आजचा दिनविशेष-
22 डिसेंबर-
गणित दिन (भारत)
१८८७ – श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ यांचा जन्म
उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक-
१६०३ – ऑट्टोमन साम्राज्याचा सुलतान महमद तिसरा याचा मृत्यू. अहमद पहिला सुलतानपदी.
एकोणिसावे शतक-
१८०७ – अमेरिकन काँग्रेसने एम्बार्गो ऍक्ट केला. अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध संपुष्टात.
१८०९ – अमेरिकन काँग्रेसने नॉन इंटरकोर्स ऍक्ट केला. एम्बार्गो ऍक्ट रद्द. युनायटेड किंग्डम व फ्रांस शिवाय अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध परत सुरू.
१८५१ – जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली.
१८६४ – विल्यम टेकुमेश शेर्मनची समुद्रास कूच समाप्त. सवाना, जॉर्जिया युनियन सैन्याने काबीज केले.
१८८५ – इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला.
विसावे शतक-
१९०९ – भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली.
१९३७ – न्यू यॉर्कमध्ये लिंकन टनेल वाहतुकीसाठी खुली.
१९६३ – क्रुझ शिप लाकोनिया मडेरापासून २९० कि.मी. उत्तरेस जळाली. १२८ ठार.
१९५३ - राज्य पुनर्रचनेसाठी भारतात उच्चाधिकार समिती स्थापन. यातून पुढे भाषावार प्रांतरचना झाली.
१९७२ – अँडीज पर्वतराजीत विमान कोसळल्यानंतर दहा आठवड्यांनी १४ प्रवासी जिवंत सापडले. त्यांनी काही काळ मानवी मांसावर गुजराण केली होती.
१९८९ – आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर हुकूमशहा निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे राष्ट्राध्यक्षपद सोडले. शीतयुद्धाच्या अखेरीला कम्युनिस्ट राष्ट्रे कोसळण्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा.
१९८९ – बर्लिनचे ब्रॅन्डेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
१९९५ – प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
१९८४ – न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेत बर्नार्ड ह्युगो गोत्झने चार गुंडांना गोळ्या घातल्या.
१९८९ – आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे अध्यक्षपद सोडले. इयोन इलेस्क्यु अध्यक्षपदी.
१९८९ – बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
१९९० – लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
१९९९ – स्पेनच्या नागरी रक्षकांनी ७५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली अजुन एक गाडी पकडली. (पहा डिसेंबर २१)
१९९९ – तांद्जा ममदु नायजरच्या राष्ट्राध्यक्षपदी.
एकविसावे शतक-
२००१ – काबुल, अफगाणिस्तानमध्ये बुरहानुद्दीन रब्बानीने सत्तेची सूत्रे हमीद करझाईला दिली.
२००१ – रिचार्ड रीड या दहशतवाद्याने अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट ६३ मध्ये आपल्या बुटात लपविलेली स्फोटके उडविण्याचा प्रयत्न केला.
जन्म-
११७८ – अंतोकु, जपानी सम्राट.
१६६६ – गुरू गोबिंद सिंघ, शिख धर्मगुरू.शिखांचे १० वे गुरू
१९०३ – आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपती.
१९१२ – लेडी बर्ड जॉन्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनची पत्नी.
१९७२ – व्हेनेसा पॅरेडिस, फ्रेंच गायिका.
मृत्यू-
१६०३ – महमद तिसरा, ऑट्टोमन सुलतान.
१८८० – जॉर्ज इलियट, ब्रिटीश लेखिका(टोपण नाव).
१९४५ – श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
१९७५ – पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. ’राम जोशी’, ’अमर भूपाळी’, ’दो ऑंखे बारह हाथ’, ’झनक झनक पायल बाजे’, ’गुॅंज उठी शहनाई’ आदी गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले.
१९७९ – नरहर रघुनाथ फाटक, भारतीय ईतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक.
१९९६ – रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार
इ.स. १९९५ – जेम्स मीड, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता
१९९७ – पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.
१९९७ – पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.
