23 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

23 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- शुक्रवार , दिनांक- 23/12/2022,
मिती- मार्गशीर्ष कृष्ण अमावस्या, शके-1944
सुविचार-कामात आनंद निर्माण केला की त्याच ओझं वाटत नाही.

वाक्प्रचार-
अधीर होणे – उत्सुक होणे.
म्हणी व अर्थ-
एक ना धड भाराभर चिंध्या –
एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.

आजचा दिनविशेष-

23 डिसेंबर- भारतीय किसान दिन

किसान दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेतीसंबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

ठळक घटना आणि घडामोडी

सातवे शतक-

६१९ – बॉनिफेस पाचवा पोपपदी.

अठरावे शतक-

१७८३ – जॉर्ज वॉशिंग्टनने कॉंटिनेंटल आर्मीचे सरसेनापतिपद सोडले.

एकोणिसावे शतक-

१८८८ – व्हिंसेंट व्हॅन गोने आपल्या डाव्या कानाची पाळी कापून रेचेल नावाच्या नगरवधूला भेट दिली.

विसावे शतक-

१९१३ – अमेरिकन अध्यक्ष वूड्रो विल्सनने फेडरल रिझर्व ॲक्टवर सही केली. फेडरल रिझर्व बँक अस्तित्वात.

१९१६ – पहिले महायुद्ध-मगधाबाची लढाई – दोस्त सैन्याने साइनाई, इजिप्तमध्ये तुर्कीला पराभूत केले.

१९२१ – शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.

१९४० – हिंदुस्तान एरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना तत्कालिन म्हैसूर राज्यात बंगलोर येथे प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी सुरू केला. ‘हिंदुस्थान एरक्रॉफ्ट लिमिटेड’ कंपनीचे पुढे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नामांतर झाले.

१९४७ – बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.

१९५४ – डॉ.जोसेफ ई. मरेने बॉस्टनच्या पीटर बेन्ट ब्रिगहॅम हॉस्पिटलमध्ये पहिले मानव मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले.

१९७० – वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.

१९७२ – निकाराग्वाची राजधानी मानाग्वामध्ये ६.५ रिश्टरचा भूकंप. १०,०००हून अधिक ठार.

१९७२ – उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१च्या उरलेल्या प्रवाशांना वाचविण्यात आले. अँडीज पर्वतरांगेवर विमान कोसळल्यावर ७२ दिवस अतिउंच व अतिथंड परिस्थितीत राहताना जगण्यासाठी प्रवाश्यांनी नाईलाजाने मानवमांस खाल्ले. २ प्रवाश्यांनी १० दिवस अतिकठीण डोंगर पार करून काही प्रवासी जिवंत असल्याची माहिती दिली.

१९७९ – सोवियेत सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबूल काबीज केले.

एकविसावे शतक-

२००० – कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी

२००१ – बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.

२००२ – इराकी मिग २५ प्रकारच्या विमानाने अमेरिकेचे एम.क्यू. १ प्रकारचे विमान पाडले. चालकविरहित लढाऊ विमानाने द्वंद्वयुद्धात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

२००४ – मॅकारी द्वीपांना रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का.

२००५ – अझरबैजान एरलाइन्स फ्लाइट २१७ हे बाकूहून अक्टाऊ शहराकडे जाणारे विमान उड्डाण केल्यावर लगेचच कोसळले. २३ ठार.

२००५ – डिसेंबर १८ला अड्रे शहरावर झालेल्या हल्ल्याला उत्तर म्हणून चाडने सुदानविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म-

१५३७ – योहान तिसरा, स्वीडनचा राजा.

१७७७ – झार अलेक्झांडर पहिला, रशियाचा झार.

१८०५ – जोसेफ स्मिथ, जुनियर, चर्च ऑफ जिझस क्राईस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स(मोर्मोन चर्च)चा संस्थापक.

१८४५ — रासबिहारी घोष, प्रसिद्ध कायदेपंडित, देशभक्त. काँग्रेस पक्षाचे नेते आणि अध्यक्ष.

१८९७ – कविचंद्र कालिचरण पटनाईक, ओडिशातील कवी, नाटककार व पत्रकार.

