20 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

20 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

परिपाठ_20~डिसेंबर

आज वार- मंगळवार , दिनांक- 20/12/2022, 

मिती- मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, शके-1944   

सुविचार –
कोणतेही अडथळे नसलेली साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.
म्हणी व अर्थ –
आलीया भोगासी असावे सादर-
अर्थ :- आपल्या कर्मात जे काही लिहले आहे त्यानुसार भोगावे लागते, त्याबद्दल कुरकुर करू नये.

आजचा दिनविशेष-

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन

ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक-

१५२२ – नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले.

एकोणिसावे शतक-

१८०३ – लुईझियाना खरेदी पूर्ण.

१८६० – दक्षिण कॅरोलिना युनायटेड स्टेट्सपासून फुटून निघाले.

विसावे शतक-

१९१७ – रशियात पहिल्या गुप्त पोलीस संस्थेची (चेका) स्थापना.

१९५२ – अमेरिकन हवाई दलाचे सी.१२४ जातीचे विमान वॉशिंग्टन राज्यात मोझेस लेक येथे कोसळले. ८७ ठार

१९७३ – स्पेनच्या पंतप्रधान ॲडमिरल लुइस कारेरो ब्लांकोचा माद्रिदमध्ये कार बॉम्बने खून.

१९८९ – ऑपरेशन जस्ट कॉझ – अमेरिकेने पनामातील मनुएल नोरिगाचे सरकार उलथविण्यासाठी सैन्य पाठविले.

१९९५ – नाटोचे शांतिसैन्य बॉस्नियामध्ये दाखल.

१९९५ – अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ९६५ हे बोईंग ७५७ जातीचे विमान कोलंबियात कालीजवळ कोसळले. १६० ठार.

१९९९ – पोर्तुगालने मकाउचे बेट चीनला परत केले.

१९४५ – मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू

१९७१ – झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९८८ – मतदानाचे किमान वय २१वरून १८वर आणणारी ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर.

१९९४ – राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान

एकविसावे शतक-

२००१ – आर्थिक अडचणीत सापडलेल्या आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो दिला रुआला राजीनामा देणे भाग पडले.

जन्म-

१५३७ – जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.

१९४० – यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री

१९४२ – राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)

मृत्यू-

२१७ – पोप झेफिरिनस.

१७३१ – छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा

१९१५ – लेखक, समाजसुधारक व भारतीय छपाईतंत्रात महत्त्वाचे बदल आणणारे उपेंद्रकिशोर रॉयचौधरी

१९३३ – विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.

१९५६ ‌ – देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.

१९८१ – संगीत दिग्दर्शक कनु रॉय

१९९३ – वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार

१९९६ – दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक

१९९८ – बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी

२००४ – पोलीसकथालेखक व. कृ. जोशी

२००९ – कवी अरुण कांबळे

२०१० – सुभाष भेंडे – लेखक

२०१० – नलिनी जयवंत – अभिनेत्री

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा

वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा

बडबडगीत

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे

कवियत्री : वंदना विटणकर

बोधकथा-

मनातील आवाज
नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा मारत बसलेले होते. अचानक आकाशवाणी सुरू झाली…
“जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल… “
आकाशवाणी सुरूच असते. माकड,माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते…. काय करू…? काय करू…. ? काय करू… ?
दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते, तेवढ्यात माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते… माकड ओरडतो, “वेडी झालीस का? असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर….”
तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते, ” अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते; पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे.
संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे आज तु माकडच राहिलास. संधी दररोज मिळत नाही. तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास..!!”
तात्पर्य :-
मित्रांनो, मनातील आवाज हा आकाशवाणी सारखाच असतो. जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे; अन्यथा माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून ‘माकड‘ बनून राहावे लागेल.

 प्रश्नमंजुषा

वर्षातील सर्वात लहान दिवस कोणत्या तारखेला असतो?
-22 डिसेंबर
संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान  कोणत्या ठिकाणी आहे?
-देहू
365 दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात?
-सौरवर्ष
आपल्या घरासमोर लावण्यात येणाऱ्या औषधी वनस्पतीचे नाव काय?
-तुळशी
आवाजाची तीव्रता कशाच्या सहाय्याने मोजतात?
-डेसिबल

 *गाडगे महाराज*

डेबूजी झिंगराजी जानोरकर
“संत गाडगे महाराज अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी  सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
 अशा या महान संतास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
जन्म :~ २३ फेब्रुवारी १८७६
शेणगाव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू :~ २० डिंसेंबर १९५६
वलगांव (अमरावती)
गाडगे महाराज-
  हे ईश्वर कशात आहे सुद्धा नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.
“देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.
माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

मंगल देशा 

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ||

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा

भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा

शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;

जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,

वैभवासि, वैराग्यासी

जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा

सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा

पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा

गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची

मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची

ध्येय जे तुझ्या अंतरी ॥२॥

मराठी परिपाठ

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.