7 october | 7 ऑक्टोबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

7 october

7 ऑक्टोबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शनिवार

दिनांक- 07/10/2023, 7 ऑक्टोबर

मिती-  भाद्रपद कृ.8

शके– 1945

सुविचार- “कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”

म्हणी व अर्थ – चोराच्या उलट्या बोंबा- स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.

वाक्यप्रचार- अंग चोरणे- फारच थोडे काम करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८० वा किंवा लीप वर्षात २८१ वा दिवस असतो.

इ.स.पू. अडतिसावे शतक

  • ३७६१ – हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.

एकविसावे शतक

  • २००१ – सप्टेंबर ११च्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला.
  • २००३ – विशेष निवडणुकांद्वारे कॅलिफोर्नियातील जनतेने राज्यपाल ग्रे डेव्हिसची हकालपट्टी केली व आर्नोल्ड श्वार्झनेगरला राज्यपालपदी नेमले.
  • २००४ – कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानूकने राज्यत्याग केला.

जन्म

  • १४७१ – फ्रेडरिक पहिला, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा.
  • १७४१ – चार्ल्स तेरावा, स्वीडनचा राजा.
  • १८८५ – नील्स बोर, डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८८८ – हेन्री ए. वॉलेस, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९०० – हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.
  • १९०७ – प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
  • १९१२ – फर्नान्डो बेलाउंदे टेरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३१ – बिशप डेसमंड टुटु, दक्षिण आफ्रिकेचा बिशप.
  • १९३९ – हॅरोल्ड क्रोटो, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.
  • १९५२ – व्लादिमिर पुतिन, रशियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५२ – ग्रॅहाम यॅलप, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७८ – झहीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९८४ – सलमान बट्ट, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ३३६ – पोप मार्क.
  • ९२९ – साधा चार्ल्स, फ्रांसचा राजा.
  • १७०८ – गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू.
  • १७९२ – जॉर्ज मेसन, अमेरिकन मुत्सद्दी.
  • १९१९ – आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

कोल्ह्याची फजिती
 एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते.
कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.”
“मलाही येतो.” मांजर म्हणाली.
कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.”
“तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?” मांजरीने विचारले.
“अनेक युक्त्या!” कोल्हा फुशारकी मारत म्हणाला, “कधी मी काटेरी झुडपातून धावतो.
कधीकधी जंगलातल्या दाठ झुडपात जाऊन बसतो. तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो. अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत.”
मांजर म्हणाली,”मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे.”
“अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?” कोल्हाने विचारले.
“बघच आता! आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत. ” असे म्हणत मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली.
तिथे ती शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहिली.
शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला.
कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.
मांजर मनात म्हणाली, “बिचारा कोल्हा! त्याच्या अनेक युक्त्या पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती.”
तात्पर्य: कोणत्याही एकाच विषयात प्रवीण व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

हिमालयाशी सांगती नाते
हिमालयाशी सांगती नाते सह्यागिरीचे कडे
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे ||धृ||
दगडांचा हा देश छाती दगडाची याची
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबांची
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||१||
गडागडावर कड्याकड्यावर इतिहासाच्या खुणा
मनामनावर मंत्र घालुनि देत नव्या प्रेरणा
मान रक्षिण्या इथे शिंपले रक्ताचे किती सडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||२||
संताचा हा देश, सोयरा पीडित दुखीतांचा
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा
तळपत राहील सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||३||

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर : श्री.एकनाथ शिंदे
२) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर : श्री.देवेंद्र फडणवीस व श्री.अजित पवार
३) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर : श्री.रमेश बैस
४) महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर : श्री.दिपक केसरकर
५) महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर : श्री.चंद्रकांत पाटील

इंग्रजी प्रश्न

1) Who is the Prime Minister of India?
Ans : Mr.Narendra Modi
2) Who is the President of India?
Ans : Smt.Draupadi Marumu
3) Who is the Vice President of India?
Ans : Mr.Jagdip Dhankhad
4) Who is the Home Minister of India?
Ans : Mr.Amit Shah
5) Who is the Defense Minister of India?
Ans : Mr. Rajnath Singh

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#7 october, 7 october 2023, 7 october 2021 panchang, 7 october 2022 special day, 7 october 2023 weather, 7 october 2022 panchang in hindi, 7 october is celebrated as, what is celebrated on 7 october, 7 october 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.