17 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily routine

17 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ-

परिपाठ पहा.परिपाठ_17~डिसेंबर

आज वार-शनिवार, दिनांक- 17/12/2022,  मिती- मार्गशीर्ष कृष्ण नवमी, शके-1944

सुविचार- गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.                          

आजचा दिनविशेष-

17 डिसेंबर- पेन्शनर्स डे {राष्ट्रीय सेवानिवृत्त दिन}

ठळक घटना आणि घडामोडी

चौदावे शतक-

१३९८- तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला.

सोळावे शतक-

१५३८ – पोप पॉल तिसऱ्याने इंग्लंडच्या हेन्री आठव्याला वाळीत टाकले.

अठरावे शतक-

१७१८- ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

एकोणिसावे शतक-

१८१९- सिमोन बॉलिव्हारने ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकचे स्वातंत्र्य घोषित केले.

१८३४- डब्लिन अँड किंग्सटाउन रेल्वे ही आयर्लंडमधील पहिली रेल्वे सुरू झाली.

१८६२- अमेरिकन यादवी युद्ध – उत्तरेच्या जनरल युलिसिस एस. ग्रॅंटने टेनेसी, मिसिसिपी आणि केंटकीमधून ज्यू व्यक्तींना हद्दपार केले.

विसावे शतक-

१९०३- किट्टी हॉक, उत्तर कॅरोलिना येथे राइट बंधूंनी आपले राइट फ्लायर हे पहिल्या विमानाचे पहिले उड्डाण केले.

१९२६- लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली.

१९२७- हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.

१९२८- भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सॉंडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

१९३५- डग्लस डी.सी. ३ प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.

१९४४- दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ द बल्ज-माल्मेडी हत्याकांड – वाफेन एस.एस.च्या सैनिकांनी अमेरिकेच्या २८५व्या फील्ड आर्टिलरी ऑब्झर्वेशन बटालियनच्या युद्धकैद्यांना ठार मारले.

१९४७- बोईंग बी-४७ प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.

१९६१- गोवा मुक्तिसंग्राम – भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले.

१९६७- ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब.

१९७०- पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार.

१९७३- रोमच्या लियोनार्दो दा व्हिंची विमानतळावर पॅलेस्टाइनच्या अतिरेक्यांनी हल्ला चढवून ३० प्रवाश्यांना ठार मारले.

१९८३- आय.आर.ए.ने लंडनच्या हॅरॉड्स डिपार्टमेंट स्टोरवर बॉम्बहल्ला केला. सहा ठार.

जन्म-

१२६७- गो-उदा, जपानी सम्राट .

१७७८- सर हम्फ्री डेव्ही, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ.

१७७४- विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग, कॅनडाचा १०वा पंतप्रधान.

१८४९- लालमोहन घोष, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष.

१८८१- ऑब्रे फॉकनर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१८८८- अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हियाचा राजा.

१९००- मेरी कार्टराइट, इंग्लिश गणितज्ञ.

१९०१- यशवंत गोपाळ तथा य.गो. जोशी, मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक.

१९०५: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ – २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ – १६ डिसेंबर १९७०)

१९०८- विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.

१९११: डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.

१९२४: लेखक व हिंदुत्वाचे अभ्यासक स. ह. देशपांडे

१९२४: गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’चे संपादक

१९४७: दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)

१९७२- जॉन अब्राहम, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९७७- आर्नॉ क्लेमेंट, फ्रेंच टेनिस खेळाडू.

१९७८- रितेश देशमुख, हिंदी चित्रपट अभिनेता.

मृत्यू-

५३५- अंकन, जपानी सम्राट.

११८७- पोप ग्रेगोरी आठवा.

१९०७- लियोपोल्ड दुसरा, बेल्जियमचा राजा.

१७४०: चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले.

१९०१: लेखक य. गो. जोशी

१९२७: राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक

१९२९- मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष.

१९३८: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.

१९४२: अभिनेते व नाटककार विष्णू हरी औंधकर

१९५६: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य

१९५९: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.

१९६४- व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९६५: जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणाऱ्या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.

१९६७- हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.

१९८५: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार

२०१०: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

कवी :- साने गुरुजी

बोधकथा-

कोल्ह्याची फजिती:-
एकदा एक कोल्हा व मांजर शिकारी कुत्र्याविषयी बोलत होते.
कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.” “मलाही येतो,” मांजर म्हणाली.
कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत कारण मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.”
“तू कोणकोणत्या युक्त्या करतोस?” मांजरीने विचारले.
“अनेक युक्त्या!” कोल्हा फुशारकी मारत म्हणाला. “कधी मी काटेरी झुडपातून धावतो. कधी कधी जंगलातल्या दाट झुडपात जाऊन बसतो. तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो. अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत.”
मांजर म्हणाली,”मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे.”
“अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?” कोल्हाने विचारले.
“बघच आता! आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत. ” असे म्हणत मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहिली.
शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.
मांजर मनात म्हणाली,. “बिचारा कोल्हा! त्याच्या अनेक युक्त्या पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती.”
तात्पर्य: कोणत्याही एकाच विषयात प्राविण्य मिळवा. नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

कवी : साने गुरुजी

बालगीत-

ए आई मला पावसात जाउ दे

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे

कवयित्री : वंदना विटणकर

मराठी परिपाठ,

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.