21 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

21 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ-

आज वार- बुधवार, दिनांक- 21/12/2022,

मिती- मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी, शके-1944   

सुविचार- अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.  

म्हणी व अर्थ-
वासरात लंगडी गाय शहाणी–
अर्थ -अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो.             

आजचा दिनविशेष-

21 डिसेंबर

ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक-

१६२० – विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.

एकोणिसावे शतक-

१८९८ – मरी आणि पिएर क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला.

विसावे शतक-

१९०९ – अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला.

१९१३ – आर्थर विनचे वर्ड क्रॉस, हे पहिले शब्दकोडे न्यू यॉर्क वर्ल्डमध्ये प्रकाशित.

१९५८ – चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुरला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.

१९६८ – अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रॅंक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.

१९७९ – लंडन मध्ये ऱहोडेशियाच्या स्वातंत्र्यासाठीच्या ठरावाचा मसुदा ठरला.

१९८६ – रघुनंदन स्वरूप पाठक यांनी भारताचे १८वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८७ – फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.

१९८८ – लिब्यातील अतिरेक्यांनी पॅन ऍम फ्लाइट १०३ या बोईंग ७४७ जातीच्या विमानात लॉकरबी, स्कॉटलंड वर बॉम्बस्फोट घडविला. जमिनीवरील ११ सह २७० ठार.

१९९९ – स्पेनच्या नागरी रक्षकांनी ९५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली गाडी पकडली. तोरे पिकासो वरील हल्ला टळला.

एकविसावे शतक-

२००१ – देशावरील आर्थिक संकट आणि शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो देला रुआची हकालपट्टी.

जन्म-

१७९५ – लेओपोल्ड फॉन रांक, जर्मन इतिहासकार.

१८०४ – बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८७९ – जोसेफ स्टालिन, १९२२ ते १९५३ पर्यंतसोवियेत युनियनचा नेता.

१९०३ – भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती.प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक

१९२१ – पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश

१९३२ – यू.आर. अनंतमूर्ती, ज्ञानपीठविजेते लेखक.

१९३२ – अमीन सयानी, रेडियो निवेदक.

१९३५ – दत्ता टोळ, मराठी बालसाहित्यिक.

१९४२ – हू चिंताओ, चीनचे नागरी गणतंत्रचा राष्ट्राध्यक्ष.

१९५४ – क्रिस एव्हर्ट-लॉईड, ब्रिटीश टेनिस खेळाडू.

१९५९ – कृष्णम्माचारी श्रीकांत, भारतीय क्रिकेट खेळाडू, संघनायक आणि निवड समितीचे अध्यक्ष.

१९६३ – गोविंदा, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९६७ – मिखाइल साकाश्विलि जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू-

१२९५ – प्रोव्हान्सची मार्गेरित बेरेन्जर, फ्रांसचा राजा लुई नववा याची राणी.

१३०८ – हेसीचा हेन्री पहिला.

१८२४ – जेम्स पार्किन्सन, कंपवाता आणि मानवी मेंदू संशोधक.

१९४५ – जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.

१९७९ – नरहर रघुनाथ तथा न.र. फाटक, मराठी चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक.

१९९३ – मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार.

१९९७ – पं. प्रभाशंकर गायकवाड, भारतीय सनईवादक.

१९९७ – निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ पी. सावळाराम, मराठी भावगीतलेखक.

२००४ – औतारसिंग पेंटल भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.

१९१३ – आर्थर विन

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारिता दुरिता हरा ॥

बोधकथा-

 सिंहाचा सल्ला-
गाढव वाघाला बोलतो गवत पिवळं असतं. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरवं असतं. त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला. दरबारात सर्व जमलेले असतात.
गाढव शहाणपणा करत सर्वांसमोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळं असतं आणि हा वाघ बोलतो कि हिरवं असतं आता तुम्ही सांगा कि खरं काय आणि खोटं काय. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांसमोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत पिवळं असतं. आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने माकडउड्या मारत जंगलात निघून जाते.
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो कि ,तुम्हाला माहित आहे ना कि गवत हिरवं असतं तरीही का मला शिक्षा केली. सिंह बोलला कि मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे.
आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली.
तात्पर्य-
ध्येय गाठायचं असेल तर वाटेत येऊन भुंकणारया कुत्र्यांकडे दगड न फेकता बिस्कीट फेका. आणि पुढे व्हा कारण पुढे वाटेत अशी भरपूर कुत्री भेटणार आहेत. ध्येय महत्वाचं आहे कुत्र्यांबरोबरचा वाद नाही !

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हा तुझी मुळीहि गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ
जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
मराठी परिपाठ,
परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.