१९०२ – चौधरी चरण सिंग, भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक.

१९०२ – चौधरी चरण सिंग, भारताचे पाचवे पंतप्रधान.

१९१८ – हेल्मुट श्मिट, जर्मनीचा चान्सेलर.

१९३३ – अकिहितो, जपानचा सम्राट.

मृत्यू-

१९२६ – स्वामी श्रद्धानंद, स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, आर्य समाजाचे प्रसारक.

१९६५ – गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक

१९७९ – दत्ता कोरगावकर, हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार.

१९९८ – रत्‍नाप्पा कुंभार, स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळ नेते, साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्राचे मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य

२००० – नूरजहाँ, पाकिस्तानी गायिका.

२००४ – पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.

२००८ – गंगाधर महांबरे, मराठी साहित्यिक.

२०१० – ज्ञानेश्वर नाडकर्णी, मराठी कला समीक्षक व लेखक.

२०१० – के. करुणाकरन, केंद्रीय उद्योगमंत्री, केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री.

प्रतिवार्षिक पालन-

किसान दिन – भारत

वर्धापनदिन : विश्वभारती विद्यापीठ (शांतिनिकेतन)


राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल. ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.
ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” जोपर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला. कासव हळूहळू चालत ससापर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली. ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससा च्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.

तात्पर्य :

कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे || धृ ||
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ॥१॥
जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे॥ २ ॥
जरी अनेक अपुले धर्म,
जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ॥ ३॥
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!”
– सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)

बालगीत –

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

प्रश्नमंजुषा-

१) नदी कशी तयार होते?
उत्तर : असंख्य ओहोळ एकत्र येऊन नदी तयार होते.
२) झरा कशाला म्हणतात ?
उत्तर : जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते  त्याला झरा म्हणतात.
३) जलरूपांची नावे सांगा.
उत्तर: झरा , ओढा, नदी,  तळे,  जलाशय, खाडी,  समुद्र,  महासागर
४) भूरूपांची नावे सांगा .
उत्तर : पर्वत, शिखर, डोंगर, टेकड्या, पठारे, मैदाने, खिंड, दरी
५) धरण कशाला म्हणतात?
उत्तर : नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते त्याला धरण म्हणतात.

व्यक्तीविशेष-

पी.व्ही. नरसिंहराव- पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव
जन्म :~ २८ जून १९२१
मृत्यू :~ २३ डिसेंबर २००४
हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.

व्यक्तिगत माहिती

राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अश्या तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांचे मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या.

राजकारणात प्रवेश

त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ  यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक  मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

पंतप्रधानपद

राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणुक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे  कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले.

सत्ता-

नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरूद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली.
तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले.
जुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला.

विधानसभा निवडणुका

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभांसाठी नोव्हेंबर, इ.स. १९९३मध्ये मतदान झाले. त्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार केला. त्या सर्व निवडणुका जिंकून भाजप राव सरकारपुढे मोठे आव्हान उभे करणार असे वातावरण निर्माण झाले.
पण मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचे नेते मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री झाले. केवळ दिल्ली आणि राजस्थान या राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकला. अशाप्रकारे त्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आणि नरसिंह रावांचे सरकार अधिक मजबूत झाले.

 भ्रष्टाचाराचे आरोप

 १९९४ मध्ये साखर आयातीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. हा राव सरकारच्या काळातील उघडकीस आलेला दुसरा घोटाळा होता. तसेच डिसेंबर, इ.स. १९९४मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग यांनी राव यांच्याविरूद्ध बंड केले.
मार्च, इ.स. १९९५मध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओरीसा या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओरीसामध्ये काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला. महाराष्ट्र  राज्यात पक्षाचा प्रथमच पराभव झाला तर गुजरात राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. देशातील वातावरण राव सरकारविरूद्ध जाऊ लागले.

सरकारची अधोगती

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचा इ.स. १९७७ पेक्षाही मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला. काँग्रेसला एच्.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला.
सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३ मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले.
लखुभाई पाठक फसवणुक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणुक झाली. तसेच जानेवारी,  १९९७ मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्त्वापासून अलग पडले.

मराठी परिपाठ

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा, परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.