11 December
11 डिसेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- सोमवार
दिनांक- 11/12/2023, 11 डिसेंबर
मिती- कार्तिक कृष्ण पक्ष 14
शके- 1945
सुविचार- परिस्थिती गरीब असली तरी चालेल,पण विचार ‘भिकारी’ नसावेत.
म्हणी व अर्थ – दगडापेक्षा वीट मऊ – मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.
वाक्यप्रचार- भेदरून जाणे – घाबरून जाणे.
ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४४ वा किंवा लीप वर्षात ३४५ वा दिवस असतो.
- १८१६ – इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले.
- १९३० – सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
- १९४१ – दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४६ – युनिसेफची स्थापना
- १९६७ – कोयनानगर येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
- १९७२ – अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
- १९९४ – राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरून रशियन फौजांनी चेचन्यामध्ये प्रवेश केला.
- २००१ – चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मधे प्रवेश
- २०१३ – परस्परसंमतीने सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले सम/विषमलिंगी शरीरसंबंध कायदेशीर ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९ सालचा निकाल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
जन्म
- १८८२ – सुब्रम्हण्य भारती, तामिळ साहित्यिक
- १८९२ – अयोध्या नाथ खोसला, स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ – १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ – १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ – १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ – १९६६), पद्मविभूषण (१९७७)
- १८९९ – पु. य. देशपांडे, मराठी कादंबरीकार.
- १९०९ – नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) .
- १९१५ – मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक.
- १९२२ – मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल.
- १९२५ – राजा मंगळवेढेकर, बालसाहित्यकार
- १९२९ – सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३१ – भगवान श्री रजनीश
- १९३५ – प्रणव मुखर्जी, भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती
- १९४२ – आनंद शंकर भारतीयय संगीतकार
- १९६९ – विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रॅंडमास्टर.
मृत्यू
- १७८३ – रघुनाथराव पेशवे.
- १९८७ – गुरुनाथ आबाजी कुलकर्णी तथा जी. ए. कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक.
- १९९८ – रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी.
- २००१ – रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक.
- २००२ – नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ज्ञ.
- २००४ – एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न व रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या.
- २०१२ – पं. रवी शंकर, भारतरत्न पुरस्कृत भारतीय सतारवादक व संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
- आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#11 december, 11 december 2023, 11 december 2021 panchang, 11 december 2022 special day, 11 december 2023 weather, 11 december 2022 panchang in hindi, 11 december is celebrated as, what is celebrated on 11 december, 11 december 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.