9 october | 9 ऑक्टोबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

9 october

9 ऑक्टोबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- सोमवार

दिनांक- 09/10/2023, 9 ऑक्टोबर

मिती-  भाद्रपद कृ.10

शके– 1945

सुविचार- “आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात!”

म्हणी व अर्थ – चोराच्या मनात चांदणे- वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते.

वाक्यप्रचार- अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८१ वा किंवा लीप वर्षात २८२ वा दिवस असतो.

एकविसावे शतक

  • २००१ – ट्रेंटन, न्यू जर्सी या शहरातून ॲंथ्रॅक्सचे जंतू असलेली पाकिटे टपालाने पाठवली.
  • २००४ – अफगाणिस्तानमध्ये निवडणूका.
  • २००६ – उत्तर कोरियाने परमाणु बॉम्बची चाचणी घेतली.

जन्म

  • १२६१ – दिनिस, पोर्तुगालचा राजा.
  • १३२८ – पीटर पहिला, सायप्रसचा राजा.
  • १७५७ – चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा.
  • १८६५ – जॉन रीडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८७३ – चार्ल्स वॉल्ग्रीन, अमेरिकन उद्योगपती.
  • १९४६ – तान्सु सिलर, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
  • १९५० – मिक मलोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५१ – जॉफ कूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५३ – टोनी शालूब, अमेरिकन अभिनेता.
  • १९७५ – महेन्द्र नागामूटू, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १०४७ – पोप क्लेमेंट दुसरा.
  • १३९० – जॉन पहिला, कॅस्टिलचा राजा.
  • १५९७ – अशिकागा योशियाकी, जपानी शोगन.
  • १९३४ – अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हियाचा राजा.
  • १९३४ – लुई बार्थु, फ्रांसचा पंतप्रधान.
  • १९५८ – पोप पायस बारावा.
  • १९८७ – गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक.
  • १९९५ – अलेक डग्लस-होम, फ्रांसचा पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक टपाल दिन
  • हंगुल दिन – दक्षिण कोरिया.
  • स्वातंत्र्य दिन – युगांडा.
  • शिरकाण स्मृती दिन – रोमेनिया.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

नोकर चोर आहे
  एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलाकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली आहे.
माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी दहा नोकर आहेत.
त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले पण त्यातील एकजणही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या व्यापार्‍याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठ्या आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे.
या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
 दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो.
त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसर्‍या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या.
 त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले.
त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले.
’शेवटी त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापार्‍याचे दागिने परत केले.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

हिमालयाशी सांगती नाते
हिमालयाशी सांगती नाते सह्यागिरीचे कडे
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे ||धृ||
दगडांचा हा देश छाती दगडाची याची
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबांची
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||१||
गडागडावर कड्याकड्यावर इतिहासाच्या खुणा
मनामनावर मंत्र घालुनि देत नव्या प्रेरणा
मान रक्षिण्या इथे शिंपले रक्ताचे किती सडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||२||
संताचा हा देश, सोयरा पीडित दुखीतांचा
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा
तळपत राहील सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||३||

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१)’अस्पृश्यांचा मुक्ती संग्राम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : शंकरराव खरात
२)’श्रीमान योगी ‘  या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : रणजित देसाई
३) ‘ ग्रामगीता  ‘  या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
४)’ सनी डेज ‘  या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : सुनिल गावस्कर
५)’ तिमिरातून तेजाकडे  ‘  या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर :  डाॅ.नरेंद्र दाभोळकर

इंग्रजी प्रश्न

1) Who is the Prime Minister of India?
Ans : Mr.Narendra Modi
2) Who is the President of India?
Ans : Smt.Draupadi Marumu
3) Who is the Vice President of India?
Ans : Mr.Jagdip Dhankhad
4) Who is the Home Minister of India?
Ans : Mr.Amit Shah
5) Who is the Defense Minister of India?
Ans : Mr. Rajnath Singh

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#9 october, 9 october 2023, 9 october 2021 panchang, 9 october 2022 special day, 9 october 2023 weather, 9 october 2022 panchang in hindi, 9 october is celebrated as, what is celebrated on 9 october, 9 october 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.