने स्थानिक लेनी लेनापे जमातीशी मैत्री करार केला.

एकोणिसावे शतक

  • १८६५ – अमेरिकन यादवी युद्ध – ओक्लाहोमातील फोर्ट टौसन येथे दक्षिणेच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली.
  • १८९४ – आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना.

विसावे शतक

  • १९१९ – एस्टोनियन मुक्ती युद्ध – जर्मन सैन्याची हार. एस्टोनियात हा दिवस विजय दिन म्हणून पाळला जातो.
  • १९४० – दुसरे महायुद्ध – एडॉल्फ हिटलरने पराभूत पॅरिसला भेट दिली.
  • १९५६ – गमाल अब्दुल नासर इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९५९ – नॉर्वेतील स्टालहाइम शहरात हॉटेलला आग. ३४ ठार.
  • १९६८ – आर्जेन्टिनाची राजधानी बोयनोस एर्समध्ये फुटबॉल सामन्या दरम्यान चेंगराचेंगरी. ७४ ठार.
  • १९७९ – दुसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने इंग्लंडला ९२ धावांनी हरवले.
  • १९८५ – दहशतवाद्यांनी ठेवलेल्या बॉम्बचा एर इंडियाच्या कनिष्क या बोईंग ७४७ प्रकारच्या विमानात स्फोट. ३२९ ठार.
  • १९९० – मोल्दाव्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.

जन्म

  • ४७ – फेरो टॉलेमी पंधरावा.
  • १७६३ – जोसेफिन, फ्रांसची सम्राज्ञी.
  • १८९४ – एडवर्ड आठवा, इंग्लंडचा राजा.
  • १९१० – गॉर्डन बी. हिंकली, मोर्मोन चर्चचा अध्यक्ष.
  • १९१२ – ऍलन ट्युरिंग, इंग्लिश गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
  • १९१६ – लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३६ – कॉस्टास सिमिटिस, ग्रीक पंतप्रधान.
  • १९३७ – मार्टी अह्तीसारी, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४३ – व्हिंट सर्फ, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व इंटरनेटच्या जनकांपैकी एक.
  • १९५७ – डेव्हिड हॉटन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८० – रामनरेश सरवण, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ७९ – व्हेस्पासियन, रोमन सम्राट.
  • १०१८ – हेन्री पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
  • १५१६ – फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.
  • १८९१ – विल्हेल्म एडवर्ड वेबर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९५३ – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, संस्थापक-भारतीय जनसंघ; शिक्षणतज्ञ.
  • १९७५ – जनरल प्राणनाथ थापर, भारतीय भूसेना प्रमुख.
  • १९८२ – हरिभाऊ देशपांडे, गंधर्व युगातील ऑर्गनवादक.
  • १९९६ – आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीक पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस – सुरुवात 1948.
  • विजय दिन – एस्टोनिया.
  • पितृ दिन – पोलंड.
  • संत जोनास दिन – लिथुएनिया.
  • राष्ट्र दिन – लक्झेम्बर्ग.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान- 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना-

नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।धृ.॥
शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा, चिमणपाखरा ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ।।१॥
विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा, दयासागरा ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ॥२॥
होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा, उंच अंबरा ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ॥३॥

बोधकथा-

ससा आणि कासव 
एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते. ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ.  कासव थोडे मंद असते. पण दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवासोबत पैज लावण्याची इच्छा होते. तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया. जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल. ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की, ‘जो कोणी समोरच्या टेकडीपर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.’
ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीला खूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत. त्यावर कसा म्हणाला, ”जो पर्यंत कासव माझ्यापर्यंत पोहचेल तो पर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससापर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली. ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना… त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससाच्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.
तात्पर्य :  कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत-

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

सामान्यज्ञान

1) Name the National river of India?
Ans. Ganga
2) Name the National Reptile of India?
Ans. King Cobra
3) What is the capital of India?
Ans. New Delhi
4) Name the biggest continent in the world?
Ans. Asia
5) How many continents are there in the world?
Ans. 7 continents
6) वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर: कार्बन डायऑक्साईड
7) कोणाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय (Anemia) हा रोग होतो ?
उत्तर: लोह
8) पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी काय वापरण्यात येते ?
उत्तर : क्लोरीन
9) कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंधाळेपणा हा रोग होतो ?
उत्तर: ‘अ’ जीवनसत्व
10) त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
उत्तर : मेलानिन

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

प्रार्थना-

  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

देशभक्तीपर गीते-

  1. सारे जन्हां से अच्छा
  2. हम होंगे कामयाब 
  3. बलसागर भारत होवो

अधिक माहितीसाठी-

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#23 june, 23 june 2023,23 june 2021 panchang, 23 june 2022 special day, 23 june 2023 weather, 23 june 2022 panchang in hindi, 23 june is celebrated as, what is celebrated on 23 june, 23 june 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.