राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा करणेबाबत
‘आजी-आजोबा दिवस’
AAJI AAJOBA DIVAS जी आर- डाऊनलोड करा
आता सर्व शाळात साजरा होणार आजी-आजोबा दिवस -10 सप्टेंबर 2023

सदर दिवशी आजी आजोबांकरिता खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात यावेत,
१. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून द्यावा.
२. आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावेत.
३. विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ सुद्धा ठेवण्यास हरकत नाही.
४. संगीत खुर्चीसारख्या खेळात सहभागी होऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील.
५. आजी आजोबां सोबत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा सहभाग घ्यावा.
६. पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबा यांना बोलवावे. (सदर बाब ऐच्छीक असावी.)
७. महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
८. शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या लाडक्या आजी आजोबांसाठी यावेळी कलाकृती सादर कराव्यात.
९. आजीच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.
१०. झाडे लावणे व पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे.