19 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

19 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ-

परिपाठ_19~डिसेंबर

आज वार- सोमवार , दिनांक- 19/12/2022, 

मिती- मार्गशीर्ष कृष्ण एकादशी , शके-1944   

सुविचार –
संयम हा खूप कडवट असतो, पण त्याच फळ फार गोड असतं.
म्हणी व अर्थ –
चोराच्या मनात चांदणे.
अर्थ: वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटत असते.             

आजचा दिनविशेष-

  • गोवा मुक्ती दिन
  • स्वातंत्र्य दिन – झांझिबार

ठळक घटना आणि घडामोडी

१९२७ – राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

१९४१ – दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.

२००२ – व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चौथे शतक

३२४ – रोमन सम्राट लिसिनीयसने पदत्याग केला

बारावे शतक

११८७ – क्लेमेंट तिसरा याची पोपपदी निवड

अठरावे शतक

१७७७ – अमेरिकन क्रांती – जॉर्ज वॉशिंग्टनच्या कॉंटिनेन्टल आर्मीने व्हॅली फोर्ज येथे हिवाळी मुक्काम केला

विसावे शतक

१९०५ – लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू झाली

१९१६ – पहिले महायुद्ध-व्हर्दुनची लढाई – फ्रांसच्या सैन्याने चढाई करणाऱया जर्मन सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले

१९६१ – भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन

१९६३ – झांझिबारला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य. सुलतान हमुद बिन मोहम्मद राजेपदी

१९७२ – अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले

१९९७ – सिल्क एरची फ्लाइट १८५ हे बोईंग ७३७-३०० जातीचे विमान इंडोनेशियात पालेम्बॅंग जवळ मुसी नदीत कोसळले. १०४ ठार

एकविसावे शतक

२००१ – व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण

२०१० – सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यातील विक्रमी ५० वे शतक केले. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्‌स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला

२०१० – राहुल द्रविडने कसोटी सामन्यातील १२,००० धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्‌स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला

जन्म

१५५४ – फिलिप विल्यम, ऑरेंजचा राजकुमार.

१६८३ – फिलिप पाचवा, स्पेनचा राजा.

१८९४ – कस्तुरभाई लालभाई, भारतीय दानशूर व उद्योगपती.

१८९९ – मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते.

१९१९ – ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’’ओमप्रकाश’’, हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेते.

१९२७ – वसंत वऱ्हाडपांडे, मराठी समीक्षक व भाषाअभ्यासक

१९४० – गोविंद निहलानी, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.

१९६९ – नयन मोंगिया भारतीय क्रिकेट खेळाडू.

१७७८ – मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी

१९३४ – प्रतिभा पाटील, भारतीय राजकारणी, भारताच्या पहिल्या महिला व १२व्या राष्ट्रपती.

१९७४ – रिकी पॉंटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

४०१ – पोप अनास्तासियस पहिला

१३७० – पोप अर्बन पाचवा

१७३७ – जेम्स सोबेस्की, पोलंडचा युवराज

१७४१ – व्हिटस बेरिंग, नेदरलॅंड्सचा शोधक

१९२७ – अशफाक उल्ला खान – भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १९००)

१९२७ – राम प्रसाद बिस्मिल – भारतीय स्वातंत्र सेनानी (ज. १८९७)

१९३९ – हान्स लॅंगडोर्फ, जर्मन आरमारी अधिकारी

१९५३ – रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन, नोबेल पारितोषिक विजेता

१९९७ – डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष

१९९८ – जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक

१९९८ – छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक

१९९९ – हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक

२०१० – गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा

वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा

बडबडगीत

नाच रे मोरा
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात , नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
कवी : ग. दि. माडगूळकर

बोधकथा-

मुंगी व कोशातला किडा

एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.
यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला.
तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे.
आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो. इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.
तात्पर्य:-
संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.

 प्रश्नमंजुषा

१) घोड्याच्या निवा-याला काय म्हणतात?
– तबेला
२) कोंबड्याच्या निवा-याला काय म्हणतात ?
– खुराडे
३) मधमाशीच्या निवा-याला काय म्हणतात ?
– पोळे
४) मुंग्याच्या निवा-याला काय म्हणतात ?
  – वारूळ
५) गायीच्या निवा-याला काय म्हणतात ?
– गोठा

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

मंगल देशा 
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ||
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ॥२॥

आजच्या बातम्या

 लोकायुक्त कायद्याला मंत्रीमंडळाची मंजुरी.
 सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, हजारो उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, 20 डिसेंबरला मतमोजणी.
 विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून, सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत.
लोकायुक्त कायद्याचं बील याच अधिवेशनात मांडणार, मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत – देवेंद्र फडणवीस.
पंढरपूरमधील वादग्रस्त कॉरिडॉरच्या विरोधात उतरले डॉ. सुब्रमण्यम स्वामी; कोणतेही पाडकाम करणार नाही, अभियंत्यांचा दावा.
पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी मोठा विजय, ऑस्ट्रेलियानं केवळ दोन दिवसांत जिंकला कसोटी सामना, दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा भारताला फायदा.

मराठी परिपाठ

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.