२००२ – दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते
२०११ – वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज
प्रतिवार्षिक पालन-
तोजी – जपान
मातृदिन – इंडोनेशिया
सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
प्रार्थना-
सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारिता दुरिता हरा ॥
बोधकथा-
लोभी दुकानदार –
एक ब्राह्मण यजमानाकडे पूजा अर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला.
तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला.
वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,”तू असा माझ्यासमोर का उभा आहेस .
ब्राह्मणाने आपली कर्म कहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले.
ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला. तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले.
दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला लगेच समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस.
तात्पर्य : लोभाने माणसाच्या जीवावर बेतू शकते.
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
शूर आम्ही सरदार –
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती !
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेईल अशी पहाडी छाती !
जिंकावे वा कटुन मरावं हेच आम्हाला ठावं
लढुन मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं
देशापायी सारी विसरू माया-ममता-नाती !
बालगीत –
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक…गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक…वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक…वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक…
प्रश्नमंजुषा-
पंचवीस वर्षानंतर साजरा होणा-या महोत्सवाला काय म्हणतात?
– रौप्य महोत्सव
पन्नास वर्षांनंतर साजरा होणा-या महोत्सवाला काय म्हणतात?
सुवर्ण महोत्सव
पंचाहत्तर वर्षानंतर साजरा होणा-या महोत्सवाला काय म्हणतात?
अमृत महोत्सव
शंभर वर्षानंतर साजरा होणा-या महोत्सवाला काय म्हणतात?
– शताब्दी महोत्सव
व्यक्तीविशेष-
श्रीनिवास रामानुजन
श्रीनिवास रामानुजन हे भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ ला एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांचा परिवार भारताच्या तामिळनाडू च्या कोइम्बतुर मधील इरोड गावात झाला. त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगर हे साड्यांच्या दुकानात मुनीम म्हणून काम पाहत असत.
त्यांची आई कोमल तम्मल ह्या एक गृहिणी असतानाच सोबत एका स्थानिक मंदिरात गायिका सुद्धा होत्या. आणि ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाला आपल्या आईची जवळीक असते तसे त्यांनाही त्यांच्या आईच्या जवळ राहायला जास्त आवडायचे. सुरुवातीला रामानुजन कुम्भकोणम या गावी परीवारासोबत राहायचे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण हे कुम्भकोणम या गावामध्येच झाले, आणि त्यांना सुरुवाती पासून गणिताची आवड असल्याने बाकी इतर विषयांमध्ये रुची निर्माण झालीच नाही, ते शाळेत असताना त्यांच्या घरी काही पदवीचे मुले भाडेकरू म्हणून राहत असत. आणि रामानुजन गणितात एवढे तरबेज होते कि ते सातवीत असतानाच पदवीच्या त्या मुलांना गणित शिकवत असत. यावरून आपण समजू शकतो कि रामानुजन नावाच्या या गणितज्ञामध्ये किती मोठी प्रतिभा लपलेली होती.
या महान गणित तज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
आवड-
रामानुजन यांना गणित आणि इंग्रजी या दोन विषयांची विशेष आवड होती, सुरुवातीला त्यांना त्यांच्या अलौकिक प्रतिभेमुळे शिष्यवृत्ती मिळाली, ते गणितामध्ये एवढे मग्न झाले होते कि त्यांनी इतर विषयांकडे लक्षच दिले नाही, रामानुजन यामुळे १२ वी मध्ये नापास झाले. आणि त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती सुद्धा बंद झाली.
त्यानंतर त्यांच्या शिक्षणाचे दरवाजे बंद झाले, आता ते बेरोजगार झाले होते कारण त्यांच्याकडे आता कोणतेही काम नव्हते, आणि हा काळ त्यांच्या साठी खूप कठीण काळ होता या कठीण काळात त्यांच्याकडे त्यांच्या गणिता शिवाय कोणतीही गोष्ट नव्हती,
त्यांना या कठीण काळात खूप काही सहन करावे लागले, जसे लोकांजवळ त्यांना पैशांची भिक सुद्धा मागावी लागली, रस्त्यावरचे कागद सुद्धा उचलून आपला उदरनिर्वाह करावा लागला.
