24 June | 24 जून दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

24 June

24 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– शनिवार

दिनांक- 24/06/2023, 24 June

मिती- आषाढ शुक्ल 6

शके– 1945

सुविचार- विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

म्हणी व अर्थ-
भरंवशाच्या म्हशीला टोणगा
अर्थ- पूर्ण निराशा करणे
24 JUNE चा परिपाठ

ठळक घटना आणि घडामोडी

24 जून हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७५ वा किंवा लीप वर्षात १७६ वा दिवस असतो.

चौदावे शतक

१३१४ – बॅनॉकबर्नची लढाई – रॉबर्ट द ब्रुसने एडवर्ड दुसऱ्याला हरवून स्कॉटलॅंड पुन्हा स्वतंत्र केले.

१३४० – शंभर वर्षांचे युद्ध – एडवर्ड तिसऱ्यालाने फ्रांसच्या आरमाराचा धुव्वा उडवला.

पंधरावे शतक

१४४१ – इटन कॉलेजची स्थापना.

१४९७ – जॉन कॅबट न्यू फाउंडलॅंडला पोचला.

सोळावे शतक

१५७१ – मिगेल लोपेझ दि लेगाझ्पीने मनिला शहराची स्थापना केली.

सतरावे शतक

१६६४ – न्यू जर्सी वसाहतीची स्थापना.

१६९२ – किंग्स्टन शहराची स्थापना.

अठरावे शतक

१७९३ – फ्रांसने पहिले प्रजासत्ताक संविधान अंगिकारले.

एकोणिसावे शतक

१८१२ – नेपोलियन बोनापार्टने रशियावर आक्रमण केले.

१८२१ – काराबोबोची लढाई.

विसावे शतक

१९१३ – ग्रीस व सर्बियाने बल्गेरियाबरोबरचा तह धुडकावला.

१९१६ – पहिले महायुद्ध – सॉमची लढाई.

१९४० – दुसरे महायुद्ध – फ्रांस व इटलीमध्ये संधी.

१९४८ – सोवियेत संघाने दोस्त राष्ट्रांचा बर्लिनशी जमिनीवरून संपर्क तोडला.

१९७५ – ईस्टर्न एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावर कोसळले. ११३ ठार.

१९९४ – अमेरिकन वायुसेनेचे बी-५२ प्रकारचे विमान फेरचाइल्ड एरफोर्स बेस येथे कोसळले. ४ ठार.

१९९६ – मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम केला

एकविसावे शतक

२००२ – टांझानियात इगांडुजवळ रेल्वे अपघात. २८१ ठार.

२००४ – न्यू यॉर्क राज्यात मृत्युदंड असंवैधानिक ठरवण्यात आला.

जन्म

१९०९ – गुरू गोपीनाथ, शास्त्रीय नर्तक.

१९२७ – कवियरासू कन्नडासन, तमिळ लेखक.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान- 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना-

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

स्वप्न आणि सत्य
एकदा स्‍वप्‍न आणि सत्‍य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता, ’भविष्‍य घडविण्‍यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’. दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना.
शेवटी दोघेही आपल्‍या पित्‍याकडे गेले. पित्‍याला वादाचा विषय सांगितला. पिता म्‍हणाला,’’ज्‍या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्‍याचा भविष्‍य घडविण्‍यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले.
सर्वप्रथम स्‍वप्नाने एकाच उडीत त्‍याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्‍हाच उचलले गेले होते. मग सत्‍याने प्रयत्‍न केला मात्र त्‍याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्‍न केले पण दोघेही अयशस्‍वी राहिले. शेवटी थकून ते पुन्‍हा एकदा पित्‍याकडे गेले.
तेव्‍हा पिता म्‍हणाला,’’ भविष्‍य घडविण्‍यात सत्‍य आणि स्‍वप्‍न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’
तात्पर्य:- खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहला हवे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत-

हे राष्ट्र देवतांचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

बालगीत

आईचं बोट सोडून, एकटाच फिरतो ।

अंधारात चांदण्यांशी लपाछपी खेळतो ।

अंगाई गीत ऐकूनही जागाच राहतो ।

कधीच कोणाला घाबरत नाही ।

कसं होणार या माझ्या चांदोबाच, कळतच नाही ।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

सामान्यज्ञान

✪  जगातील सर्वांत मोठे व्दीप कोणते ?
  ➜ ऑस्ट्रेलिया.
 ✪  अरवली पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणतं ?
  ➜ गुरू शिखर.
 ✪  ‘सिटी ऑफ गोल्डन गेट’ कोणत्या शहराला म्हणतात ?
  ➜ सॅन फ्रान्सिस्को.
 ✪  भारताची सर्वांत जास्त लांब स्थलसीमा कोणत्या देशासोबत आहे ?
  ➜ बांग्लादेश.
 ✪ कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते ?
  ➜ ८ राज्यातून.

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

प्रार्थना-

  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

देशभक्तीपर गीते-

  1. सारे जन्हां से अच्छा
  2. हम होंगे कामयाब 
  3. बलसागर भारत होवो

अधिक माहितीसाठी-

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#24 june, 24 june 2023, 24 june 2021 panchang, 24 june 2022 special day, 24 june 2023 weather, 24 june 2022 panchang in hindi, 24 june is celebrated as, what is celebrated on 24 june, 24 june 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.