16 डिसेंबर दिनविशेष, सप्तरंगी परिपाठ | Daily Routine

16 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ-

परिपाठ_16~डिसेंबर

आज वार- शुक्रवार, दिनांक- 16/12/2022,  मिती- मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी, शके-1944   

सुविचार- “अचूकता  पाहिजे तर सराव महत्वाचा.”                      

आजचा दिनविशेष-

16 डिसेंबर-राष्ट्रीय पत्रकार दिन

ठळक घटना आणि घडामोडी

चौदावे शतक-

१३९२- जपानी सम्राट गो-कामेयामाने पदत्याग केला. गो-कोमात्सु सम्राटपदी.

पंधरावे शतक-

१४९७ -वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.

सतरावे शतक-

१६३९- इंग्लंडच्या संसदेने नागरी हक्कनामा प्रस्तुत केला.

अठरावे शतक-

१७७३- अमेरिकन क्रांती-बॉस्टन टी पार्टी – टी ऍक्टच्या विरोधात सन्स ऑफ लिबर्टीच्या सदस्यांनी मॉहॉक वेश धारण करून बॉस्टनच्या बंदरात चहाची खोकी फेकली.

एकोणिसावे शतक-

१८३८- ब्लड रिव्हरची लढाई – दक्षिण आफ्रिकेत क्वाझुलु, नाताल येथे ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या नेतृत्वाखाली फूरट्रेक्कर आणि दाम्बुझा(न्झोबो) व न्देला कासोम्पिसी या झुलु ईम्पी सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध बोअर बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.

१८६४- अमेरिकन यादवी युद्ध – मेजर जनरल जॉर्ज एच. थॉमसच्या युनियन सैन्याने लेफ्टनंट जनरल जॉन बेल हूडच्या कॉन्फेडरेट आर्मी ऑफ टेनेसीला हरविले.

विसावे शतक-

१९०३ -मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

१९२२- वॉर्सोमध्ये पोलंडचा अध्यक्ष गेब्रियेल नारुतोविझचा खून.

१९३२ – ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

१९४२- ज्यूंचे शिरकाण – हाईनरिक हिमलरने रोमा(जिप्सी) लोकांना कत्तलीसाठी ऑश्विझला पाठविले.

१९४४- दुसरे महायुद्ध-बॅटल ऑफ द बल्ज – बेल्जियमच्या आर्देनेस प्रदेशात जनरल ड्वाइट डी. आयझेनहोवर आणि फील्ड मार्शल गेर्ड फोन रूंड्स्टेटच्या सैन्यात लढाई.

१९४६- लेओन ब्लुम फ्रांसच्या पंतप्रधानपदी.

१९४६ – थायलॅंडला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१९५७- ई.ई.चुंदरीगरने राजीनामा दिल्यावर सर फिरोजखान नून पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.

१९७१ – भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती

१९६०- हिमवादळात न्यू यॉर्कच्या आयडलवाइल्ड विमानतळाजवळ युनायटेड एरलाइन्सचे डग्लस डी.सी.८ आणि ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सच्या सुपर कॉन्स्टेलेशन जातीच्या विमानांमध्ये स्टेटन आयलंडवर हवेत टक्कर. १३४ ठार.

१९७१- बांगलादेश मुक्ति युद्ध – बांगलादेश विजय दिन. पाकिस्तानी फौजेने मित्रो बाहिनी समोर सपशेल शरणागति पत्करली.

१९८५ – कल्पक्‍कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ राष्ट्राला समर्पित

१९८९- रोमेनियातील क्रांति – हंगेरीच्या पास्टर लास्लो तोकेसला देशनिकाल देण्याविरूद्ध तिमिसोआरा मध्ये नागरिकांनी सरकारचा निषेध केला.

१९९१ – पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.

१९९८- ऑपरेशन डेझर्ट फॉक्स – अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बॉंबफेक केली.

एकविसावे शतक

२०१२- दिल्लीत एका तरुणीवर बसमध्ये निर्घृण सामूहिक बलात्कार व अत्याचार. तरुणीचा मृत्यू झाल्यावर सरकारने बलात्कार कायदा बदलला.

२०१४- पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.

जन्म-

१४८५- अरागॉनची कॅथेरीन, इंग्लंडची राणी.

१७७०- लुडविग फान बीथोव्हेन, जर्मन संगीतज्ञ.

१७७५- जेन ऑस्टेन, ब्रिटीश लेखक.

१७९०- लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा.

१८८२- सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८८८- अलेक्झांडर, युगोस्लाव्हियाचा राजा.

१९१७- सर आर्थर सी. क्लार्क, ब्रिटीश लेखक.

१९२६- बबन प्रभू, प्रहसन अभिनेता.

१९३३- डॉ. प्रभाकर मांडे, लोकसाहित्याचे अभ्यासक.

१९५२- जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू-

१५१५- अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.

१९२२- गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

१९६०- चिंतामण गणेश कर्वे, मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक.

२०००- काशीनाथ सखाराम देवल, मराठी सर्कसमालक.

२००४- लक्ष्मीकांत बेर्डे, अभिनेता.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा

वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा

बोधकथा-

सवय

एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्यास मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई.

अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्यार माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्या हातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला.

पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते.

पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन, वारा, पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.

तात्पर्य: जास्त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

आता उठवू सारे रान

आता पेटवू सारे रान

शेतकर्‍यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण !

किसान मजूर उठतील

कंबर लढण्या कसतील

एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !

कोण आम्हा अडवील

कोण आम्हा रडवील

अडवणूक करणार्‍यांची उडवू दाणादाण !

शेतकर्‍यांची फौज निघे

हातात त्यांच्या बेडी पडे

तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !

पडून ना राहू आता

खाऊ ना आता लाथा

शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण !

मराठी परिपाठ,
परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.