नंतर तर त्यांची तब्येत सुद्धा घसरली. याच दरम्यान १९०८ मध्ये त्यांच्या आईने त्यांचे लग्न जानकी नावाच्या एका मुलीशी लावले त्यानंतर त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी येऊन पडली होती,
आता त्यांना काम शोधणे अनिवार्य झाले होते, तेव्हा त्यांनी मद्रास मध्ये जाऊन पुन्हा नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न केले, ते कोणाकडे सुद्धा जायचे तेव्हा त्यांनी सोडविलेले गणिते ते लोकांना दाखवत असत.
पण कोणीही त्या गणितांना न समजता त्यांना नकारात असे, पण खूप दिवसांच्या मेहनतीनंतर एक दिवस त्यांची भेट तेथील डिप्टी कलेक्टर श्री व्ही. रामास्वामी अय्यर यांच्याशी झाली, ते गणितामध्ये पारंगत होते,
जेव्हा त्यांनी रामानुजन यांनी सोडविलेली गणिते पाहिली तेव्हा त्यांनी ओळखले कि हि व्यक्ती एक प्रतिभावान व्यक्ती आहे, आणि त्यांनी रामानुजन यांना कामावर ठेवून घेतले २५ रुपये महिन्याच्या पगाराने.
आयुष्याला वळण-
येथून रामानुजन यांचे संपूर्ण आयुष्याला एक वेगळं वळण मिळाल, त्यानंतर त्यांनी या मासिक वेतनामधून पुन्हा आपल्या शिक्षणाची वाटचाल सुरु केली. एक वर्ष मद्रास मध्ये राहून त्यांनी स्वतःचे एक शोध पत्र प्रकाशित केले, त्या प्रकाशित केलेल्या शोधपत्रकाचे नाव होते, “जर्नल ऑफ इंडियन मॅथेमेटिकल सोसाइटी असे होते.”
या शोधपत्रकामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली, आणि १९१२ मध्ये त्यांना रामचंद्र राव यांच्या ओळखीमुळे त्यांना मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये एक क्लर्क ची नोकरी मिळाली. तेथे काही दिवसांनतर सुत्र प्राध्यापक सेशू अय्यर यांनी रामानुजन यांना केंब्रिज येथील प्रसिद्ध गणिताचे प्राध्यापक जीएच हार्डी यांना पत्र पाठविण्याचे सुचवले.
त्यानंतर रामानुजन यांनी त्यांचे सर्व प्रमेय एका पत्रात लिहून त्यांना पाठविले, आणि जीएच हार्डी यांना ते एवढे आवडले कि त्यांनी रामानुजन यांना लगेच त्यांच्याकडे बोलावून घेतले. तेथे गेल्यावर जीएच हार्डी यांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला.
१९१६ मध्ये रामानुजन यांनी बीएस्सी ची पदवी पूर्ण केली. इंग्लंड ला जीएच हार्डी आणि रामानुजन हे सर्वांच्या चर्चेचा विषय बनले. आणि जीएच हार्डी यांनी रामानुजन यांच्या जवळून खूप काही नवीन शिकायला मिळाले असे वक्तव्य सुद्धा केले होते.
१९१७ आले आणि रामानुजन यांना इंग्लंड मधील हवामान भावले नाही आणि त्यांची तब्येतीमध्ये बिघाड झाली, आणि विशेष म्हणजे तेव्हा इंग्लंड पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी असल्यामुळे इंग्लंड ला अन्नाचा तुटवडा पडला होता, आणि रामानुजन हे ब्राम्हण परिवाराचे असल्यामुळे ते शाकाहारी होते, आणि तेथे शाकाहारी अन्नाचा तुटवडा असल्यामुळे त्यांची तब्येत आणखी खालावली, ते याच दरम्यान भारतामध्ये परत आले.
ते शेवटच्या दिवसांमध्ये अंथरुणावरच पडलेले होते, खूप उपचारानंतर सुद्धा त्यांच्यात काही बदल दिसून आला नाही, त्यानंतर २६ एप्रिल १९२० ला रामानुजन यांचे निधन झाले.